शनिवार, २३ मे, २०२०

प्राचीन भारत भाग क्र.११ 🛑गुप्त साम्राज्य, भाग क्रमांक - १🛑



🔵प्राचीन भारत भाग क्रमांक : ११◼️

🛑गुप्त साम्राज्य, भाग क्रमांक - १🛑

===================================

🔴गुप्तांचा उदय🔴

🔶डॉ. काशिप्रसाद यांच्या मते गुप्त सम्राट जाट होते.
🔶डॉ. राय चौधरी यांच्या मते गुप्त ब्राम्हण होते.
🔶भारतात दीर्घकाळ सत्तेत असलेलं घराणे गुप्त घराणे.
_________________________________________

१) ♦️श्रीगुप्त♦️

🔘श्रीगुप्त हा गुप्त घराण्याचा संस्थापक होय.

२)  ♦️घटोत्कच♦️

🔘घटोत्कच हा श्रीगुप्त याचा मुलगा होता.
🔘कर्तृत्ववान व पराक्रमी.
🔘चाळीस वर्षे राज्यकारभार केला.
🔘इ. स.३१९ मध्ये मरण पावला.

३) ♦️चंद्रगुप्त पहिला  ( इ. स.३१९ ते ३३५ )♦️

🔘चंद्रगुप्त पहिला हा घटोत्कच याचा मुलगा होता.
🔘चंद्रगुप्त पहिला हा गुप्त साम्राज्याचा संस्थापक होय.
🔘याचा मृत्यू इ. स.३३५ मध्ये झाला.

४)  ♦️दिग्विजयी सम्राट समुद्रगुप्त ♦️
( इ. स.३३५ ते ३७५ )

🔘दिग्विजयी सम्राट समुद्रगुप्त हा चंद्रगुप्त पहिला याचा कुमारदेवी पासून  मुलगा होता.
🔘याने उत्तर व दक्षिण दिग्विजय केले.कांची पर्यंत याचे राज्य होते.
🔘वैदिक धर्माचा अभिमानी.
🔘सर्व धर्मांचा सन्मान केला.
🔘पाटलीपुत्र राजधानी होती.
🔘याने बुद्धगया येथे धर्मशाळा व विहार बांधले.

५) ♦️रामगुप्त♦️

🔘रामगुप्त हा दिग्विजयी सम्राट समुद्रगुप्तचा ज्येष्ठ मुलगा होता.
🔘हा अत्यंत भेकड व नेंभलट होता.
🔘रामगुप्त याला त्याचा लहान भाऊ दुसरा चंद्रगुप्त याने ठार केले.
🔘हाच दुसरा चंद्रगुप्त ' चंद्रगुप्त विक्रमादित्य ' नावाने ओळखला जातो.

६) ♦️चंद्रगुप्त दुसरा उर्फ  चंद्रगुप्त विक्रमादित्य '♦️
       ( इ. स.३७५ ते ४१४ )

🔘चंद्रगुप्त दुसरा उर्फ  चंद्रगुप्त विक्रमादित्य ' हा समुद्रगुप्तचा दत्तदेवी पासून झालेला मुलगा होता.
🔘याचेच अजून एक नाव ' देवगुप्त ' देखील आहे.
🔘विशाल गुप्त साम्राज्याचा वारसा मिळाला.
🔘याच्याच काळात भडोच,सोपारा, खंबायत या बंदरातून इजिप्त मार्गे युरोप व रोमन साम्राज्याशी जलमार्गाने व्यापारी दळणवळण सुरू झाले.

🔘दिल्लीच्या कुतुबमिनार जवळ मेहरोलीच्या लोहस्तंभावर आलेखात ज्याचे वर्णन आहे तो चंद्रराजा म्हणजे चंद्रगुप्त दुसरा होय.
🔘याचा राज्यकारभार हिंदुकुश , हिमालयापासून ते नर्मदे पर्यंत चालत होता.
🔘चंद्रगुप्त विक्रमादित्य 'च्या काळात देशात सुवर्णयुग निर्माण झाले.

🛑चंद्रगुप्त विक्रमादित्यचा नवरत्न दरबार🛑

🔘(१) महाकवी कालिदास
🔘(२) प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ व ज्योतिषी वराहमिहिर
🔘(३) जगप्रसिद्ध वैद्य धन्वंतरी
🔘(४) वेतालभट्ट
🔘(५) विशाखादत
🔘(६) क्षपणक
🔘(७) अमरसिंह
🔘(८) वरुची आणि
🔘(९) शंकु

🔵योग्यता🔵

🔘उत्कृष्ट राज्यव्यवस्था, मजबूत प्रशासन व्यवस्था,कर आकारणी माफक होती.लोककल्याणकारी राजा, सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभाशाली काळ होता.
चीन प्रवासी फहियानचे प्रवासवर्णन ह्या गोष्टीची साक्ष देते.

🔘चंद्रगुप्त दुसरा उर्फ  चंद्रगुप्त विक्रमादित्य ' हा इ. स.४१४ मध्ये मरण पावला.

==================================

🔵वंदे मातरम्..!

🔵संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵दिनांक:  १५ एप्रिल २०२०, बुधवार

 गुप्त घराणे क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा