बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

अहिंसा दिवस..!



** चिंतन **

" अहिंसा परमो धर्म:, धर्म हिंसा तथैव च: "




चिंतन ©️

अहिंसा दिवस..!
________________________________________

आज अहिंसा दिवस आहे..!

अहिंसा निर्माण करण्यासाठी म्हणजेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी हिंसेची आवश्यकता असते.

सगळयाच बाबी निव्वळ अहिंसा परमो धर्म म्हणून साध्य होत नाही. ज्या ज्या राज्यप्रमुखांनी सत्ताधीश म्हणून निव्वळ अहिंसा धोरण स्वीकारले होते,काळाच्या ओघात अशाने सैन्य आळशी झाले.तसेच राज्यकर्त्यांच्या पराकोटीच्या कर्मठ अहिंसा धोरणामुळे आसपासच्या आक्रमणकारी सत्ताधीशांनी फक्त आणि फक्त अहिंसा धोरण स्विकारलेल्या राज्यकर्त्यांचे राज्य बळकावले अन् राज्य लयाला गेले.

एकवेळ नागरिक फक्त आणि फक्त अहिंसेचे धोरण स्वीकारू शकतात,पण कोणत्याही राजप्रमुखाला त्यात त्या राज्यकर्त्यांचे सैन्य देखील आले यांनी असे एकांगी धोरण स्वीकारणे त्यांच्या देशासाठी अन् त्या देशातील सर्व नागरिकांसाठी कदापि योग्य ठरत नाही. एक तत्वज्ञान म्हणून अहिंसा हा शब्द खूप चांगला आहे,पण एक राज्यकर्ता ज्यावेळी  नेतृत्व करत असतो, तेंव्हा अहिंसा अन् हिंसा या दोन्ही शब्दांना आपल्या कृतीतून अन् विचारातून दर्शवावे लागतेच.तेंव्हा कुठे धर्माची म्हणजेच अहिंसेची म्हणजेच शांततेची स्थापना होते.

अहिंसा याचा खऱ्या अर्थानं वास्तविकतेत  जर कुणी उपयोग केलेला असेल तर तो योगेश्वर श्रीकृष्ण यांनीच..! ज्यावेळी महाभारतातील युद्ध सुरू होणार, त्यापूर्वी अतिशय नम्रपणे भगवान श्रीकृष्ण, एक शांतीदूत ,एक अहिंसेचे पुरस्कर्ते म्हणून कौरवांच्या दरबारात स्वतः गेले होते.पण त्यांची ही अहिंसेची शिष्टाई काही कामी आली नाही; त्यावेळी याच योगेश्वराने , धर्माची स्थापना करण्यासाठी म्हणजेच अहिंसेची स्थापना करण्यासाठी हिंसेचे जोरदार समर्थन केले.

निव्वळ अहिंसेच्या गप्पा मारल्या असत्या तर आपल्या भारतमातेला अनेक परकीयांनी कधीचेचं गिळंकृत केले असते. प्रत्येक कालखंडात अहिंसा स्थापन करण्यासाठी हिंसेची आवश्यकता आहे याचा खरा अर्थ समजलेले अनेकानेक थोर  भारतीय राष्ट्रपुरुष जन्माला आले अन्  हिंसा करणाऱ्या अनेक दृष्टानां पराभूत केले, यमसदनी धाडले.अहिंसा स्थापित करण्यासाठी हिंसा करून लोककल्याणकारी राज्ये स्थापित केलेली आहेत. 

फक्त आणि फक्त हिंसेचे समर्थन करणे किंवा विकृत मानसिकता अंगिकारून हिंसेचे समर्थन करणे आपल्या सुंदर अशा मानवी संस्कृतीला वृध्दिंगत होण्यासाठी बाधक ठरते.

आपण आज जे काही आहोत,हे त्या त्या कालखंडात अहिंसा धर्म स्थापित करण्यासाठी ज्या ज्या थोर भारतीय राष्ट्रपुरुषांनी हिंसा करून लोककल्याणकारी राज्ये निर्माण केले  त्यांच्यामुळेच अन् त्यांच्यामुळेच भारतात मानवी संस्कृती गुण्या गोविंदाने नांदली अन् नांदत आहे..! 

ता.क.: आज, अहिंसा दिन आहे, त्यानिमित्त सर्वांना दोन्ही हात जोडून 🙏 मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌹

वंदे मातरम्.

नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक: २ ऑक्टोंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा