चिंतन
कला महत्त्वाची की औपचारिक शिक्षण ..?
_______________________________________
कोणतीही कला ,त्यात जर एखाद्या माणसाने मग तो कोणत्याही वयोगटाील असो,त्याने जर त्यात जास्त रस घेतला तर,त्याचे जे औपचारिक शिक्षण आहे त्याकडे नक्कीच दुर्लक्ष होत असते..!
आणि इतिहास साक्षीला आहे,ज्यांनी ज्यांनी असे केले आहे,त्यातील कित्येकजण औपचारिक शिक्षणात मागे पडलेले होते,आहे अन् राहतील सुध्दा..!
माझ्या वरील मताचा अर्थ असा अजिबात नाही की,कोणतीही कला माणसाच्या अंगी असू नये..! उलट प्रत्येक माणसाने ,आपल्या अंगी कला जपावीच...!कारण कलेमुळे माणसाचं मन संवेदनशील होत असतं..! पण ती संवेदनशीलता निर्माण होण्यासाठी पहिल्यांदा औपचारिक शिक्षण महत्त्वाचे...जेणेकरून त्या मिळणाऱ्या संवेदनशील आनंदाचा आनंद काही औरच असेल..!
पण...
ती जपत असताना औपचारिक शिक्षणाकडे दुर्लक्ष जर झाले तर..सर्व कलाप्रेमींना कलेच्या प्रांतात यश हमखास यश मिळेलच असे नाही.मात्र औपचारिक शिक्षण घेतल्यानंतर हमखास कोणत्यातरी प्रांतात यश नक्कीच मिळते..भले त्यापासून मिळणारे आर्थिक स्रोत कमी असेल..! काही कलाप्रेमी काही मोजक्या कलाकारांचे नाव सांगून त्यांनी कसे आपल्या आयुष्यात,शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे कसे आपल्या आयुष्यात यश मिळविले, कलेवर प्रेम केल्यामुळे यश मिळविले याचे उदाहरणं नेहमी देत असतात..! पण यांचे प्रमाण किती आहे..? अतिशय कमी..! आणि सर्वात महत्त्वाचे ज्यांनी असे केले होते,आहे अन् करणार आहे त्यांना त्या...त्या कलेच्या विकासाकरिता योग्य ती संसाधने उपलब्ध झाली म्हणून ती त्यात कलेच्या प्रांतात यशस्वी झाली..! त्यांचे औपचारिक शिक्षण कमी होते तरी..!
मुळात सर्वात महत्त्वाचे कोणत्याही माणसाने ,मग तो कोणत्याही वयोगटातील असो,त्याने आपल्या औपचारिक शिक्षणाकडे दुर्लक्ष केले तर..शिक्षणातील भविष्य अंधकारमय होऊन जाते..!आणि आज आपल्याला शिक्षण महत्त्वाचे आहे..आणि त्यानंतर जर आवड असेल तर कला महत्त्वाची आहे..!
पण जर यातील क्रम जा चुकला म्हणजेच कला पहिल्यांदा कला अन् नंतर शिक्षण तर....अशा माणसांच्या आयुष्याचा शिक्षणातील क्रम देखील चुकतो..! दोन्ही क्रिया जसे की, कला अन् शिक्षण घेऊन त्या दोन्ही प्रांतात यश प्राप्त करणारे खूपच अत्यल्प आहेत हे सर्वात महत्त्वाचे..! अशी माणसं सुवर्णमध्य साधणारी असतात अन् अशांची संख्या हाताच्या किंवा पायाच्या बोटांच्या कांड्या मोजण्या इतकी कमी असते..!
सध्याला बऱ्याच शाळेत वार्षिक स्नेह संमेलन ( गॅदरींग) ची तयारी सुरू आहे.या तयारीच्या नादी लागून बहुतांशी शाळेत औपचारिक शिक्षणाच्या तासिकांचा पार बोजवारा उडत असतो..हे फार कटू सत्य आहे..! जिथं असं होत नाही ते स्तुत्य...!
बरं...या कार्यक्रमाच्या तयारीला १५ दिवस ते १ महिना इतका कालावधी लागतो.
मग मुख्य प्रश्न पडतो...की औपचारिक शिक्षण महत्त्वाचे की ही " कला " नावाच्या खाली अभ्यासक्रमाला हरताळ फासण्यात पटाईत असलेली कला महत्त्वाची...?
माझ्या या लेखाचा मुख्य हेतू याच माझ्या प्रश्नाला अनुसरून आहे..!
औपचारिक शिक्षण घेतल्यानंतर त्याच औपचारिक शिक्षणाच्या साहाय्याने जी कला आत्मसात केली जाते ती त्या प्राप्त कर्त्याला आपल्या भविष्याची गरज भागविते..!
पण...
औपचारिक शिक्षणाच्या अगोदर जर मुलांनी फक्त कला या क्षेत्राला प्राधान्य दिले तर..अशांना वरील मुद्द्यांना धरून त्यांच्या भावी आयुष्यात अडचण येते...!
येथे एक सर्वांनी समजून घ्यावे की,कला म्हणजे...खेळ,संगीत,नाटक,अभिनय इ.सर्व त्यात आले...!
माझे कलेच्या क्षेत्रावर खूप खूप प्रेम होते आहे अन् राहील सुध्दा..! पण जर माझ्या समोर औपचारिक शिक्षण की कला असे दोन प्रश्न आलेच तर...मी पहिल्यांदा औपचारिक शिक्षणाचीच निवड करील...! नव्हे..नव्हे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात असेच केले आहे.माझ्या कुटुंबाला खूप चांगला कलेचा समृध्द वारसा मिळालेला आहे.पण मी पहिल्यांदा औपचारिक शिक्षण निवडले अन् मग माझ्या कलेच्या प्रांतावर प्रेम करत राहिलो..आज पर्यंत..!
ता.क.: कला माणसाला आत्मिक आनंद देते तर औपचारिक शिक्षण आपल्या आर्थिक कुवतीचा,आयुष्यात प्रापंचिक स्थैर्याचा आनंद देते..!
निवड आपापल्या हाती असते..अन् त्यातून निर्माण होणारे भविष्य सुध्दा...!
मला सर्व कलाकार व त्यांची कला फार आवडते..!
वंदे मातरम्..!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: १ डिसेंबर २०१८ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक:१/१२/२०१९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा