चिंतन
रेल्वेदिन...!
===================================
आज रेल्वेदिन..!
त्यानिमित्त भारतीय रेल्वेला जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!🌹
आपल्या भारतातील रेल्वेचा आजचा जन्मदिन..!
आजच्याच दिवशी म्हणजेच १६ एप्रिल १८५३ साली भारतातील पहिली रेल्वे मूंबई ते ठाणे या मार्गावर धावली होती.
मी आज १६ एप्रिल २०१८ रोजी सकाळी,लासुर स्टेशन येथील महावीर नगर जवळील रेल्वेगेटवर आमचे मित्र दिपक पवार (गेटमन याचेच मराठी रूपांतर " चौकीदार " असे होते..!) यांच्याकडे गेलो. प्रथमत:त्यांना रेल्वेदिनाच्या शूभेच्छा दिल्या..! त्यानंतर जिचा आज भारतातील जन्मदिन आहे,त्या भारतीय रेल्वेसोबत स्वयंछायाचित्र काढले..!
मराठवाडा एक्सप्रेस सोबत...!
रेल्वे विभाग व त्या अंतर्गत विविध सेवा करणारे सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना आजच्या रेल्वे दिन निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!
मला सगळ्याच " चौकीदारांचा खूप खूप अभिमान वाटतो..! कारण चौकीदार जर चौकन्ना असेल तर बरेच अपघात टळतात..! किंवा बरेच चोर देखील चिडचिडेपणा करतात..!
त्यालाच रडीचा डाव असेही म्हणतात..!😊
मी जो पर्यंत लासूर स्टेशन येथे स्थायिक होतो, तो पर्यंत जेंव्हा कधी मला सुट्टी असली की, मी माझ्या घराच्या मागे असलेल्या याच रेल्वे चौकीवर जात असे. आदरणीय पाशु मामा, प्रकाश गायकवाड मामा, पवार मामा, बागुल मामा, शिवचरण भाऊ मीना ( राजस्थान), रणयेवले मामा व दीपक भाऊ सर्व चौकीदार सोबत आयुष्यातील काही क्षण नक्की व्यतीत करत असे..! माझे सर्वात आवडते ठिकाण हेच रेल्वे गेट होते, जिथं अनेकानेक रेल्वे , त्यातील हजारो भारतीय दररोज नक्कीच दिसायचे..! अगदी निवांतपणा येथे मिळायचा..! शाळेतून आल्यानंतर शक्यतो रात्रीच्या वेळी काही वेळ निवांत बसण्याचं, माझं हक्काचं ठिकाण हेच ..!
या सर्वांची " चौकीदारी " पाहत असताना एक गोष्ट सहज लक्षात येत होती अन् ती म्हणजे...चौकीदारी करतांना या सर्वांना खूप खूप सावध असावे लागे.बऱ्याचदा रेल्वे गेटवर नियम मोडून , गेट खालून आपली वाहने काढणारे भेटायचे..! हे सर्व ग्रेट चौकीदार कुणालाही नियमबाह्य पद्धतीने आपले वाहन काढूच देत नसे.यदा कदाचित जर एखाद्या व्यक्तीने असे केलेच तर त्यांना नाहक " बोलणे " खावे लागत असे..!
जर कुणी रेल्वे गेट बंद असल्यावर आपले वाहन काढलेच तर..हे सर्व " चौकीदार मामा " त्यांना खूप रागवायचे..! नियम मोडून जाणाऱ्यांना रागही यायचा,पण..चौकीदार चौकन्ना असल्यामुळे त्या चुकणाऱ्यांचे काहीच चालत नसे..! चांगल्या गोष्टी करताना अशा अनेक चौकीदारांना अनेकांच्या रोषाला बळी पडावे लागते..! पण अशांच्या रोषांची तमा न बाळगता हे सर्व चौकीदार आपली सेवा प्रामाणिकपणे करत असे..!
मी सुध्दा कधी मधी " मै भी चौकीदार " या भूमिकेत येत असे..! मी सुध्दा छोटी मोठी मदत करत असायचो..! तेंव्हा कळले चौकीदार होणे सोपे नाही..! त्याकरिता समर्पण वृत्ती अन् सजगता फार फार आवश्यक आहे हे समजले..! नियमबाह्य पद्धतीने गेट ओलांडून जाणाऱ्यांना जर जाऊ नाही दिले तर..त्यांना काय लागते
" बोलायला "...?
ता.क.: आयुष्यात प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात चौकीदार असतोच..!
वंदे मातरम्..!
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
स्थळ :भानवाडी रेल्वे चौकी,लासूर स्टेशन.
माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक: १६ एप्रिल २०१७


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा