शनिवार, २३ मे, २०२०

प्राचीन भारत भाग क्र. ९ 🛑शुंग, कण्व व सातवाहन🛑



🔵प्राचीन भारत, भाग क्रमांक -९🔵

🛑शुंग, कण्व व सातवाहन🛑

==================================

🛑शुंग वंश🛑

🔶शुंग हा भरद्वाजगोत्री प्राचीन ब्राम्हण वंश होता.

♦️पुष्यमित्र शुंग  (इ.स.पू.१८५ ते इ. स.पूर्व १४९)♦️

🔘मौर्य घराण्यातील शेवटचा राजा बृहद्रथ, दुर्बल, विलासी  कर्तृत्वहीन निघाल्याने  मौर्य लष्कराचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने लष्करी राज्यक्रांती घडवून  बृहद्रथ याला ठार करून शुंग घराण्याची सत्ता स्थापन केली.

♦️युवराज अग्नीमित्र ♦️
🔘याने आठ वर्षे राज्य केले.

♦️वसुमित्र ♦️

🔘वसुमित्र हा अग्नीमित्रचा मुलगा होता.
याने दहा वर्षे राज्य केले.

🔘यानंतर ओद्रक, पुलिंडक,वसुघोष,वज्रमित्र,भागभद्र ,देवभूमी ह्या राजांनी मगध गादीवर राज्य केले.

🔘शुंग घराण्यातील शेवटचा राजा देवभुती हा व्यसनी, नीच निघाला.

🔘त्याचा ब्राम्हण मंत्री , वसुदेव कण्व याने इ.स.पूर्व ७२ देवभुतीचा खून करवून शुंग घराण्याचा शेवट केला व मगध राज्यावर कण्व घराण्याची सत्ता स्थापन केली.

_________________________________________

🛑कण्व घराणे 🛑

♦️वसुदेव कण्व♦️

🔘याने दहा वर्षे राज्य केले.

🔘शेवटचा राजा कण्व राजा सुशर्मा याला इ. स.पूर्व २७ मध्ये एका सातवाहन राजाने ठार करून कण्व सत्तेचा शेवट केला.
मगध राज्यावर सातवाहन वर्चस्व प्रस्थापित केले.

________________________________________

🛑सातवाहन घराणे🛑

🔘सातवाहनांचा सातकर्णी व शालिवाहन असा उल्लेख आढळतो.
🔘नाशिकच्या शिलालेखात सातवाहन स्वतःचा
' एकब्राम्हण ' असल्याचा दावा मांडतात.

* ♦️सिमुक सातवाहन ♦️
( इ. स.पूर्व २३५ ते इ. स.पूर्व २१२ )

🔘हा सातवाहन घराण्याचा संस्थापक.

* ♦️कृष्ण ♦️

🔘हा सिमुक याचा भाऊ होता.

* ♦️सातकर्णी पहिला  ( इ.स.पू.१९४ ते इ.स.पू.१८५ )♦️

🔘सिमुक सातवाहन याचा मुलगा.
🔘याची कारकीर्द दहा वर्षाची.
🔘खूप प्रबळ व समृध्द सत्ता.
🔘खऱ्या अर्थाने सातकर्णी पहिला हाच सातवाहन साम्राज्याचा संस्थापक होय.
🔘सातकर्णी याने पैठण ही राजधानी बनवली.

🔘मधल्या काळातील सातवाहन राजांनी माहिती मिळत नाही.

♦️गौतमीपुत्र सातकर्णी  ( इ. स.१०६ ते इ. स.१३० )♦️

🔘मातृनाम लावणारा पहिला सातवाहन सम्राट.
🔘वैदिक धर्माचा जाज्वल्य अभिमानी होता.
🔘कुशल प्रशासक, प्रजाहितदक्ष सम्राट.
🔘नाशिक प्रशस्तीत गौतमीपुत्र वेदांचा आश्रयदाता आणि एक ब्राम्हण असे म्हंटले आहे.

♦️पुलुमायी उर्फ वसिष्ठीपुत्र सातकर्णी♦️ 
( इ.स.१३० ते १५५)

🔘हा गौतमीपुत्र सातकर्णी याचा मुलगा होता.

🔘पुलुमायी नंतर दोन सातवाहन राजे झाले.

♦️यज्ञश्री सातकर्णी ( इ.स.१६० ते इ.स.१८९ )♦️

 🔘यज्ञश्री सातकर्णी हा  सातवाहन घराण्यातील शेवटचा कर्तृत्ववान सम्राट होय.

🔘इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात सातवाहन सत्ता समाप्त झाली.

==================================

वंदे मातरम्..!

🔵संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵दिनांक:  १३ एप्रिल २०२०, सोमवार

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा