🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक २३ 🛑
🧿 कांचीचे पल्लव घराणे 🧿
==================================
१) ♦️ बाप्पादेव ♦️
🔘 इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात बाप्पादेव याने कांची येथे स्वतंत्र राज्याची स्थापना केली.
२) ♦️ विष्णुगोप♦️
🔘 इसवी सनाच्या चौथ्या शतकातील पल्लव राजा विष्णुगोप याचा समुद्रगुप्ताने पराभव केला होता,हे अलाहाबादच्या ( आजचे प्रयागराज ) स्तंभलेख वरून समजते.
३) ♦️ सिंहविष्णू ♦️ इ.स. ५७५ ते ६००
🔘पल्लव घराण्यातील सिंहविष्णू यांच्या पासून सुसंगत माहिती मिळते.
🔘 यांनी कृष्णे पासून ते कावेरी पर्यंत राज्यविस्तार केला.
४) ♦️ महेंद्रवर्मन पहिला♦️ ( इ.स.६०० ते ६३०)
🔘 सिंहविष्णू नंतर त्याचा मुलगा महेंद्रवर्मन पहिला गादीवर आला.
🔘 एकसंघ दगडातून मंदिर खोदून काढण्याची पद्धत महेंद्रवर्मन पहिला यांनी सुरू केली.
🔘 यांच्या कारकिर्दीत त्रिचिरापल्ली,चिंगलपुट या ठिकाणी अनेक मंदिरे बांधली.
🔘 महेंद्रवर्मन पहिला यांनी ' मत्तविलास ' हे संस्कृत भाषेत प्रहसन व संगीतावर एक ग्रंथ लिहिला होता.
🔘 महेंद्रवर्मन पहिला हा सुरुवातीच्या काळात जैन धर्माचा पुरस्कर्ता होता,परंतु नंतरच्या काळात तो कट्टर शिवभक्त बनला.
५) ♦️नरसिंहवर्मन पहिला♦️ इ.स.६३० ते ६६८
🔘महेंद्रवर्मन पहिला यांच्या नंतर त्यांचा ज्येष्ठ पुत्र
नरसिंहवर्मन पहिला हा पल्लव गादीवर आला.हा पल्लव घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा होय.
🔘 नरसिंहवर्मन पहिला याने सिलोन ( आजची श्रीलंका ) वर नाविक हल्ले करून सिलोन वर ताबा मिळवला आणि सिलोन च्या गादीवर मानवर्मन याला बसविले.
🔘 नरसिंहवर्मन पहिला याने महाबलीपुरम हे नगर वसवून तेथे अनेक मंदिरे बांधली.
६) ♦️महेंद्रवर्मन दुसरा ♦️
🔘 नरसिंहवर्मन पहिला यांच्यानंतर पल्लव गादीवर आलेला त्यांचा मुलगा महेंद्रवर्मन दुसरा याने फक्त दोन वर्ष राज्य केले.
७)♦️ परमेश्वरवर्मन पहिला♦️ ( इ.स.६७० ते ६९५)
🔘 महेंद्रवर्मन दुसरा यांच्या नंतर पल्लव गादीवर त्यांचा मुलगा परमेश्वरवर्मन पहिला हा इ. स.६७० मध्ये गादीवर आला.
🔘 परमेश्वरवर्मन पहिला हा शिव उपासक होता.त्याने कांचीला शिव मंदिर बांधले.
८) ♦️ नरसिंहवर्मन दुसरा ♦️ (इ. स.६९५ ते ७२२)
🔘 परमेश्वरवर्मन पहिला यांच्यानंतर त्यांचा मुलगा नरसिंहवर्मन दुसरा पल्लव घराण्यातील राजा झाला.
🔘 नरसिंहवर्मन दुसरा यांच्या काळात द्रविडी पद्धतीच्या शिल्पकलेला सुरुवात झाली.
🔘 नरसिंहवर्मन दुसरा यांनी बांधलेले कांचीचे
' कैलासनाथ मंदिर ' विख्यात आहे.कांचीला दक्षिण काशी देखील म्हणतात.
🔘 प्रसिद्ध संस्कृत ग्रंथकार दंडी नरसिंहवर्मन दुसरा यांच्या दरबारी होता.
९) ♦️परमेश्वरवर्मन दुसरा ♦️
🔘 नरसिंहवर्मन दुसरा यांच्यानंतर पल्लव गादीवर त्यांचा मुलगा परमेश्वरवर्मन दुसरा हा आला.
🔘 इ. स.७३० मध्ये त्याच्या मृत्यू नंतर, त्याला संतती नसल्याने कांचीच्या राज्यात यादवी माजली.
🔘 शेवटी लोकांनी पल्लव घराण्यातील नंदीवर्मन याला गादीवर बसविले.
१०) ♦️नंदीवर्मन ♦️ (इ. स.७३० ते ८००)
🔘 नंदीवर्मन दुसरा हा गादीवर आला त्यावेळी त्याचे वय बारा वर्षाचे होते.त्याने सत्तर वर्षे राज्य केले.
🔘 इ. स.७५० मध्ये राष्ट्रकूट राजा दन्तिदुर्गाने नंदीवर्मन दुसरा यांच्यावर आक्रमण करून कांची जिंकले, परंतु दन्तिदुर्गाने आपल्या मुलीचा विवाह नंदीवर्मन दुसरा याच्याशी लावून देऊन तह केला.
🔘 नंदीवर्मन दुसरा हा शिवभक्त होता.कांची येथे त्याने मुक्तेश्वर मंदिर बांधले.
११) ♦️ दन्तिवर्मन ♦️
🔘 नंदीवर्मन दुसरा यांच्या नंतर त्यांचा मुलगा दन्तिवर्मन हा गादीवर बसला.
१२) ♦️नंदीवर्मन तिसरा ♦️
१३) ♦️ नृपतुंगवर्मन♦️
१४) ♦️ अपराजितवर्मन ♦️
🔘 इसवी सनाच्या नवव्या शतकाच्या शेवटी चोल राजा आदित्य पहिला याने अपराजितवर्मन यांचा निकाली पराभव केला आणि पल्लव सत्तेचा शेवट केला.
🧿 योग्यता🧿
🔘 पल्लव घराण्याच्या काळात दक्षिण भारतात वैदिक धर्माचा प्रसार झपाट्याने झाला.
🔘 पल्लवांनी ब्राम्हण व संस्कृत भाषेला राजाश्रय दिला.
🔘 भारतीय संस्कृतीचा आग्नेय आशियातील भागात प्रसार करण्यात पल्लवांचा सिंहांचा वाटा आहे.
🔘महाबलीपुरम येथील मंदिरे पल्लवांच्या राजवटीची व त्यांच्या काळातील कलेची अमर स्मारके आहेत.
🔘 पल्लवांची राजधानी कांची विद्येचे माहेरघर व दक्षिणेची काशी म्हणून मान्यता पावले होते.
==================================
🔵 वंदे मातरम्..!
🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵 दिनांक: ३ मे २०२०, रविवार
🔴 प्राचीन भारत-
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा