🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक १८ 🛑
🔵आग्नेय आशियाशी संबंध - भाग :३🔵
==================================
🧿 चंपा प्रदेश 🧿
( आजच्या व्हिएतनाम चा पूर्व किनाऱ्याचा प्रदेश )
🔘 आज व्हिएतनाम म्हणून ओळखल्या जाणारा इंडो चायनाच्या पूर्व किनाऱ्याचा प्रदेश पूर्वी ' अनाम ' या नावाने ओळखला जात असे.
🔘 इ. स.च्या दुसऱ्या शतकात श्रीमार या हिंदू राजाने दक्षिण अनाम मध्ये आपले राज्य स्थापन केले.
🔘 श्रीमारची राजधानी ' चंपानगरी ' होती, म्हणून हा प्रदेश चंपा म्हणून ओळखल्या जाऊ लागला.
🔘 या प्रदेशातील लोकांना ' चम ' असे म्हणत असे.
🔘 हिंदू राजा श्रीमार याने चीनची अनाम वरील सत्ता झुगारून चंपावर आपला अंमल प्रस्थापित केला.
🔘 इ. स.२४८ मध्ये चंपाच्या हिंदू राजाने टोकीनवर आक्रमण करून काही प्रदेश ताब्यात घेतला.अखेर चीनला , इ. स.२८० मध्ये चंपाच्या हिंदू राज्याशी तह करावा लागला.
♦️राजा भद्रवर्मन ♦️
🔘 इ. स.३४० मध्ये चंपामध्ये नवीन राजघराणे गादीवर आले.
🔘 या घराण्यातील राजा भद्रवर्मन याने आपल्या राज्याचे तीन प्रांत केले...
१) अमरावती ( उत्तर विभाग )
२) विजय ( मध्य विभाग )
३) पांडुरंग ( दक्षिण विभाग )
🔘 राजा भद्रवर्मन हा शैव पंथीय होता.त्याने भद्रेश्र्वर स्वामी हे शिव मंदिर बांधले.
♦️राजा गंगाराज ♦️
🔘 राजा भद्रवर्मन यांच्या नंतर त्यांचा मुलगा राजा गंगाराज हा गादीवर आला.
🔘 तेथील संस्कृत आलेख नुसार राजा गंगाराज याने राजत्याग करून आपले उर्वरित आयुष्य गंगा नदीच्या काठी घालविले.
🔘 इ. स.४४६ मध्ये चिनी सैन्याने राजधानी चंपानगरी लुटली.अखेरीस सातव्या आठव्या शतकात चीनला वार्षिक खंडणी देणारे दुय्यम दर्जाचे चंपा राज्य बनले.
♦️ पांडुरंग वंश ♦️ ( इ. स.७५७ ते ८६० )
🔘 इ. स.७५७ ते ८६० दरम्यान चंपावार पांडुरंग वंशाचे राज्य होते.
🔘 इ. स.८६० ते ९८५ या काळात भृगवंश चंपावर राज्य करत होता.
🔘 इ. स.९६८ मध्ये चंपाच्या उत्तरेस अनामी लोकांचे राज्य स्वतंत्र राज्य उदयाला आले.
🔘 इ. स.९७१ नंतर चंपा व अनामी सत्ता यांच्यात सतत पन्नास वर्षे युद्ध सुरू होते.
🔘 अखेर इ. स.१०४३ मध्ये अनामी सम्राटाने चंपावर हल्ला केला.चंपा राजा धारातीर्थी पडला.
♦️राजा परमेश्वरवर्मदेव♦️
🔘 इ. स.१०५० मध्ये चंपा गादीवर राजा परमेश्वरवर्मदेव हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजा झाला.
🔘 याने प्रांतातील बंडाळी मोडून काढली.
🔘 चंपा राज्यातील विध्वंस झालेल्या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
🔘 अनाम व चीनशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून चंपा मध्ये शांततापूर्ण स्थैर्य निर्माण केले.
🔘 चंपा राज्याला पूर्वीपेक्षा अधिक बलवान अवस्थेत माघारी सोडून राजा परमेश्वरवर्मदेव इ. स.१०५९ मध्ये मरण पावला.
♦️ राजा रूद्रवर्मन♦️
🔘 राजा परमेश्वरवर्मदेव नंतर चंपा गादीवर आलेल्या राजा रूद्रवर्मन याला चंपा ची सुस्थिती राखता आली नाही.
🔘 अखेरीस इ. स.१३१२ मध्ये अनामी सम्राटाने चंपा राज्यावर आक्रमण करून संपूर्ण चंपा राज्यावर आपली निर्णायक सत्ता प्रस्थापित केली.
🔷🔹सारांश🔹🔷
⚫ चंपा ( आजच्या व्हिएतनाम चा पूर्व किनाऱ्याचा प्रदेश ) मध्ये सर्वत्र भारतीय संस्कृतीचे अवशेष आढळून आले आहेत.
⚫ निरनिराळ्या हिंदू राजांनी चंपा राज्यावर इ. स.दुसऱ्या शतकापासून ते चौदाव्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत राज्य केले.
⚫ चंपात हिंदू धर्म व बौद्ध धर्माचा प्रसार झालेला असला तरी चंपात प्राबल्य होते शैव पंथाचे.
⚫ इतिहासकार डॉ. आर. सी.मुजुमदार यांनी तपासलेल्या १३० शिलालेख पैकी ९२ शिलालेखात शिवाचा उल्लेख आढळतो.
⚫ इ. स. च्या नवव्या शतकाच्या नंतर चंपा राज्यात बौद्ध धर्माला महत्त्व प्राप्त झाले.
⚫ चंपा राज्यातील समाजरचना चातुर्वर्ण्य पद्धतीवर आधारित होती.
⚫ भद्रेश्वरलिंग ही राष्ट्रीय देवता होती.चंपा येथील मंदिराची शिल्पकला ही बदामी,कांजीवरम, मामल्लपुरम येथील मंदिराच्या शिल्पकलेशी सांधर्म्य राखून आहे.
==================================
वंदे मातरम्..!🙏
🧿 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🧿 संकलन व अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🧿 दिनांक: २६ एप्रिल २०२०, रविवार.
आग्नेय आशियाशी संबंध-
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा