मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" फक्त आपलाच जाणवणारा, प्रिय संतोष गायकवाड..! "
====================================
ज्यावेळी एखादा,त्याच्या पेक्षा वयाने लहान किंवा मोठ्या असणाऱ्या माणसाजवळ आपले सर्व मनोभाव सहजपणे व्यक्त करत असतो,तेंव्हा ते नाते..भावनिक दृष्ट्या खूप प्रगल्भ असते.अर्थात..ते मनोभाव..खूप रमणीय,भावूक,सामाजिक भान असणारे,आपल्याला आवडणाऱ्या सर्व क्षेत्रांवर निस्सीम प्रेम करणारे असले तरच.. अशी रक्ताची नसलेली...पण...रक्ताच्या नात्यालाही लाजवेल अशी नाती अजरामर झालेली आहे..!
याच उपरोक्त नात्यांच्या प्रेमळ गुंतागुंतीत माझ्या आयुष्यात गुंफलेला
" फक्त आमचा प्रिय सखा संतोष पंडीतराव गायकवाड " रा.लासूरगाव, ता. वैजापूर हा आहे..!
"फक्त आमचा "असे विशेषण लावण्याचे कारण..............
या संतोषवर मी, माझे प्रिय मित्र..रामेश्वर राऊत सर( ह.मु.लासूर स्टेशन),नितीन पगार सर ( ह.मु.नाशिक)व मधुकर शेवाळे( ह.मु.,मालेगाव नाशिक) यांनी भरभरून निस्सीम प्रेम केले,करत आहोत व करत राहणार..! या यादीत अजुन काही शिक्षक मित्र असतील कदाचित पण आम्ही जरा जास्तच..प्रेम केलं आमच्या संतोषवर..!
या निस्सीम मैत्रीचा प्रारंभ होतो.. इ.स.१९९५ साली..!
( कृपया " साली " याचा येथे अर्थ वर्ष अभिप्रेत आहे. हल्ली महाराष्ट्रात काही प्रादेशिक ,नात्यांच्या शब्दावरून नाहक कल्लोळ माजवून राजकीय तव्यावर पोळी भाजून घेणारे खूप आहेत..म्हणून त्यांच्याकरीता नम्रपुर्वक खुलासा सादर..! खुलासा नाही करावा तर..मी ही यांचे नाहक लक्ष्य होऊ शकतो..!😂)
आम्ही नुकतेच जून १९९५ ला लासूरगाव केंद्रात रुजू झालो होतो.त्यावेळी केंद्रीय शाळेवर शिपाई मामा म्हणून गायकवाड मामा होते.त्यांचाच मुलगा हा संतोष..! त्यावेळी संतोष माध्यमिक वर्गात होता. मामांमूळे संतोष व आमच्या खूप प्रेमाचे नाते वृद्धिंगत होत गेले..!
आम्ही एकदम नवतरुण शिक्षक होतो,संतोष आमच्या प्रत्येक सुख,दुःखात सहभागी व्हायचा.आमच्या सर्वांच्या लग्नात मनमुरादपणे याच संतोषने आनंद लुटला..! शिक्षक म्हणून नोकरी करत असताना शिक्षकांसोबत मैत्री होणे स्वाभाविक आहे..पण .. आम्ही लासूरगाव केंद्रांतर्गत कार्यरत असताना शिक्षक मित्र मंडळी सोडून दोन असे गोड मित्र आम्ही कमावले..की त्यांच्या मैत्रीची आठवण आजही क्षणोक्षणी येते...व त्यातील एक हा प्रिय संतोष तर आजही नेहमी आमच्या सोबत असतोच..! त्या दोन मित्रांपैकी एक अतिशय जिव्हाळ्याचा व खूप माणुसकी असलेला आमचा प्रिय मित्र होता..स्वर्गीय मनोहर काळे ( ग्रामपंचायत सदस्य लासूरगाव)..! या आमच्या प्रिय मित्राला नियतीने आपल्यातून हिरावून नेले...! प्रचंड दुःख झाले एक जिवलग मित्र गेल्याचे..!😔
आज आम्ही वरील उल्लेखित शिक्षक मित्रांपैकी मी, नितीन अन् शेवाळे, कोणीच लासूरगाव केंद्रांतर्गत कार्यरत नाही..! बहुदा पुन्हा तिथे कार्यरत होण्याची शक्यता देखील नाही..!कारण नितीन पगार व मधुकर शेवाळे त्यांच्या नाशिक जिल्ह्यात बदली करून निघून गेले अन् मी ही आता माझ्या मूळ वैजापूर तालुक्यात येण्याची शक्यता कमीच..! पण....स्व.मनोहर काळेंच्या गोड स्मृती सदैव आमच्या सोबत असेल,आणि सदैव सदाबहार असलेल्या आमच्या संतोषची खूप जिवाभावाची साथ आमच्या सोबत आजही नक्कीच आहे..!
या आमच्या प्रिय मित्राला संतोषला कला,संगीत,अभिनय, चित्रकला, गायन यांची लई जाम आवड..!कलेवर निस्सीम प्रेम करणारा आमचा प्रिय संतोष..! हा वेळोवेळी विविध गाण्यांचे अल्बम देखील काढतो..! याची शेरोशायरीवर खूप छान हुकूमत आहे..! नाना पाटेकर यांचा अभिनय करण्यात याचा खूप हातखंडा आहे..! संतोष मधील जेंव्हा नाना पाटेकर जागा होतो तेंव्हा नाना पाटेकर जरी प्रत्यक्ष उपस्थित असले तरी त्यांनाही आपल्या मूळ अभिनयात सुधारणा करावीशी वाटेल,एवढं सहजसुंदर अभिनय हाच संतोष करतो..! त्याच्या छंदाची आम्ही नेहमी आमची रसिक मनाची भूक भागवून घेत असतो..!😊 मी माझी जन्मभूमी पालखेड गाव सोडल्यानंतर जिवाभावाचा,अगदी घरगुती मित्र कमावलेला आहे..अन् तो म्हणजे प्रिय संतोष..! अगदी हक्काने घरी येणार,आस्थेवाईकपणे सर्वांची चौकशी करणार..आमचे स्वयंपाक घर तर याला हक्काचे..! आमचं सर्व घर प्रिय संतोषच्या विश्वासावर बिनधास्तपणे सोपवून जावं,एवढा विश्वास या आमच्या संतोषवर आहे..!
आमच्या प्रिय संतोषच्या आयुष्यात, आम्ही वर उल्लेख केलेल्या मित्रांनी नेहमी सहकार्याची,मार्गदर्शकाची, मोठ्या भावाची भूमिका नेहमी निभावलेली आहे..व भविष्यात देखील निभावणारच यात शंकाच नाही..!
थोडक्यात आमचे संपूर्ण घर,कुटुंब,सदस्य या आमच्या प्रिय संतोषच्या विश्वासावर सोडून जाणारे आम्ही..! असा विश्वास, त्या विश्वासाला सार्थ ठरविणारे आमच्या प्रिय संतोष सारखे माणसं आजच्या जमान्यात लाभणे..हे आमचे नशीबच म्हणावे..!आम्हा काही मित्रांना आमच्या या प्रिय संतोष वर खूप विश्वास आहे.. !
ता.क.: मी माझ्या आयुष्यात एकमेव मराठी लघु चित्रपटात छोट्या भूमिकेत अभिनय केला आहे,त्यात मला प्रिय संतोषने खूप छान साथ दिलेली आहे..! तो मराठी लघु चित्रपट आहे..." पर्याय..!"
वंदे मातरम्..!
प्रिय संतोषचा घरगुती स्नेही लेखक : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक:२२ मे २०१८



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा