मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" हौस कुणाची अन् जीव जातो कुणाचा..!"
======================================
काल दिनांक ८ सप्टेंबर २०१९ रविवार रोजी उशिरा संध्याकाळी मी अन् माझी पत्नी औरंगाबाद शहरातील गुलमंडी परिसरात काही कामानिमित्त गेलो होतो.काम होण्यासाठी वेळ लागणार असल्याने आम्ही परिसरातील गणपती बाप्पा चे देखावे पाहून यायचे ठरविले.
एका गणपती बापाच्या देखाव्यात खूप सुंदर विद्युत रोषणाई केली होती,ती पण विशिष्ट संगीताच्या तालावर..! मात्र ते जे संगीत होते ते अतिशय कर्कश अन् बटबटीत होते.ते ऐकून अंदाजे वीस फुटावर उभ्या असलेल्यांना देखील ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत होता.
इतक्यात...
तिथेच,त्याच गणपती बाप्पाच्या मुझ्य स्टेज वर एक, वीस -बावीस वर्षाची एक आधुनिक पोशाखातील भगिनी चढली,ते पण स्वतच्या अडीच ते तीन वर्षाच्या मुलीला घेऊन..! ती मुलगी पार घाबरुन गेली होती,त्या कर्कश आवाजाने..! त्या भगिनींनी आपल्या मुलीला कडेवर उचलून घेतले अन् खाली उभे असलेल्या तिच्या पती महाशयांनी त्याच्या पत्नीचे ,आपल्या कन्येसह वेगवेगळ्या अॅंगल मधून छायाचित्र घ्यायला सुरुवात केली.हा छायाचित्राचा कार्यक्रम सुरू होता,तसतशी ती छोटी कन्या त्या ध्वनी प्रदूषणाच्या कर्कश आवाजाने अजुन घाबरु लागली होती.ती भगिनी त्या कन्येला शांत करत होती,पण फोटो काढूनच घेत होती.अखेर ती कन्या रडायला लागली तेंव्हा कुठे तो गणपती बाप्पा सोबतचा फोटोसेशन कार्यक्रम उभयतांच्या सहमतीने उरकून घेतला..!
हे सर्व दृश्य मी अन् माझी पत्नी अंदाजे पंधरा फूट दुरून पाहत होतो.अखेर मी माझ्या पत्नीला म्हणालो....
" हौस कुणाची अन् जीव जातो कुणाचा..!"
माझ्या पत्नीने देखील प्नाझ्या या मताला सहमती दर्शवली अन् आम्ही पुन्हा आमच्या नियोजित कामासाठी निघून गेलो..!
ता.क.: अशीच परिस्थिती लहान बाळाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असते का..?☺
वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
दिनांक:९ सप्टेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा