मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

फक्त एक महिन्यातील १५ दिवसाच्या मैत्रीची भेट..! "




* मला प्रवासात भेटलेली माणसं..! *

" फक्त एक महिन्यातील १५ दिवसाच्या मैत्रीची  भेट..! "
===================================

दिनांक - ८ एप्रिल २०१८

आम्ही तब्बल पंधरा ते वीस मिनिटे गप्पा मारत होतो.माझी सारखी नजर या चेहऱ्याला कुठे तरी शोधत होती..! " हा चेहरा कुठं पहिला असेल बरं..?" मी या मित्रा सोबत गप्पा मारत होतो,पण माझी नजर व माझा विचार या चेहऱ्याला भूतकाळात शोधत होती..!
अखेर गप्पांच्या ओघात त्या मित्राच्या तोंडातून कन्नड चे डी. एड.  असा उल्लेख आल्याबरोबर...मी  म्हणालो " तुम्ही विहामांडवा येथील राहणारे का..? " त्या मित्राने आश्चर्यचकित होऊन विचारले  " तुम्ही कसे काय ओळखले..?"

मी  माझा व त्याचा तेथील सर्व परिचय ,खाणाखुणा दिल्यावर त्या मित्राच्या स्मृती पटलावरील सर्व दिवे जागृत  झाले...अन् फक्त एक महिन्यातील जेमतेम पंधरा दिवसांच्या सहवासाची तब्बल २६ वर्षानंतर  मैत्रीची भेट झाली..!

त्या माझ्या मित्राचे नाव आहे..भागवत गुठे..! ह.मु.औरंगाबाद..! माझा हा मित्र  पैठण तालुक्यात जिल्हा परिषद प्रशालेत प्राथमिक पदवीधर शिक्षक आहे..! आमच्या दोघांच्या शरीराचा भूगोल ,१९९२  ते २०१८ या दरम्यान बराच पसरला..!😂

आम्ही कन्नड ला जेमतेम एक महिना सोबत होतो,त्यातही हा मित्र कधी गावाकडे तर कधी कन्नड..म्हणजे जेमतेम पंधरा दिवसांची मैत्री..!पण आम्ही राहत असलेले कन्नड चे वसतिगृह बहुदा जगातील त्याकाळातील सर्वात अस्वच्छ श्रेणीतील असल्याने,त्यामुळे तेथील अनेक न सांगण्यासारख्या भौतिक सुविधांवर आम्ही भरभरून बोललो..!😂   
आणि निरोप घेतला...पुन्हा भेटण्यासाठी..!

ताजा कलम : मला याचा आनंद झाला की,माझी स्मृती अजून बर्री आहे..!😂

वंदे मातरम्..!

शब्दांकन: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

  माझ्या  फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक : ८/४/२०१८
आमची भेट झालेले स्थळ: औरंगाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा