आमचे गाव आमची माणसं..!
" लज्जतदार मित्र अन् खुमासदार त्यांच्या शैली..! "
हरित क्रांती प्रतिष्ठान - लासूर स्टेशन
=====================================
मैत्री... या एका शब्दात सर्व नात्यांचे सार सामावले आहे. मित्र या शब्दात सर्व भावभावनांचे ममत्व समाविष्ट आहे. आठवणी माणसाच्या आयूष्यात सतत त्याच्या सोबत असतात; नव्हे, नव्हे तर त्याच्या पश्चात त्या रम्य आठवणी त्या आठवणींचे साक्षीदार सतत गप्पांच्या ओघात आठवत असतात.
अशीच आमची आज दिनांक २६ डिसेंबर २०१६ रोजीची रविवारची रम्य आठवण! आमच्या ग्रूप हरित क्रांती प्रतिष्ठान -लासूर स्टेशन चे आम्ही सदस्य आज एकत्र जमलो.आमच्या लासूर स्टेशन येथील आम्ही सर्वजण लज्जतदार मित्र अन् खुमासदार आमच्या स्वभावाने आम्हीच आमच्या विश्वात रमून गेलो..!अख्ख्या लासूर स्टेशन येथे असे फक्त आम्हीच केलं..! आम्ही तरी असे काय केले असे कित्येकांना प्रश्न पडला असेल..!
तर मानव निर्मित सतत पाणी टंचाईच्या छत्रछायेखाली असणाऱ्या लासूर स्टेशन येथे आम्ही सर्वांनी जीवाचे रान करून लासूर स्टेशन ते लासुरगाव रोडलागत वृक्षारोपण केले..! कित्येकदा आम्ही वृक्षारोपण केलेली झाडं व त्यांची Tree Guard चोरीला गेली..! कित्येकदा काहींनी फक्त आम्हाला काम करताना पाहून फक्त उपदेशाचे डोस पाजले..! मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही हे कृतीतून दाखवून दिले अन् सर्व झाडे जगवली..! उगीचच पर्यावरणाच्या गप्पा मारल्या नाहीत...! लासूर स्टेशन येथे वृक्षारोपण ,वृक्षसंवर्धन करून ते टिकविणे मोठे अग्निदिव्य होते अन् आम्ही सर्वांनी ते अग्निदिव्य यशस्वीपणे पार केले...म्हणून आजच्या आहारावरील बट्ट्या ,रोडगे खाण्यात आमचा एक प्रकारचा रुबाब होता..! आमच्यातील प्रत्येक सदस्य लज्जतदार आहे अन् त्यांच्या शैली देखील खूप खुमासदार आहे..!😊
आज आम्हा सर्व मित्रांना आमच्या एका पितृतुल्य मित्राची खूप खूप आठवण आली अन् ते म्हणजे आदरणीय कमलाकर क्षीरसागर काका होय..!मुंबई महानगर पालिकेच्या शासकीय सेवेतून दर्जा क्रमांक १ वरून निवृत्त होऊन आम्हाला एक ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्याची प्रेरणा दिली..! आम्ही काकांच्या मार्गदर्शनात हे कार्य करत गेलो.आजच्या सह भोजन कार्यक्रमाला आदरणीय काका नाहीत,कारण काकांनी त्यांच्या कुटुंबाचे स्थलांतर त्यांच्या मूळ गावी डोंबिवली ,मुंबई येथे केले होते म्हणून..!पण आमच्या प्रत्येक घासाता आदरणीय कमलाकर क्षीरसागर काका यांची प्रकर्षाने आठवण आली हे मात्र नक्की..!
स्वत:च्या हाताने चवदार शूध्द शाकाहारी स्वयंपाक बनवला...!(आहारावरील रोडगे, बट्ट्या) खूपच चवदार स्वयंपाक झाला, त्यात स्वत:च्या मेहनतीने स्वयंपाक बनवून खाण्याचा आनंद काही औरच असतो... भोजनालयातील भोजनात स्वनिर्मितीचा आनंद नसतो. आणि मानवाला स्वनिर्मितीचा आनंद सतत आकर्षित करत असतो. मग ती स्वनिर्मिती कोणतीही असो, त्याचे माणूस कौतूकाने कौतूक करत असतो..!
आम्ही सर्व हरित क्रांती प्रतिष्ठान लासूर स्टेशन चे सदस्य या स्वनिर्मितीच्या आनंदात आज रमून गेलो. आयूष्य खूप सूंदर आहे...! तिशी-चाळीशीनंतर तर प्रत्येक क्षण मित्रांसमवेत जगावा. कारण या वयोगटापासून माणसाच्या कौटुंबिक जबाबदारीही विस्तारलेली असते. आणि यावेळी मनमोकळे करण्याचे रमनिय भावनिक ठिकाण मित्र...!
एक स्वप्न आहे की, आम्ही वृक्षसंवर्धन करून खूप मोठ्या झालेल्या एखाद्या झाडाच्या सावलीत पुन्हा एकदा अशाच बट्ट्या ,रोडगे ,स्वतच्या हाताने तयार करून खायच्या..!
ता.क.: वाचकांनी प्रत्येक छायाचित्र निरखून पहा..! प्रत्येक छायाचित्र खवय्यांच्या तोंडाला पाणी आणील किंवा आनंद तर नक्कीच देईल..!😊
वंदे मातरम्..!
सौजन्य: हरित क्रांती प्रतिष्ठान लासूर स्टेशन.
स्थळ: महावीर नगर लासूर स्टेशन येथील एका इसमाच्या घरासमोरील पटांगण व आडोसा..!😊
एक आचारी लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: २५/१२/२०१६ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: २६/१२/२०१९, गुरुवार























कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा