शनिवार, २३ मे, २०२०

प्राचीन भारत भाग क्र.१७ 🛑आग्नेय आशियाशी संबंध - भाग :२🛑



🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक १७ 🛑

🛑आग्नेय आशियाशी संबंध - भाग :२🛑

=================================

🧿 कंबुज ( कंबोडिया )🧿

 ♦️ जयवर्मन दुसरा ♦️

🔘 जयवर्मन दुसरा याने शैलेंद्र सम्राटांचे अधिपत्य झुगारून देऊन कंबुज चे स्वातंत्र्य पुन्हा प्रस्थापित केले.
🔘 जयवर्मन दुसरा यावे हरिहरालय व अमरेंद्रपूर या नवीन राजधान्या वसविल्या.
🔘 शेवटी आपली राजधानी अंकोरथोम (नगरधाम ) येथे कायम केली.

♦️जयवर्मन  तिसरा ♦️

🔘 जयवर्मन दुसरा याच्या मुलाचे नाव जयवर्मन तिसरा होय.
🔘 जयवर्मन  तिसरा याच्या साम्राज्यात संपूर्ण इंडो चायना चा समावेश होता.

♦️ इंद्रवर्मन ♦️   ( इ.स. ८७७ ते ८८९)

🔘 पुढील काळात कंबुज ( कंबोडिया ) मध्ये  इंद्रवर्मन  या राजाने नवीन राजघराण्याची स्थापना केली.
🔘 याने अनेक शिव मंदिरे बांधली.

♦️सम्राट यशोवर्मन ♦️  (इ.स.८८९ ते ९००)

🔘 यशोवर्मन हा कंबुज ( कंबोडिया )  साम्राज्यातील सर्वात बलिष्ठ सम्राट होता.
🔘  यशोवर्मन यांच्या काळातील अनेक संस्कृत आलेख उपलब्ध आहेत.
🔘 याने संस्कृत वाड्मयाला प्रोत्साहन दिले.
🔘 आजच्या अंकोरथोम (नगरधाम ) जवळ यशोवर्मनने स्थापन केलेली  ' यशोधरपूर ' ही नवीन राजधानी पुढे अनेक शतके कंबोडिया ची राजधानी होती.
🔘सुप्रसिद्ध बेयाॅन शिव मंदिर व यशोधर तलाव ही सम्राट यशोवर्मनची स्मारके आहेत.
🔘 सुप्रसिद्ध बेयाॅन शिव मंदिर हे पिरॅमिड च्या आकाराचे विशाल तीन मजली आहे.याला चाळीस उंच शिखरे आहेत.ध्यानस्थ शिवाचे मुख आहे.बेयाॅन शिव मंदिर येथील भिंतीवर रामायण,महाभारतातील अनेक प्रसंगावर आधारित अनेक कलात्मक व उठावदार चित्रे रेखांकित केलेली आहेत.

♦️ सूर्यवर्मन दुसरा ♦️  ( इ.स.१११३ ते ११४५)

🔘 सूर्यवर्मन दुसरा या अत्यंत सामर्थ्यशाली राजाने कंबुज ( कंबोडिया ) चे पुन्हा एकीकरण करून विस्तीर्ण साम्राज्य प्रस्थापित केले.
🔘 त्याच्या साम्राज्यात मलाया द्वीपकल्पाचा उत्तरेकडील भाग व ब्रम्हदेशाचा ( आजचे म्यानमार ) काही भाग यांचाही समावेश होता.
🔘 सूर्यवर्मन दुसरा याने अनेक वैदिक यज्ञ केले.
🔘 सूर्यवर्मन दुसरा अतिशय धार्मिक प्रवृत्तीचा राजा होता.
🔘 जगातील एक आश्चर्य मानल्या गेलेले '  अंगकोरवट '
हे विष्णु मंदिर सूर्यवर्मन दुसरा यानेच बांधले.

♦️ जयवर्मन सातवा♦️  ( इ.स.११८१ ते १२२१)

🔘 जयवर्मन सातवा हा  कंबुज ( कंबोडिया ) चा शेवटचा पराक्रमी व सामर्थ्यवान राजा होय.
🔘  जयवर्मन सातवा याचे राज्य बंगालच्या उपसागरापासून ते चिनी समुद्रापर्यंत पोहचले होते.
🔘 जयवर्मन सातवा याने बांधलेल्या मंदिरातून ४३९ आचार्य विद्यादानाचे कार्य करत असे.
🔘 जयवर्मन सातवा याच्या काळात ७९८ मंदिरे व १०२ इस्पितळे होती.
🔘 यांच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी १२१ धर्मशाळा बांधण्यात आल्या होत्या.
🔘 जयवर्मन सातवा याने अंगकोरवट या विष्णु मंदिराच्या उत्तरेस एक मैलावर ' अंगकोरथोम ' ही नवी अती भव्य राजधानी वसविली.
🔘आज या राजधानीचे भग्नावशेष पाहून प्रेक्षक थक्क होतात.
🔘 १३ व्या शतकाच्या अखेर कंबुज ( कंबोडिया ) च्या वैभवाचा शेवट झाला.
🔘१५ व्या शतकात पूर्वेकडून अनामी सत्ता व पश्चिमेकडून थाई सत्ता यांनी आक्रमणे करून कंबुज ( कंबोडिया ) राज्याचा शेवट केला.

==================================

ता.क.- सूर्यवर्मन दुसरा याने ,जगातील एक आश्चर्य मानल्या गेलेल्या ' अंगकोरवट ' या अतिभव्य विष्णु मंदिराच्या विषयी माझे मित्र, लेखक आदरणीय रवी भाऊ वाळेकर यांचा लेख स्वतंत्रपणे माझ्याच फेसबुक भिंतीवर  शेयर करणार आहे.लेखक रवी वाळेकरजी, स्वतः तिथं जाऊन प्रत्यक्ष पाहून,निरीक्षण करून या अतिभव्य विष्णु मंदिरा विषयी आपले अनुभव लिखाण केले आहे.यावरच लेखक रवी वाळेकर  यांचे ' कंबोडायन ' हे प्रसिद्ध पुस्तक प्रकाशित झालेले आहे..!

वंदे मातरम्..!

संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

संकलन व अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

दिनांक:  २४ एप्रिल २०२०, शुक्रवार

आग्नेय आशियाशी संबंध-
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा