** चिंतन **
" चलो एक बार फिर से अजनबी बन जाये
=====================================
माणसाला बऱ्याचदा आयुष्यात जीवन जगत असताना आयुष्याच्या वाटेवर स्वल्पविराम घ्यावा लागतो..! हा स्वल्पविराम घेण्याचा अर्थ अभिप्रेत असतो, त्या वाक्यातील काही शब्दांना अर्थपूर्णता येण्यासाठी..! बरीच नाती ही मुद्दामहून अनोळखी भासवावी लागतात,नात्यातील जिवंतपणा टिकवून ठेवण्यासाठी..!
बऱ्याचदा आयुष्याच्या वाटेवर घेतलेला स्वल्पविराम, कधी कधी नाईलाजाने घ्यावा लागतो तर कधी कधी समोरच्याला समजून घेऊन घ्यावा लागतो..! मात्र हा स्वल्पविराम संवेदनशील मनाला चीरचीर करून जातो..! आयुष्याच्या वाटेवर जेंव्हा कधी एकांतात आपण बसतो तेंव्हा हा घेतलेला स्वल्पविराम गहिवर निर्माण करतो आठवणींनी..!
माणसाच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टींना नाही मिळत पूर्णविराम..!बऱ्याच वाक्यात पूर्णविरामाच्या अगोदर स्वल्पविराम असतो,त्याच पूर्णविरामाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी..!
आणि तो स्वल्पविराम म्हणत असतो...
" चलो एक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो..!"
वंदे मातरम्..!
लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: १५ सप्टेंबर २०१९,रविवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा