शनिवार, २३ मे, २०२०

प्राचीन भारत भाग क्र. २ 🛑साधने ( पुरातत्त्वीय साधने ) 🛑




🔵प्राचीन भारत भाग क्रमांक- २🔵

🛑भौतिक साधने ( पुरातत्त्वीय साधने )🛑

=================================

🔵उत्खनन🔵

◼️इ. स.१९२२ मध्ये कराचीच्या उत्तरेस २६० मैलावर सिंध प्रांतात लारखाना जिल्ह्यात मोहेंजोदडो ( मृताची टेकडी )
उत्खनन.
◼️डॉ. रखवालदास बॅनर्जी यांना,जगातील अत्यंत प्राचीन संस्कृतीचा शोध लागला.
◼️इ. स.१९२२ मध्येच डॉ.दयाराम साहनी यांनी पंजाब प्रांतात हरप्पा येथे दुसऱ्या प्राचीन नगरचा शोध लावला.
◼️सिंधू संस्कृतीची दोन प्रमुख केंद्रे.
◼️पुढे सर जॉन मार्शल यांच्या देखरेखीखाली  रखवालदास बॅनर्जी व डॉ.दयाराम साहनी यांनी उत्खनन काम १९३० पर्यंत पूर्ण केले.
◼️सिंधूच्या खोऱ्यात विकसित झालेल्या आणि सार्थपणे तिच्याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाच हजार वर्षांपूर्वीच्या या संस्कृती मधील लोकांच्या धर्म कल्पना आजही हिंदू धर्मात आढळून येतात.
◼️मूर्तिपूजा, सर्प पूजा,प्राणी पूजा,वृक्ष पूजा, शिव लिंग पूजा.

🔵अवशेष🔵

◼️स्तंभ,स्तूप, चैत्य,विहार, लेण्या,मूर्ती,मंदिर,चित्रकला
सारनाथ स्तंभ.
◼️मौर्यकालीन बांधकामाचा सर्वोत्कृष्ट नमुना - जगप्रसिद्ध सांचीचा स्तूप .याचा व्यास १२१ फूट , उंची ७७.५ फूट आहे. सम्राट अशोका नंतर सांचीच्या स्तुपात अजून भर पडत गेली.त्याला भव्यता व सौदर्य प्राप्त झाले.

◼️मध्यभारतात बढवाणी जवळ जैन तीर्थंकर ऋषभनाथ यांची भव्य मूर्ती आहे. चित्तोड किल्ल्यात ८० फूट उंचीचा जैन स्तंभ स्थापत्यकलेचा नमुना मानला जातो.
◼️अजिंठा वेरुळ येथील बऱ्याचशा लेण्यांची निर्मिती सातवाहन काळात झालेली आहे.
◼️भारतीय चित्रकलेचे सर्वात प्राचीन रूप अजिंठ्याच्या लेणी क्रमांक ९ व १० मध्ये पहावयास मिळते.
◼️बुध्दगया येथील बौद्ध मंदिर अती भव्य व चित्ताकर्षक असून बौद्ध वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे.

◼️बौद्ध भिक्षूंच्या निवासासाठी सम्राट अशोका ने प्रचंड प्रमाणात मगध प्रांतात  विहार निर्माण केले.त्यामुळेच मगधला विहारांचा देश आणि त्यावरूनच कालांतराने बिहार म्हंटले जाऊ लागले.

🔵आलेख🔵

◼️शिलालेख, स्तंभलेख,प्रशस्ती,ताम्रपट, दानपत्र
भारतीय आलेखांची सुरुवात सम्राट अशोकाच्या राजाज्ञांपासून होते.

=================================

वंदे मातरम्..!

🔵संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🔵संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵दिनांक:१ एप्रिल २०२०, बुधवार.

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा