🔵प्राचीन भारत, भाग क्रमांक- १🔵
🛑प्राचीन भारत वाड्मयीन साधने १🛑
==================================
१) ♦️वैदिक साहित्य♦️
🔵ऋग्वेद🔵
🔶ऋग्वेद,संपूर्ण विश्वातील सर्वात प्राचीन ग्रंथ.
🔶वसिष्ठ,विश्वामित्र, अत्री, भारद्वाज,कण्व, अंगिरस, वामदेव,गृत्समद आदी ऋषींनी याची रचना केली.
🔶ऋग्वेदात एकूण १०,५५२ ऋचा आहेत.अनेक ऋचा मिळून एक सुक्त तयार होते.एकूण १०२८ सूक्ते आहेत.
🔶तत्कालीन हवामान, ऋतू,निसर्गाची वर्णने यात आहेत.
🔵यजुर्वेद🔵
🔶हा यज्ञवेद आहे.ऋग्वेदातील सूक्ते कोणत्या प्रसंगी कशा प्रकारे म्हणायची हे यात आहेत.
🔵सामवेद🔵
🔶भारतीय संगीताचे उगमस्थान सामवेद मध्ये आहे.
🔵अथर्ववेद🔵
🔶रोगनिवारण माहिती,मानवी जीवन समृद्ध करणारे वर्णन यात आहे.
🔴रामायण,महाभारत,पुराणे🔴
===================================
२)♦️बौद्ध साहित्य- त्रिपिटक♦️
◼️विनय पिटक
भिक्षुंच्या आचरण बाबत नियम यात आहेत.
◼️सुक्त पिटक
बौद्ध नीतीचे विवेचन
◼️अभिधम्म पिटक
सुक्त पिटक मधील विषय प्रश्न उत्तराच्या रूपाने हाताळले आहेत.
====================================
३)♦️कौटिल्याचे अर्थशास्त्र♦️
( कौटिल्य म्हणजेच आचार्य चाणक्य )
🔶हा ग्रंथ भारतीय राजकारणाचा विश्वकोश आहे.
🔶यात राजनीतीचे तत्वे व प्रत्यक्ष व्यवहार यांची सुरेख सांगड यात घालण्यात आली आहे.
🔶मौर्य सम्राटांच्या प्रशासन व्यवस्थेचा मूलाधार " अर्थशास्त्र " हा ग्रंथ होता.
==================================
वंदे मातरम्..!
🔵संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🔵संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵दिनांक:३१ मार्च २०२०, मंगळवार
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा