शनिवार, २३ मे, २०२०

प्राचीन भारत भाग क्र. ७ 🛑" मौर्य साम्राज्य - चंद्रगुप्त मौर्य "🛑




🔵प्राचीन भारत , भाग क्रमांक - ७🔵

🛑" मौर्य साम्राज्य - चंद्रगुप्त मौर्य "🛑

===================================

♦️चंद्रगुप्त मौर्य  ( इ. स.पूर्व ३२२ ते इ. स.पूर्व २९८ )♦️

🔶मौर्य साम्राज्याचा संस्थापक.
🔶तक्षशिला येथील विष्णुगुप्त उर्फ कौटिल्य उर्फ चाणक्य हे चंद्रगुप्त मौर्य चे गुरू.

🛑साम्राज्यविस्तार🛑

🔶स्वसामर्थ्याच्या जोरावर गादीवर आल्यानंतर अवघ्या सहा वर्षात चंद्रगुप्त मौर्य ने परकियांच्या ( ग्रीक ) 🔶गुलामगिरीचा भारताला लागलेला कलंक पुसून काढला.
🔶सिंध,सौराष्ट्र,महाराष्ट्र,विदर्भ,आंध्रप्रदेश ,म्हैसूर चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्यात मोडत असे. हिंदुकुश पर्वत ते म्हैसूर  पर्यंत प्रदेश मौर्य साम्राज्यात जोडला.
🔶अशोकाच्या शिलालेख वरून ,अशोकाने फक्त कलिंग देश जिंकला होता अशी माहिती मिळते.
🔶ह्यावरून अशोकाच्या साम्राज्यातील कलिंग देश सोडल्यास बाकी संपूर्ण प्रदेश सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनीच जिंकला होता हे स्पष्ट होते.
🔶तहात सेल्युकस निकेटर याने त्याची मुलगी हेलन हीचा चंद्रगुप्त मौर्य शी विवाह लावून सख्य जोडले.
🔶चंद्रगुप्त मौर्य ,मौर्य साम्राज्याचा शिल्पकार होता.
शूर सेनानी,धाडसी,मुत्सद्दी होता.
🔶चाणक्य , चंद्रगुप्ताचा प्रधानमंत्री व पुरोहित होते.

________________________________________

🛑चंद्रगुप्त मौर्य प्रशासन व्यवस्था🛑

🔶पाटलीपुत्र राजधानी.या सुंदर अन् बहारदार नगरीचे वर्णन मेगँस्थेनिसने आपल्या ' इंडीका ' या ग्रंथात केले आहे.
🔶नोकरशाहीची भरभक्कम चौकट निर्माण केली.
🔶पंच मंडळाची कामे नेमून दिलेली होती. संक्षिप्त खालीलप्रमाणे
◼️(१) मजुरीचे दर निश्चित करणे,
◼️(२) परकीय प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे,
◼️(३) जन्म - मृत्यूची नोंद ठेवणे,
◼️(४) उत्पादन, उद्योगधंदे नियंत्रण, अन्न,औषधे भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई,
◼️(५) वजन मापे ,बाजारपेठ यावर देखरेख,

_________________________________________

🛑लष्करी व्यवस्था🛑

🔶पायदळ - सहा लाख.
🔶घोडदळ - तिस हजार
🔶लढाऊ हत्ती - नऊ हजार
🔶रथ दल - आठ हजार रथ होते.
🔶साम्राज्यात भारताचा पूर्व/ पश्चिम किनारा येत असल्याने आरमारा कडे विशेष लक्ष दिले.
🔶सैनिकांना रोख पगार.

________________________________________

🛑कर व्यवस्था🛑

🔶पाणी वापरावरील कर, व्यापार,उद्योगधंदे यावरील कर,जंगल, खाणी यावरील कर,व्यवसाय परवाना शुल्क, द्युतगृहे,वेश्यागृहे यावरील कर, सरकारी खजिन्यात जमा होणारा दंड,धान्य व जनावरे सोडून इतर सर्व वस्तूंच्या खरेदी विक्री वरील कर,आयात - निर्यात मालावरील जकात,बाजार कर, पाणीपट्टी, मांडलिक कडून मिळणारी खंडणी आदी विविध कर चंद्रगुप्त मौर्य यांच्या कार्यकाळात होते.
🔶कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथात कर आकारणी तत्वाचे विवरण आढळते.

________________________________________

🛑न्यायव्यवस्था🛑

◼️१) दिवाणी न्यायालयाना धर्मस्थिय न्यायालये म्हणत.
◼️२) फौजदारी न्यायालयांना कंटकशोधन न्यायालय म्हणत.

🛑उत्पन्न🛑

🔶उत्पन्नाचे मुख्य स्रोत - जमीन महसूल.
🔶शेती संवर्धन कडे विशेष लक्ष.
🔶पाटबंधारे बांधणे,बियाणे पुरवठा करणे,

________________________________________

🛑कालवे व पाटबंधारे🛑

🔶कालव्यातून शेतीला पाणी दिले जाई व त्यातून पाणीपट्टी आकारल्या जात असे.
🔶गिरनार येथील प्रसिद्ध सुदर्शन तलाव चंद्रगुप्त मौर्य यांच्या कार्यकाळात बांधला गेला.त्यानंतर अशोकाच्या काळात या तलावाची दुरुस्ती.

_________________________________________

🛑जनहिताची कामे🛑

🔶रोगांसाठी व पशुंसाठी सरकारी दवाखाने चालविले जात.
औषधी पुरवठा मुबलक करता यावा यासाठी औषधी वनस्पती च्या सरकारी बागा  असत. इत्यादी

____________________________________________

🛑कौटिल्याचे ( आर्य चाणक्य ) अर्थशास्त्र🛑

🔶भारतीय राजकारणाचा विश्वकोश.
🔶पंधरा भाग व १८० उपभाग असून त्यात सहा हजार श्लोक आहेत.
🔶परराष्ट्र धोरण,युद्ध निती, सैन्य, हेर, दुत, सेनानायक इत्यादी विषय यात आहेत.
🔶शेती,व्यापार,उद्योगधंदे,रूढी,कायदे,वर्ण,आश्रम,जाती इत्यादी बाबत यात उहापोह.
 🔶यात कौटिल्याचे ( आर्य चाणक्य) सामाजिक विचार अत्यंत पुरोगामी आढळतात.

________________________________________

🛑चंद्रगुप्त मौर्य शेवट🛑

🔶चंद्रगुप्त मौर्य यांनी आयुष्याच्या शेवटी राजपदाचा त्याग करून जैन धर्म स्विकारला.
🔶चंद्रगुप्त मौर्य यांचा मृत्यू इ. स.पूर्व २९८ मध्ये झाला.

🔶साम्राज्य विस्तार सोबतच चंद्रगुप्त मौर्य यांनी उत्कृष्ट राज्यव्यवस्था निर्माण केली आणि चोवीस वर्ष 🔶प्रजाहितदक्षतेने राज्यकारभार केला.
🔶चंद्रगुप्त मौर्य यांनी निर्मिलेली शासनपध्दती पुढील काळात अनेक राज्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरली.
म्हणून तो प्राचीन भारतातील पहिला महान सम्राट ठरतो.

==================================

वंदे मातरम्..!

🔵संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵दिनांक:  १० एप्रिल २०२०, शुक्रवार

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा