चिंतन
" थोर राष्ट्रपुरुष शंभू राजांचे भावविश्व...! "
=====================================
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून ज्यावेळी त्याची आई कायमची निरोप घेऊन देवाघरी निघून जाते, खरं तर त्याच वेळी त्या व्यक्तीच्या मग ती व्यक्ती स्री असो अथवा पुरुष त्याचा त्याच क्षणाला त्याच्या आयुष्यातील भावनेला , नियतीकडून बसलेला तो जबर तडाखा असतो..!
कारण आई ही त्या मुलाची जगातील सर्वात प्रिय मैत्रीण असते..!
आई ,त्या मुलाची मायाळू बाप असते..!
आई त्या मुलाच्या भावविश्वात रोज गुंजन करणारी मधमाशी असते..!
अशी मधमाशी जी फक्त आणि फक्त आपल्या लेकराला मकरंद पाजू इच्छिते..!
आणि हीच त्या जगाच्या नियंत्याची भूतलावरील सर्वात मधुर भेट जर कुणा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून अगदी त्याच्या निरागस बालवयात निघून गेली असेल तर....
" ही माझी आई आहे..!" असं नीटपणे माहीत नसतानाच्या वयात निघून गेली असेल तर....
काय भावनेचा नुसता हिंदोळा उडत असेल त्या आईविना पोरक्या लेकराचा..?
मित्रांनो, जे भावनिक आहेत त्यांनी फक्त काही क्षणासाठी वरील विचार अंतर्मनात फक्त एकदाच करून बघा...!
मग आता जे भावूक असतील त्यांच्या सहज लक्षात येईल की,
" काय मनाची अवस्था झाली असेल आपल्या शंभू बाळाची..?"
छोट्याशा शंभू बाळाच्या खूप तरल मनाच्या भावनेला नियतीने केलेला तो पहिला आघात होता..!
आई नसतानाही सक्षमपणे आयुष्यात कसं उभा रहायचं ते शिकावं फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्याचे धाकटे छत्रपती वंदनीय व्यक्तिमत्त्व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावरून..!
पण एक खात्रीने सांगतो की,ज्यावेळी नियती एक मार्ग बंद करते,त्याचवेळी तीच नियती दुसरा मार्ग उपलब्ध करून देत असते..! छोट्याश्या शंभू बाळाची आई, सईबाई माता जरी नियतीने हिरावून घेतली होती तरी त्याच नियतीने त्याच आईची जागा ,आपल्या सर्वांची आई, जिजाऊ साहेब यांच्या रूपाने भरून काढली होती..! बाळ शंभू नशीबवान होते की,त्यांना आई जिजाऊ साहेब यांच्या रूपाने मिळाली होती..! जगातलं सर्वात श्रेष्ठ मातृत्व अन् ममत्व आई जिजाऊ साहेब यांचच होतं अन् नियतीने ते महान मातृत्व अन् ममत्व बाळ शंभू राजांच्या आयुष्यात बहाल केले होते..!
पण....नियतीने पुन्हा तिचा फणा वर काढला अन्...........
आई जिजाऊ साहेब यांना नियतीने, शंभू राजांच्या ऐन तारुण्यातील काळाच्या उंबरठ्यावर हिसकावून घेतले..! पुन्हा तीच भयाण शांतता पसरली असेल..त्या युपुरूषाच्या अंतर्मनात..!
आई ,हयात नसल्यावर माझ्या स्वतच्या अनुभवावरून सांगतो की ,एक मुलगा त्याच्या आयुष्यातील बरीच मनाची कल्लोळे कुठचं व्यक्त करत नाही..! ती मनाची कल्लोळ ,ते बिना आईचं लेकरू मनातल्या मनात पिऊन स्वतचं स्वतची आई होऊन हुंदके देत बसतं...निवांतपणे एका कोपऱ्यात..!
अगदी अशीच अवस्था छत्रपती संभाजी महाराज यांची संपूर्ण हयातभर झाली असेल हे मी खात्रीने सांगतो..! मनाचे हे हुंदके व्यक्त करायला ना..आबासाहेब जवळ होते ना आई सईबाई जवळ होत्या..! ना जिजाऊ साहेब जवळ होत्या..! अशावेळी कोणताही माणूस मानसिकदृष्ट्या खचून जातो..! पण अशाही अवस्थेत सुध्दा सक्षम कसं असावं याचे जगतील एकमेव उदाहरण म्हणजे वंदनीय छत्रपती संभाजी महाराज हेच होय ..! बाकी दुसरे कुणीच नाही..!
थोरल्या महाराजांनी असं काही अतुलनीय कार्य करून ठेवलं आहे की, आपल्या पिढीने इकडं तिकडं कुठेही जायची गरजच नाही..! सगळं काही थोरले महाराज व धाकटे महाराज यांच्या आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगावरून सहजपणे लक्षात येते..! आपल्या अतुलनीय धडासाच्या बळावर ,ज्यावेळी चहूबाजूंनी हिंदवी स्वराज्यावर शत्रू चाल करून येत होते,त्यावेळी आपल्या निधड्या छातीने शंभू राजांनी त्या गानिमांना यशस्वी तोंड दिले होते..! ज्यावेळी वंदनीय छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील उच्च कोटीचा कर्तृत्वाचा ठसा आपल्या आबासाहेबांना आणि आऊसाहेबांना दाखवावा वाटला होता,त्यावेळी ही दोन्ही श्रद्धेय व्यक्तिमत्वे हयातीत नव्हती..! शक्ती, भक्ती आणि युक्ती याचा सुंदर मिलाफ म्हणजे वंदनीय छत्रपती संभाजी महाराज होय..!
पण आम्ही कधी यांच्या या भावविश्वात डोकावून पाहतच नाही..! आपण फक्त डोकावून पाहतो यांच्या लढाईच्या मैदानात ..! उठसुठ कुणीही येतो अन् खरं जमिनीवरील प्रत्यक्ष कार्य केलेल्या राष्ट्रपुरुषांना नावे ठेवून जातो...! किंवा राष्ट्रपुरुषांच्या नावाचा स्वतच्या तुंबड्या भरण्यासाठी उपयोग करून घेतो.! किंवा राष्ट्रपुरुषांच्या जाती शोधून त्यावर स्वतच्या राजकीय,सामाजिक आणि आर्थिक दुकाना भरून घेतो..!
असं ज्यावेळी होते त्यावेळी मनाला खूप वेदना होतात...!
पण काय करणार...! मनातील हे भावनेचे कल्लोळ व्यक्त करायला माझी पण आई... शोभाबाई जिवंत नाही..!😔
असो, आज हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे..! त्यानिमित्त या महान राष्ट्रपुरुषाला माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून विनम्र अभिवादन..!🙏🌹
जय जिजाऊ..!
जय शिवराय..!
जय शंभु राजे..! आणि........
वंदे मातरम्..!
ता.क.: या लेखाचे हक्क माझ्याकडे राखून आहेत.कुणीही लेखाच्या शेवटी स्वतः चे नाव लिहून कॉपी पेस्ट करू नये.नसता असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.. !
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा