गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१९

" इतक्यात समोर राजू भाऊ हिवाळे चमकले..! "

                                                                  मला प्रवासात भेटलेली माणसं..!

                                                          " इतक्यात समोर राजू भाऊ हिवाळे चमकले..!  "




=====================================

मी,आज दिनांक १२ सप्टेंबर २०१९ रोजी औरंगाबाद बस स्थानक येथे बस मध्ये जाऊन बसलो होतो.मी लता दीदी यांच्या आवाजातील
" आपकी नाजरोने समझा.." हे माझ्या हृदयातील  गीत कानात बोळे कोंबून ऐकत होतो.इतक्यात समोर राजू भाऊ हिवाळे चमकले..! हो..हो चमकलेच..! कारण हल्ली त्यांचा शुभ काळ सुरू असल्याने चमकलेच..! कारण ते सध्या गंगापूर शिक्षक पतसंस्था चे चेअरमन आहेत..!☺मी अन् राजू भाऊ एकच तालुक्यात गंगापूर मध्ये ७ वर्ष सोबत होतो. मी अन् त्यांनी निव्वळ मैत्री जपली..!
मी त्यांना पाहिल्या पाहिल्या म्हणालो..." अलभ्य लाभ..! आज आमच्या लाल परीत तुम्ही काय करू राहिले..?"
राजू भाऊ-"दीर्घ मुदतीच्या रजेनंतर शाळेत हजर व्हायला चाललो आहे..!"
नेहमी प्रमाणे बस चे सिट धुळीने माखलेले असल्यानं अन् राजू भाऊ यांची पांढरी पँट पाहून मी त्यांना म्हणालो....
" थांबा,माझ्याकडं एक धुडकं आहे, सीट पुसून घेतो मग बसा,माझ्याजवळ..!"
मग मी माझ्या बॅग मधील एका पिशवीत ठेवलेले फडकं ( धूडकं) काढून जागा पुसून पासून तयार केली. अंधारी शाळा मिळाल्यापासून माझ्या बॅग मध्ये बऱ्याच वस्तूंनी हक्काने जागा घेतली आहे,त्यात हे एक धुडकं..!☺

सगळं पुसून पासून झालं अन् एक करड्या आवाजाचा धनी,उत्कृष्ट सूत्र संचालक माझ्याजवळ ,एका सर्व सामान्य शिक्षकाच्या जवळ बसला..!☺
त्यांना चिंचोली लिंबाजी येथे जायचे असल्याने मला थेट अंधारी पर्यंत सोबत होती.अनेक विषयांवर चर्चा झाल्या.त्यात त्यांचा आवडीचा विषय राजकारण ( गंगापूर तालुकयातील शिक्षक ,राज्य व देश हे  विषय होते.) यावर बऱ्यापैकी चर्चा झाली.माझ्या काही मुद्द्यांना भरभरून दाद दिली. त्यांच्या करड्या आवाजाने बस मधील इतर प्रवासी आमच्याकडे मुद्दामहून पाहत होते..! बहुदा राजू भाऊंना हळू आवाजात बोलणं येत नसावं त्याचा हा परिणाम होता..!☺
अंधारी गाव आल्यावर मी त्यांना म्हणालो..
"गावचा  वाटणारा माणूस इतक्या दूर पर्यंत माझ्या सोबत प्रवासात भेटला अन् प्रवासाचा आनंद वाटला..! आता तुमची ही बस ज्यावेळी माझ्या अंधारी हायस्कूल समोरून जाईल,तेंव्हा माझ्या शाळेचं दर्शन घ्या...नक्की..!"
असं म्हणून मी उतरलो..!

ता.क.: " राजू भाऊ,माझ्याकडे तुमची आजची रक्कम बाकी आहे,आयुष्यात नक्की त्याची परतफेड करील..! तसेच तुमचे काही विचार असेल तर प्रतिक्रिया मध्ये उलट टपाली कळवा..!"☺

वंदे मातरम्

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: १२ सप्टेंबर २०१९, गुरुवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा