मला प्रवासात भेटलेली माणसं..!
"अहंकार नसलेला जिवलग प्रिय मित्र सुनील जाधव..!"
=====================================
प्रथमत:प्रिय मित्र सुनील पुंडलिकराव जाधव, गंगापूरकर यास आज दिनांक १ जुलै २०१७ रोजी, जन्मदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा..!
मित्र...!
ईश्वराने मानवांच्या रक्ताच्या दांभिक नात्यातील दांभिकपणा दूर करण्यासाठी निर्माण केलेले सर्वांगसुंदर नाते म्हणजे मित्र..!हे तेच नाते असते,ज्यात रक्ताच्या नात्यातील भाऊबंदकीचा द्वेषरूपी वास नसतो..!असतो फक्त आणि फक्त कास्तुरिमृगाच्या गर्भातील सुवासिक कस्तुरी सारखे नैसर्गिक सुगंध देणारं अदभूत रसायन..!
प्रिय मित्र सुनील, म्हणजे नैसर्गिक कस्तुरी सारखे अदभुत रसायन..!असे रसायन,ज्यात कुठलाही दांभिकपणा नाही,कोणताच अहंकार नाही, मानवी मूल्यांना घातक ठरणारे जातीपातीचे भेदभावरूपी अनैतिक मूल्ये नाहीत..! माझे हे मत कदाचित काहींना अतिशयोक्तीचे वाटेल,परंतु सुनीलच्या व माझ्या २५ वर्षातील मैत्रीतील अनुभवावरून सांगू शकतो की, सुनील पुंडलिक जाधव नावाचा हा माणूस
" निव्वळ सरळ स्वभाव " या अती दुर्मिळ मानवी प्रजाती मधील माणूस..!
आम्ही शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड.) कन्नड चे वर्गमित्र..! तेही वसतिगृहातील मित्र..!वसतिगृहातील मैत्री ही मित्रत्वाचे सर्व रूप दाखवते..!त्यावेळी भगवान हिवाळे व सुनीलच्या अजोड मैत्रीचे आम्हा सर्व डी.एड.च्या विद्यार्थ्यांना अप्रूप वाटायचे..!lसूनीलकडे पूर्वीपासून संघटन कौशल्य आहे..!ते विशेषकरून बहरले ते त्याच्याकडे शिक्षकसेनेचे नेतृत्व आल्यापासून..!जो,सुनील आम्ही समकालीन मित्रांनी त्यावेळी पाहिला होता ,तोच अनौपचारीक नात्यातील सुनील आजही हमखास दिसतो..!
वसतिगृहातील आम्ही एकमेकांना केलेली मदत,असो,किंवा सोबतचा एकत्र केलेला स्वयंपाक असो,त्यातील गोडी कधीच कमी झाली नाही..!उलट ती गोडी दिवसेंदिवस वाढतच गेली..!मित्रांनो,आपले मानवी जीवन विविध नात्यांच्या स्पर्शाने बहरते,उध्वस्त होते,कधी..कधी कोमजून जाते..!परंतु मित्र या एकमेव नात्याच्या परिस स्पर्शाने हे मानवी जीवन सोन्याहून मौल्यवान होते..आणि या मित्ररुपी नात्यात सुनील सारखा निगर्वी,सरळ स्वभावाचा,निष्कपटी मित्र जर लाभला तर,अश्या सानिध्यावान मित्रांचे देखील सोने होते..!
प्रत्येक नेत्यात नेतृत्व कौशल्य नक्कीच असते. मात्र फार कमी नेत्यात नेतृत्व कौशल्यासोबत अनौपचारिक मित्रत्वाचे देखील सद्गुण असतात.आमचा डी. एड चा वर्गमित्र, रुम पार्टनर प्रिय सुनील जाधव मध्ये नेतृत्व कौशल्या सोबतच अनौपचारिक मित्रत्वाचे देखील सद्गुण नक्कीच आहेत.यातच त्यांचे उजवेपण दिसून येते..!एक शिक्षक नेता म्हणून प्रिय मित्र सुनील मध्ये.....
" मी इतरांच्या पेक्षा वेगळा आहे..!" हा वाईट विचार त्याला आज पर्यंत तरी शिवलेला नाही.. प्रिय मित्र सुनील जाधव मधील मित्रत्वाचे हे कौशल्य त्याचे शिक्षक संघटन क्षेत्रातील विरोधक देखील मान्य करतात..!
आपण सर्वजण सूनीलचे मित्र आहोत याचा खूप मनस्वी आनंद होतो..!
प्रिय मित्र सुनील,तुला जन्मदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा..!
वंदे मातरम्
शूभेच्छूक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: १ जुलै २०१७

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा