*** चिंतन **
" सजीव शिलपकला..!"
=====================================
प्रवास अन् तो ही काहीतरी आत्मचिंतन करायला लावणारा असेल तर या आपल्या सजीव देहाला,त्याच प्रवासात पवित्र भावनेने दर्शन झालेल्या निर्जीव मूर्तीच्या भावना खूप आकर्षित करून जातात..!
हिंदू धर्मातील विविध ठिकाणच्या मंदिराला व त्यातील पवित्र मूर्तींच्या सुबक अन् सजीव जाणवणाऱ्या मूर्तीला पाहिले की, आपले पूर्वज किती महान होते याची साक्ष पटते..! आजच्या आपल्या तथाकथित प्रगती करणाऱ्या माणसाला आपल्या आजच्या असणाऱ्या बुध्दीची कीव करावीशी वाटते..!
मी खजुराहो,कोणार्क येथील वास्तू शिल्पकला प्रत्यक्ष पाहून आलेलो आहे..! जेंव्हा आपण तेथील ते अप्रतिम शिल्पकलेचे स्वर्गीय आनंद देणारे शिल्प कारागिरी पाहतो,त्यावेळी मनाला आत्मिक शांती नक्कीच लाभते..! अर्थात ती अप्रतिम शिल्पकला पाहणाऱ्या माणसांचे मन भावूक,श्रद्धेय असेल तरच असे जाणवेल..! नसता त्या फक्त आणि फक्त एका दगडात कोरलेल्या सर्वसाधारण मूर्ती ठरतील..!
माझ्या आयुष्यातील प्रवासात दर्शन झालेल्या खजुराहो येथील अनेक अप्रतिम शिल्पकलेचा आविष्कार ज्यावेळी मी पाहिला होता, त्यावेळी आपल्या पिढीतील आज स्वतः ला " ओव्हर स्मार्ट " समजणारी माणसं ( विशेषकरून सुशिक्षित..!☺) किती खुज्जी आहेत याची जाणीव होते..! त्यावर लिहावं वाटतं,पण सगळेच प्रगल्भ विचारांचे नसतात याची जाणीव मला आहे..अन् लेखणी थांबते..!
या पोस्ट करिता जी अप्रतिम शिल्पकलेची जिवंत वाटणारी जी कोरीव मूर्तींची शिल्प विविध छायाचित्रांच्या रूपाने मी स्वतः क्लिक केली आहेत,ती सिध्देश्वर महादेव मंदिर,गोदावरी नदीच्या तीरावर, कायगाव टोका येथील आहेत..!
विनम्र वंदन त्या महान शिल्पकारागीरांना,ज्यांनी अतिशय सुबक अन् उच्च कोटीची शिल्पे कोरलेली आहेत..!
ता.क.: माणसाच्या आयुष्यात काही माणसं दगडी शिल्पासारखी भेटतात तर बरीच शिल्पकलेच्या मूर्ती सारखी सजीवपणे भेटल्याची जाणीव होते.अर्थात याची जाणीव तेंव्हाच होते जेंव्हा माणसं भावनेने सजीव असतात..!
वंदे मातरम्..!
भटकंती करणारा एक भटका लेखक :नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
स्थळ:सिध्देश्वर महादेव मंदिर,गोदावरी नदीच्या तीरावर, कायगाव टोका,ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.
दिनांक: २६ ऑगस्ट २०१९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा