*** मला प्रवासात भेटलेली माणसं **"
" माझ्या नाकावर टिच्चून..!"
__________________________________________
आज दिनांक २७ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी बसने शाळेत निघालो होतो.बसमध्ये आज खिडकी जवळील जागा काही मिळाली नाही.मग नाईलाजाने खिडकीजवळ बसलेल्या एका इसमाजवळ जाऊन बसलो..!
बापरे...!
तो..बचाबचा तोंडात गुटख्याच्या पुड्या ओतून चावत बसला होता.ज्या वासाची मला सर्वात जास्त अॅलर्जी तोच वास अहिंसात्मक मार्गाने सहन केला..खूप वेळ... तोंड वाकडे करून..!
बरं या दरम्यान दुसरीकडे जागा पण नव्हती..! वाहकाकडे ( कंडक्टर) कडे गाऱ्हाणे मांडावे तर त्याचाही तोबरा भरलेला होता..!
आज माझ्या नाकावर खूप अत्याचार झाला आहे.
हल्ली कुणीही..काहीही मागायचे असले की ,आंदोलन करतात..!
माझ्या नाकावर, टीच्चून जो अत्याचार झाला आहे,त्याबाबत माझ्या अत्याचार ग्रस्त नाकाला कुणी नाकावर टिच्चून न्याय देईल का हो...आंदोलन करून..?😂
ता.क : तो अत्याचार करणारा तरुण त्याच्या मोबाईल वर कुणाशी तरी " प्रेमळ संवाद " करत होता.मला प्रश्न पडलाय..की, असल्या वासाड्या लोकांबरोबर " प्रत्यक्ष कृतीयुक्त प्रेमळ संवाद " कसा काय करत असतील...
" त्या " ...? 😂
वंदे मातरम्..!
* दिनांक:२७ ऑगस्ट २०१८
* अत्याचार स्थळ: सरकारी बस.
* अत्याचार करणारा : धडधाकट तरुण.
* अत्याचारग्रस्त लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा