मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" मिस यू... प्रिय बुजगावणे..! "☺
==================================
उद्या पासून शाळेला सुट्टी लागणार आहे.मी शाळेत जाण्यासाठी दररोज सकाळी औरंगाबाद बस स्थानकावर जात असे अन् मला हे प्रिय बुजगावणे नक्की भेटत असायचे..अगदी न चुकता..!☺
आता उद्या पासून शाळेला सुट्टी लागणार अन् आता हे खड्ड्यात उभे केलेले बुजगावणे मला आता दिवाळीची सुट्टी संपेपर्यंत भेटणार नाही या विरहाने मी खूप दुःखी झालो आहे..! नियतीने माझ्या आयुष्यात ऐन चाळीशीनंतर एक बुजगावणे आणले त्या बद्दल त्याला उभे असणाऱ्या खड्ड्याला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच..!☺ रस्त्याच्या ऐन मधोमध असणाऱ्या सुंदर अशा खड्ड्यातील बुजगावणे ज्याने कुणी उभे केले असेल त्याला त्रिवार धन्यवाद..! कारण त्या अज्ञात व्यक्तीमुळे माझे अन् या सुंदर अशा खड्ड्यातील बुजगावणे चे एक अव्यक्त नाते निर्माण झाले..!
मी मूळचा खेड्यातला असल्याने मला शहरात ,त्यातल्या त्यात एका सुंदर अशा खड्ड्यात पहिल्यांदा दिनांक ७ ऑक्टोंबर २०१९ रोजी बुजगावणे पाहून खूप आनंद वाटला..! खेड्यातील अशा ऐतिहासिक ठेवा असलेल्या वस्तू शहरात दिसल्या की,माझ्या सारख्या अनेक प्युवर खेडूतांना खेड्यातील काही वस्तूंचे प्रदर्शन पाहून नक्कीच खेड्यातील दिवस आठवतात..!
खूप खूप धन्यवाद शहरवासीयांनो.. आमच्या खेड्यातील आमचे प्रिय बुजगावणे या शहरात उभे केल्याबद्दल..! या शहरात,आपल्या खेड्यातील कुणीतरी आहे हे पाहून मन भरून आले..ते आज २२ ऑक्टो.२०१९पर्यंत..!
प्रिय बुजगावण्या आता आपली भेट थेट शाळा सुरू झाल्यावर होईल..! तो पर्यंत कुठेही जाऊ नकोस..! तसा अधून मधून मी तुला सहपरिवार एखाद्या दिवशी भेट द्यायला नक्की येईल..! तो पर्यंत काळजी घे...!
ता.क.: एकाच खड्यात असणाऱ्या दोन्ही बुजगावण्यांचे छायाचित्र वरील लेखात उल्लेखित भिन्न तारखेला काढलेले आहेत..!
वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
दिनांक: २२/१०/२०१९



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा