आमचे गाव आमची माणसं..!
" चितरून व्यक्तिमत्त्व,आदरणीय सादेक चाचा..!"
=======================================
काही माणसं ही फक्त शरीराने तरुण नसतात तर मनाने तरुण असण्याने त्यांच्यातील तारुण्याचा उत्साह हा नेहमी सळसळत असतो.त्यांचे हे पन्नाशीनंतरचे सळसळते तारुण्य आजकालच्या तथाकथित तरुणांना एक प्रेरणादायी तारुण्य असते..!
आमच्या पालखेड ता.वैजापूर या गावातील जे असेच पन्नाशीनंतरचे सळसळते तारुण्य आमच्या पिढीने पाहिले ते म्हणजे प्रिय आदरणीय स्व. सादेक शेठ बागवान यांचेच..!
काल दिनांक १९ सप्टेंबर २०१९ रोजी आमच्या या आदरणीय प्रिय सादेक शेठजी बागवान यांचा मृत्यू झाला अन् आमच्या पिढीने पाहिलेले पन्नाशीनंतरचे एक सळसळते तारुण्य आमच्या पालखेड गावातून कायमचे निघून गेले..!
आदरणीय सादेकजी चाचा शेठ बागवान..!
आमचा प्रिय बालमित्र शेख फारुख शेख गौस शेठ बागवान ( जि.प.शिक्षक, वैजापूर) यांचे सख्खे काका..!
आमच्या या बालमित्राच्या अन् आमच्यातील असलेल्या प्रेमामुळे नेहमी आदरणीय सादेक चाचा यांचा नेहमी संपर्क यायचा..! एखाद्या माणसानं आपलं आयुष्य कसं आनंदाने जगावं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आमचे प्रिय सादेक चाचा..! नेहमी हसमुख चेहऱ्याने कुणालाही भेटणार..!यांचा अन् रागाचा दूर दुरून देखील संबंध नाही..! आयुष्यावर अन् त्यातील प्रत्येक क्षणावर आपल्यातील सहजसुंदर अन् हसमुख स्वभावाने आपले जीवन जगणारा एक ग्रेट पालखेडकर..!
आमच्या पालखेड गावातील असा एकही माणूस आदरणीय सादेक चाचा यांना कोणत्याच बाबतीत नाव ठेवूच शकत नाही इतकं यांचे वागणे सगळ्यांना हवंहवंसं अन् प्रेमळ होते..! आदरणीय सादेक चाचा सारखी माणसं अशा सगळया माणसांसाठी प्रेरणादायी असतात जी माणसं सतत आपल्या गैरवर्तनाने कुणालातरी कोणत्याही मार्गाने दुखावत असतात..! खूपच मनमौजी व्यक्तिमत्त्व होते प्रिय सादेक चाचा..!
यांचे वय यांच्या स्वभावाच्या कधीच आड आलेच नाही.मला जेंव्हा जेंव्हा भेटायचे तेंव्हा माझ्या खांद्यावर हात ठेवून हसून हमखास म्हणायचे.." क्यू...रे..जाधव...क्या.. चल.. रहा है..? मजेमे..ना...?"
त्याच्या या नेहमीच्या प्रेमळ चौकशीने मन एकदम आनंदीत अन् प्रफुल्लित होऊन जायचे..!जरी यदाकदाचित मनात नैराश्य असेल तर ते पार दूर पळून जायचे..! प्रिय सादेक चाचा यांनी आमच्या मित्रांसोबत गप्पा करताना कधीच वयाचे बंधन आडवे येऊ दिले नाही.सगळ्याच रंगाच्या छटा असलेल्या गप्पा चाचा सोबत व्हायच्या..!☺ अशी माणसं कोणत्याही वयोगटातील माणसाची मित्र पटकन होऊन जातात..! कारण त्यांच्यातील असलेले निरपेक्ष भावनेने निर्माण केलेले प्रेमळ संबंध..!
आमचा प्रिय बालमित्र शेख फारुख ( जि.प.शिक्षक वैजापूर) याच्या समोर देखील प्रिय सादेक चाचा त्याच मनमोकळ्या गप्पा करायचे ज्या आमच्या मित्राच्या सोबत एकट्यात भेटल्यावर..! विशेषकरून प्रिय आदरणीय सादेक चाचा व आमचा प्रिय बालमित्र विजय गायकवाड यांच्या गप्पा ह्या निव्वळ आनंद द्यायच्या मनाला..! विजू अन् सादेक चाचा यांच्यातील गप्पा म्हणजे दोन खूप वयाचे अंतर असून देखील त्यात कसं नातं असावं याचं मूर्तीमंत उदाहरण होते..! त्यांच्या गप्पात कधीच वयाचे बंधन आलेच नाही..!
आयुष्यावर प्रेम करणारे,
आपल्यातील अजातशत्रू मित्रत्वाचा सदैव पुरस्कार करणारे,
नेहमी हसमुख चेहऱ्याने स्वागत करणारे,
आपल्या वयाला, एखाद्याशी मैत्री निर्माण करताना कधीही आड न येऊ देणारे,
आम्ही सर्व बालमित्र व त्यांचा सख्खा पुतण्या ( आमचा प्रिय बालमित्र शेख फारुख) यांच्यात कधीही भेदभाव न करणारे एक उत्तुंग प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय सादेक चाचा..!
काल दिनांक १९ सप्टेंबर २०१९ रोजी आपल्यातून निघून पैगंबरवासी झाले..!त्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच भारतमातेच्या चरणी प्रार्थना..!
वंदे मातरम्..!
आदरणीय स्व. सादेक चाचा बागवान( ह.मू.औरंगाबाद) यांचा,त्याच्या पेक्षा वयाने खूप लहान असणारा मित्र: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक:२० सप्टेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा