🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक २७ 🛑
⚫ अरबांचे आक्रमण, भाग क्रमांक - १ ⚫
===================================
🔴 सिंध प्रांतातील राजकीय स्थिती 🔴
◼️ राय साहसी दुसरा यांच्या मृत्यू नंतर त्यांची सत्ता चच नावाच्या ब्राम्हण मंत्र्याने बळकावली.
◼️ चच याने सिंध ची सत्ता काश्मीर पर्यंत पोहोचविली.
◼️ चच यांच्या मृत्यू नंतर त्यांचा भाऊ चंद्र गादीवर आला.मात्र चंद्रच्या मृत्यू नंतर चंद्राचा मुलगा आणि चचाच्या दोन मुलांमध्ये सिंधूच्या गादीसाठी यादवी युद्धाला सुरुवात झाली.
◼️ या यादवी युध्दात चचाच्या दोन मुलांचा , दाहर व दाहरसिंह यांचा विजय होऊन सिंधचे राज्य या दोन भावांमध्ये विभागल्या गेले.
◼️ इ. स.७०० च्या सुमारास दाहरसिंह यांच्या मृत्यू नंतर संपूर्ण सिंध राज्यावर दाहरची सत्ता प्रस्थापित झाली.
🔵 सिंध प्रांतावरील अरबांची स्वारी पार्श्र्वभूमी 🔵
◼️ इ.स.६३२ पर्यंत अरबांनी अरबस्थानावर सत्ता प्रस्थापित केली.
◼️ इ. स.७०९ मध्ये अरबांनी आफ्रिकेचा संपूर्ण उत्तर किनारा जिंकून घेतला.
◼️ इ. स.७१३ मध्ये अरबांनी युरोपातील स्पेन देश जिंकला.
◼️ इ.स.६४२ मध्ये पार्शिया ( आजचा इराण ) अरबांच्या ताब्यात आला.
◼️ इ.स. ६३७ ते ६४३ पर्यंत ठाणा,भडोच व देवल बंदरावर अरबांनी आरमारी स्वाऱ्या केल्या,परंतु तेही प्रयत्न विफल ठरले.
◼️पश्चिमेकडून भारतावर स्वारी करण्यासाठी उपलब्ध असलेल्या तीन खुष्कीच्या मार्गापैकी पहिला मार्ग म्हणजे खैबरमार्ग.
◼️ काबुलची खिंड ,काबुल व झाबूल या हिंदू राज्यांनी संरक्षित केली होती.म्हणून अरबांना खैबरखिंडीतून भारतावर आक्रमण करता आले नाही.
◼️ इ. स.६५० नंतर भारताच्या वायव्य सरहद्दीवर अरब धडका मारू लागले.
◼️ मकरान किनारपट्टी ,ती अरबांनी इ. स. ६८५ च्या सुमारास जिंकून सिंधवर स्वारी करण्याचा भुमार्ग आपल्या कब्जाखाली आणला.
==================================
🔵 वंदे मातरम्..!
🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵 दिनांक: १० मे २०२०, रविवार
🔴 प्राचीन भारत- अरबांचे आक्रमण
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा