" ही वाट दूर जाते..! "
=====================================
अनेकदा चेहऱ्यावर हास्य आणुनी दुःख लपवूनी जाते
भेटतात कुणी तरी जिथं व्यक्त व्हावेसे वाटते
ही वाट दूर जाते.
जगण्याची आता उतरंडी लागली
मनाला माझ्या उल्हसित ती करून गेली
ही वाट दूर जाते.
आयुष्य संपत चालले या नश्वर देहाचे
काही प्रवासी जाणवतात सदैव याच अबोल मनाचे
ही वाट दूर जाते.
कधी मन मोकळे झाले नाही माणसाचे
बरीच दुःख साचून राहिले अंतर्रमनाचे
ही वाट दूर जाते.
भाव अन् भावना यांचा सुंदर मिलाफ मनुष्य
अन् यात ज्यांना ते लाभले तेच खरे आयुष्य
ही वाट दूर जाते.
हे माझे,ते माझे असे यात रम्यता असेल कदाचित
पण तो अंतर्रमनातील भाव अन् भावना नसेल त्याच्यात
ही वाट दूर जाते.
जन्मभूमी अन् इतर स्थळांच्या अनेक स्मृती माझ्या अंतर्मणी दाटल्या
त्यात कित्येक जणांच्या आठवणी गहिवरून आल्या
ही वाट दूर जाते.
आई माझी असते नेहमी सोबत
सदैव ती पवित्र स्री असते कायम हृदयात
ही वाट दूर जाते.
आता नको वाटतो तो मान सन्मान
आता हवे हवेसे वाटते फक्त अंतर्ध्यान
ही वाट दूर जाते.
वंदे मातरम्..!
ता.क.: आज दिनांक ३० ऑगस्ट २०१९ रोजी भल्या सकाळी या नेहमीच्या रस्त्याने परतीच्या वाटेवर असताना निवांत बसून प्रस्तुत भाव अन् भावना जाणवल्या..!
निवांत बसावं माणसानं कधीतरी..!
एक तात्पुरता कवी: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा