चिंतन
" ढोंगी एकांगी पुरोगामी..अन् आरोग्यदायी कोजागिरी..!☺
______________________________________________
आज हिंदू धर्मियांचा " कोजागिरी पौर्णिमा " हा उत्सव साजरा होत आहे..!
अजुन कसा एखादा तथाकथित पुरोगामी या हिंदू धर्मातील उत्सवावर टीका , टिप्पणी करेना..!
बहुदा मध्यरात्री किंवा उत्तररात्री टीका ,टिप्पणी करण्याचा त्यांचा मनोदय असेल..!
आजकाल फक्त हिंदू धर्मातील उत्सव ,परंपरेवर टिका टिप्पणी केली की ,संबंधितांना लगेच " पुरोगामी " ही सन्मानाची बिरुदावली चिकटली जाते..किंवा कुणीतरी बहाल करतात..!हे तथाकथित ढोंगी एकांगी पुरोगामी फक्त हिंदू धर्मातील सण उत्सव परंपरा यांच्यावरच टीका टिप्पणी करत असतात...!
इतर धर्मातील अनिष्ट प्रथा परंपरा या बाबत यांच्या मुखाला दाभनाने शिवल्या जाते..!
कोजागिरी पौर्णिमेचे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे.आपल्या शरीराला आरोग्यदायी अन् पौष्टिक पदार्थ एकत्र करून दूध उकळून प्राशन करण्याचा पवित्र दिवस..!त्याच दुधात आरोग्यदायी शीतल ,थंड चंद्राचा प्रकाश मिसळून त्याची लज्जत अजुन वाढते..!वाढलेल्या पित्त प्रकोपावर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आरोग्यदायी दूध उकळून पिल्याने फरक पडतो..!
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ,पृथ्वीच्या जवळ आलेला असतो..!त्यामुळे चंद्राचा शीतल प्रकाश पृथ्वीवर इतर दिवसांच्या मानाने जास्त प्रमाणात पडलेला असतो.आपल्या पूर्वजांनी याच भौगोलिक घटनेचा मानवाच्या आरोग्यासाठी आरोग्यवर्धक परिमाण साधण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पौष्टिक पदार्थ एकत्र करून दूध उकळून पिण्याची एक आरोग्यवर्धक प्रथा सुरू केली..!
महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी शेतकरी दादाने पिकविलेल्या नवीन धान्याचे याच दिवशी पूजन करण्याची प्रथा आहे.हिंदू धर्मातील प्रत्येक सण उत्सव आपल्याला निसर्गाकडे घेऊन जाणारे आहेत.आपल्या मातीशी नाळ जोडून ठेवणारे सर्व सण उत्सव आहेत..!
ता.क.: निसर्ग, आरोग्य विज्ञान यांचा सुरेख संगम म्हणजे हिंदू धर्मातील विविध सण,उत्सव..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
वंदे मातरम्..!
दिनांक: २३ ऑक्टोंबर २०१८


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा