** चिंतन **
ते अप्रतिम संवाद रहित अभिनय...!
=====================================
काहीही संवाद व्यक्त न करता काही क्षणांसाठी आपल्या मनाची होत असलेली प्रचंड घुसमट आपल्या अद्वितीय अभिनयाने दोनदा,दोन चित्रपटातून व्यक्त केली होती...महान अभिनेता कमल हसन यांनी..!
असे मला वाटते..!
त्या दोन्ही वेळी त्या दोन्ही व्यक्तिरेखांच्या मनोभावना भिन्न भिन्न होत्या..!
त्या दोन चित्रपटांपैकी पहिल्या चित्रपटात अगदी अखेरच्या क्षणी कुणीतरी ,निरोप घेताना ,दाखविलेल्या अनोळखीपणामूळे होत असलेली मनाची प्रचंड घुसमट व्यक्त केली होती ती कमल हसन यांच्या अद्वितीय अभिनयाने..!
दुसऱ्या एका चित्रपटात ज्यावेळी एक डॉन ,एका पोलिस इन्स्पेक्टर च्या घरी त्याला दम द्यायला जातो.त्या पोलीस इन्स्पेक्टर च्या घरात रागारागाने प्रवेश केल्या नंतर त्या डॉन ला त्याच घरात स्वतः च्या विवाहित मुलीचा , त्या पोलीस इन्स्पेक्टरचा अन् त्यांच्या बाळाचा फोटो दिसतो,त्यावेळचा केलेला संवाद रहित अभिनय म्हणजे संवाद रहित अभिनयाचा कोहिनूर...!
निव्वळ अप्रतिम अभिनय त्यावेळी कमल हसन यांनी केलेला आहे..!
या दुसऱ्या चित्रपटाची ऑस्कर पुरस्कार साठी शिफारस सुध्दा केली होती..इतका हा चित्रपट सुंदर , क्रूर,दुःखद प्रसंगांचा आहे..!
विशेष म्हणजे वरील मजकुरातील दुसऱ्या चित्रपटाची सी.डी. विकत आणण्यासाठी मी स्वतः १४ मे २००४ रोजी लासूर स्टेशन,जिल्हा - औरंगाबाद येथून नंदीग्राम एक्स्प्रेस ने सिकंदराबाद येथे जाऊन पुन्हा देवगिरी एक्स्प्रेस ने घरी परत आलो होतो..!
ही भटकंती,कारण निव्वळ रसिकता..!
( कृपया कुणीही ती सी.डी.मागू नये..! माझ्याकडे आता नाही..!! ☺)
ता.क.: वरील दोन्ही चित्रपटांपैकी बहुदा पाहिल्याचे नाव काहींना पटकन सांगता येईल..!
सांगा पाहु...त्या दोन्ही चित्रपटांची नावे..?
एक तरल रसिक लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: ४ ऑगस्ट २०१९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा