आमचे गाव,आमची माणसं..!
" आम्हाला माहीत नाही..!"
==================================
हसण्यातील कंजूसपणा काय असतो हो..?
आम्हाला माहीत नाही..!
अहंकार काय असतो हो..?
आम्हाला माहीत नाही..!
जातीच्या अहंपणाचा " टेंभा " मिरवीणे काय असते हो..?
आम्हाला माहीत नाही..!
पैशाचा माज काय असतो हो..?
आम्हाला माहीत नाही..!
बुद्धिमत्तेचा गर्व काय असतो हो..?
आम्हाला माहीत नाही..!
कपटीपणा काय असतो हो..?
आम्हाला माहीत नाही..!
प्रौढ झाल्यावर उगीचच प्रौढपणाचा खोटा " आव " आणणे काय असते हो..? . आम्हाला माहीत नाही..!(विशेषकरून आम्ही एकमेकांना भेटल्यावर..!😂)
शहाजुका सारखे वागणे काय असते हो..?
आम्हाला माहीत नाही..!
आपण दूर गेलो म्हणजे विसरणे काय असते हो..?
आम्हाला माहीत नाही..!
भूतकाळातील गमती जमती विसरणे काय असते हो..?
आम्हाला माहीत नाही..!
एकमेकांना भेटल्यावर उगीचच शिष्टाचारयुक्त बोलणे काय असते हो..?
आम्हाला माहीत नाही..!
आपण प्रौढ झाल्यावर स्वतःतील बालपण विसरणे काय असते हो..?
आम्हाला माहीत नाही..!
एकमेकांच्या, सर्व चवींच्या आठवणी विसरणे काय असते हो..? आम्हाला माहीत नाही..!
प्रौढ झाल्यावर एकाच डब्ब्यात दोघांनी जाण्याची लाज वाटणे..?
आम्हाला माहीत नाही..!
( ते दोघे फक्त आम्ही यातील दोघेच..!😂)
आम्ही कुठेही स्थायिक झालो तरी,जन्मभूमी विसरणे..?
आम्हाला माहीत नाही..!!
ऐनवेळी काहीतरीच व्यक्त करणारा तात्पुरता कवी ?:
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव,पालखेडवाले.
वंदे मातरम्..!
ता.क.: इतक्यात प्रेक्षकांंमधून आवाज आला,
" अरे...कविता संपली का रे.....?
त्यामुळे मी थांबतो आता..!नाहीतर कविता लई मोठी होती..!!
😂😂
असे आम्ही " मोकळी चाकळी बालमैत्री संघटना " शाखा-पालखेड चे स्वयंघोषित पदाधिकारी..!
ही " मोकळी चाकळी बालमैत्री संघटना " इ .स. १९९० च्या दशकात पालखेड येथे कुठेही नोंद न करता स्थापन झालेली आहे..!
सर्व पदाधिकाऱ्यांचा कुणाला परिचय हवा असल्यास पालखेड नगरीत जेंव्हा काही धार्मिक,सांस्कृतिक इ.कार्यक्रम असेल तेंव्हा सर्वांचा असाच मोकळा चाकळा परिचय करून देण्यात येईल...!कारण यातील बहुतांशी तेंव्हाच भेटतील..! कारण यातील बहुतांशी गावाबाहेर कामानिमित्त स्थायिक झालेले आहेत..! अर्थात यातील कुणाचाही चेहरा लक्षात ठेवून संपर्क केला तरी चालेल..!
आमची इतरत्र कुठेही शाखा नाही..!बहुदा इतर कुणाचीही अशी संघटना असेल अशी जवळ जवळ शक्यता नाही..! योगायोगाने असल्यास त्या व आमच्या संघटनेचे विलीनीकरण करण्याचे सर्वाधिकार आम्हा सर्वांकडे राखून ठेवण्यात आले आहे..!
तर.. त्वरा करा व संपर्क साधा..! जागा मर्यादित आहेत..!!
" मोकळ्या चाकळ्या बालमैत्री संघटनेचा फक्त पालखेड शाखेचा एक पदाधिकारी व लेखक व कधी मधी गद्यातून पद्य लेखन करणार तात्पुरता कवी ? :
नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव,पालखेडवाले
वंदे मातरम्
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: २५ नोव्हेंबर २०१७ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: २५/११/२०१९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा