#चिंतन ©️
सदगुण विकृती
====================================
सदगुण विकृती असा तो पूर्ण शब्द आहे. मित्रांनो,मुळात एक लक्षात घ्या की,मराठीतील बरेच शब्द आज कालबाह्य झाले आहेत,त्यात हा एक शब्द सदगुण विकृती..!
सदगुण म्हणजे चांगले गुण अन् विकृती म्हणजे स्वभाव.सदगुण विकृती याचा अर्थ येथे चांगला स्वभाव असा अभिप्रेत आहे.हे जुने लिखाण आहे. तात्याराव सावरकर यांचे मराठी भाषेतील शब्द संपदेचे योगदान अमूल्य आहे.त्यांनी कित्येक नवनवीन शब्द आपल्या मराठी भाषेला दिले आहेत.
काळाच्या ओघात विकृती या शब्दाचा अर्थ स्वभाव असा न राहता तो दोष किंवा वाईट अशा अर्थाने उल्लेखित होऊ लागला.असेच एक उत्तम उदाहरण म्हणजे पुरोगामी साहित्यिक प्रबोधनकार ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर लिहिलेले एक खूप उत्कृष्ट पुस्तक म्हणजे दगलबाज शिवाजी होय. यातील दगलबाज या शब्दाचा खरा अर्थ चाणाक्ष,चतुर असा आहे. मात्र ज्यांना माहित नव्हते त्यांनी त्याचा अर्थ धोकेबाज असाच लावला.त्यावरून कित्येकांनी वाद पण केला होता. मात्र जेंव्हा दगलबाज या मराठी शब्दांचा खरा अर्थ समोर आला तेंव्हा विरोधकांचे समाधान झाले.
येथेही सदगुण विकृती याचा तत्कालीन मराठी भाषेच्या अर्थाने चांगल्या स्वभावाचे असाच आहे. सदगुण विकृती याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने घेऊ नये ही नम्र अपेक्षा.
वंदे मातरम्🙏🏻
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव ©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक -१३/९/२०२२, मंगळवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा