मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" कृती छोटीशी,पण खूप प्रेरणादायी..! "
==================================
इ. स.२०१७
हिवाळ्याचे दिवस होते.कडाक्याची थंडी पडली होती.एक दिवस भल्या सकाळी मी लासूर स्टेशन येथील लासुरगाव रोड या रस्त्याने मॉर्निंग वॉक साठी न जाता भानवाडी रस्त्याला असलेल्या कांदा मार्केट मध्ये थोडाफार व्यायाम व मॉर्निंग वॉक साठी गेलो होतो.माझा थोडाफार व्यायाम आटोपून मी थोडा लवकर घरी निघालो होतो.मी भानवाडी रेल्वे गेट जवळ आलो होतो. इतक्यात मला लासूर स्टेशन ते लासुरगाव रोड लगत असणाऱ्या भानवाडी फाट्याजवळ कुणीतरी एक ज्येष्ठ नागरिक आम्ही हरित क्रांती प्रतिष्ठान अंतर्गत वृक्षारोपण केलेल्या एका लिंबाच्या झाडाला उभे करत असताना दिसले..!ते झाड काही कारणाने जमिनीवर पडले होते.
लासूर स्टेशन येथील लासुरगाव रोड लगत दुतर्फा इ. स.२०१६ व २०१७ मध्ये आम्ही हरित क्रांती प्रतिष्ठान अंतर्गत वृक्षारोपण केले होते.
हिवाळ्याचे दिवस होते.दुरून मला स्पष्ट दिसेना,की.. कोण ही व्यक्ती असेल ..! मी दुरूनच पाहायचे ठरवले होते. खूप कडाक्याच्या थंडीत अखेर त्या ज्येष्ठ नागरिकाने ,ते जमिनीवर पडलेले कडुलिंबाच्या झाडाला उभे केलेच..!ते ज्येष्ठ नागरिक मग पुन्हा रस्त्यावर येऊन आपल्या मार्गावर पंथस्त झाले.मी आता बराच पुढे आलो होतो.बारीक नजर करून पाहिलं तर ती व्यक्ती आदरणीय मनोहर काका त्रिभुवन हे होते..!
मला एका गोष्टीचा खूप आनंद झाला होता. कुणीही न सांगता आदरणीय मनोहर काका त्रिभुवन यांनी आपल्यातील संवेदनशील मनाला जाणवणारे कार्य केले होते.वास्तविक त्यावेळी कडाक्याची थंडी होती.रस्त्याने अनेक तरणाबांड तरुण,तरुणी,काही प्रौढ माणसं जात -येत होती.पण...संवेदनशीलता फक्त आदरणीय मनोहर काका त्रिभुवन यांनीच प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली होती.ती पण स्वतः हुन ..! विशेष म्हणजे त्रिभुवन काकांची ही कृती होती रस्त्याने जाणारे येणारे अनेक तरणाबांड तरुण,तरुणी,काही प्रौढ माणसं पाहत पाहत मस्तपैकी पुढे चालले होते.
कुणीही न सांगता ,एक छोटेसे कार्य करण्याची त्यांची ती कृती जगाच्या तुलनेत छोटीशी असेल कदाचित..! पण मला आदरणीय मनोहर काका त्रिभुवन काकांची ती कृती खूप प्रेरित करून गेली होती..! आपल्याला कुणीतरी सांगावे अन् मग मी एखादं विधायक काम करावे अशा मानसिकतेच्या अनेकांच्या श्रीमुखात आदरणीय मनोहर काका त्रिभुवन यांनी सणसणीत चपराक लगावली होती..! मी, दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी त्रिभुवन काकांची भेट झाल्यावर काकांना,त्यांच्या कालच्या खूप चांगल्या कृती बद्दल खूप खूप धन्यवाद अन् आभार मानले होते..!
लासूर स्टेशन येथे मी राहत असताना भल्या सकाळी बरीच माणसं मॉर्निंग वॉक साठी जात असायचे.आताही जात असतील बहुदा..!😊 भल्या सकाळी याच रस्त्याने फिरण्यासाठी आदरणीय मनोहर काका त्रिभुवन हे सुध्दा नियमितपणे असायचे.माझी अन् त्रिभुवन काकांची बऱ्याचदा भेट व्हायची..! माझा जिवलग मित्र ,प्रकाश सूर्यभान त्रिभुवन ( शिक्षक) यांचे सख्खे काका आहेत मनोहर त्रिभुवन काका..!
आज आदरणीय मनोहर त्रिभुवन काका ( सेवा निवृत्त कर्मचारी),लासूर स्टेशन येथे तथागत गौतम बुद्धांच्या प्रज्ञा ,शील ,करुणा या विचाराचे प्रसारकार्य, समाजप्रबोधनपर म्हणून करत आहेत..! त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे..!
आज आदरणीय मनोहर त्रिभुवन काका यांचा जन्मदिन आहे...! त्याबद्दल काकांना माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून मनःपूर्वक शुभेच्छा ..!
जय भीम काका..!
वंदे मातरम्!
शूभेच्छूक लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: ७ मार्च २०२०, शनिवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा