चिंतन ©️
सिध्दहस्त लेखक- विजय तेंडुलकर सर..!
=================================
आज ग्रेट मराठी लेखक आदरणीय विजय तेंडुलकर सर,
यांचा जन्मदिन आहे.( ज. दि.६ जानेवारी १९२८)
त्यानिमित्त त्यांच्या सिध्दहस्त लेखणीला विनम्र अभिवादन..! 🙏🏻
विजय तेंडुलकर सर यांच्या लेखणीतून " सिंहासन " सारखा अत्युत्कृष्ट मराठी चित्रपट तयार झाला अन् त्या सगळ्या सफेदपोष लोकांना उघडं नागडं केले जे स्वतःला साळसुदपणे सर्व सामान्य लोकांच्या समोर प्रस्तुत करत असतात. जब्बार पटेल सर दिग्दर्शित अन् विजय तेंडुलकर सर यांची उत्त्तम पटकथा असलेला सिंहासन हा चित्रपट संपूर्ण विश्वातील राजकीय विषयावरील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. सिंहासन चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेम मध्ये बेरकी राजकारणी अन् बेरकं राजकारण क्षणोखणी दिसतं.
शह प्रतिशह, कुरघोडी यावर भाष्य केले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजकीय नेत्यांचे असलेले अनैतिक संबंध यावर देखील यात कळत नकळतपणे काही दृष्यातून भाष्य करण्यात आले आहे. तेच अनैतिक संबंध प्रत्यक्षात काहीजणांच्या आयुष्यात धुरळा उडवून गेले.
आदरणीय विजय तेंडुलकर सर यांचं साहित्य जर वाचायचे अन् पाहायचे असेल तर एकांगी विचार करणारा ते वाचू शकत नाही अन् पाहू देखील शकणार नाही. अशांनी ,सरांचे साहित्य वाचायचे अन् पाहायचा तिळमात्र प्रयत्न देखील करू नये,ते अशांच्या सर्व प्रकारच्या तब्येतीला हानिकारक नक्कीच ठरेल..!😊
शांतता कोर्ट चालू आहे, सामना,सिंहासन,सखाराम बाईंडर,घाशीराम कोतवाल,उंबरठा इत्यादी अनेक दर्जेदार कलाकृती आदरणीय विजय तेंडुलकर सर यांच्या लेखणीतून उतरलेल्या आहेत. ज्या सर्व त्या तथाकथित सर्व ढोंगी मानसिकतेच्या लोकांना पार उघडं-नागडं करून आपल्या समोर प्रस्तुत करतात.
डॉ.श्रीराम लागू, निळू भाऊ फुले, नाना पाटेकर, डॉ.गिरीश कर्नाड सर,स्मिता पाटील,सयाजी शिंदे, सुलभा देशपांडे इत्यादी अनेक मराठी कलाकारांना एक सक्षम अभिनेता,अभिनेत्री म्हणून जी ओळख मिळाली,त्यात आदरणीय विजय तेंडुलकर सर यांच्या सिद्धहस्त लेखणीचा खूप मोठा वाटा होता.
समजातील अचूक वैगुण्यावर बोट ठेवून लेखन करणारा असा लेखक होणे नाहीच...!
आपण मराठी माणसं खरंच खूप नशीबवान आहोत,अशी शब्दप्रभूंची अनेक लेकरे आपल्या मराठी साहित्यात जन्माला आली. त्याबद्दल आपण रसिक वाचकांनी त्या जगाच्या नियंत्याचे त्रिवार आभार मानायला हवेत..! 🙏🏻
वंदे मातरम्..!
एक वाचक तथा रसिक नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव. ©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक:६जानेवारी २०२०,सोमवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा