शनिवार, २३ मे, २०२०

प्राचीन भारत भाग क्र.१४ 🛑 वाकाटक घराणे 🛑




🔵 प्राचीन भारत भाग क्रमांक : १४ 🔵

🛑 वाकाटक घराणे 🛑

==================================

🔶वाकाटक हे गुप्तांचे समकालीन होते.
🔶वाकाटक घराण्याने विदर्भावर ३०० वर्षे राज्य केले.
🔶वाकाटक व गुप्त घराण्यात वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले.

♦️पहिला विंध्यशक्ती  ( इ.स.२५० ते २७० )♦️

🔘पहिला विंध्यशक्ती  याने वाकाटक वंशाची  स्थापना केली.
🔘वाकाटक विष्णुवृध्द गोत्राचे ब्राम्हण होते.
🔘चनका ही त्याची राजधानी.

♦️पहिला प्रवरसेन  ( इ. स.२७० ते ३३०)♦️

🔘पहिला विंध्यशक्तीच्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन राजा झाला.
🔘उत्तम सेनानी.
🔘पहिला प्रवरसेन  हा वैदिक धर्माचा अभिमानी होता.
🔘पहिला प्रवरसेन यांच्या मृत्यू नंतर त्याच्या साम्राज्याची वाटणी गौतमीपुत्र व सर्वसेन या त्याच्या दोन पुत्रांमध्ये झाली.
🔘वाकाटक घराण्याच्या दोन शाखा झाल्या.
__________________________________________

🛑वाकाटकांची जेष्ठ शाखा🛑

१) ♦️पहिला रुद्रसेन  ( इ. स.३३० ते ३५०)♦️

🔘पहिला प्रवरसेन यांच्या मृत्यू नंतर त्याच्या गौतमीपुत्र या मुलाचा मुलगा म्हणजेच पहिला प्रवरसेन यांचा नातू पहिला रुद्रसेन  हा इ. स.३३० मध्ये वाकाटक ज्येष्ठ शाखेच्या गादीवर आला.
🔘पहिला रुद्रसेन हा गुप्त घराण्यातील समुद्रगुप्त यांचा समकालीन होता.
🔘याने वाकाटक साम्राज्याची जोपासना केली.
पुरिका ही राजधानी केली

२) ♦️पहिला पृथ्वीसेन‌ ( इ.स.३५० ते ४००)♦️

🔘पहिला रुद्रसेन  यांच्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा पहिला पृथ्वीसेन‌ वाकाटक ज्येष्ठ शाखेच्या गादीवर आला.
🔘हा गुप्त घराण्यातील चंद्रगुप्त विक्रमादित्य यांचा समकालीन होता.
🔘पहिला पृथ्वीसेन‌ शिवभक्त होता.

३) ♦️दुसरा रुद्रसेन ( इ. स.४०० ते ४०५)♦️

🔘पहिला पृथ्वीसेन‌ याचा मुलगा दुसरा रुद्रसेन होय.
🔘याला दिवाकरसेन व दामोदरसेन दोन मुले होती.

४) ♦️दिवाकरसेन ( इ.स.४०५ ते ४२०)♦️

🔘दुसरा रुद्रसेन यांच्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा दिवाकरसेन हा वाकाटक ज्येष्ठ शाखेच्या गादीवर आला.
🔘हा पित्याच्या मृत्यूच्या वेळी अल्पवयीन असल्याने याच्या नावाने त्याची आई प्रभावती गुप्ता राज्यकारभार पाहू लागली.
🔘दिवाकरसेनची आई, प्रभावती ही चंद्रगुप्त विक्रमादित्य याची कन्या होती.
🔘चंद्रगुप्त विक्रमादित्य याने दिवाकरसेन यांच्या शिक्षणासाठी आपल्या दरबारातील कालिदास यांना पाठवले.
🔘प्रभावती गुप्ता ही प्राचीन भारताच्या इतिहासातील कर्तबगार स्री होती.

५)♦️ दुसरा प्रवरसेन  ( इ.स.४२० ते ४५०)♦️

🔘ज्येष्ठ बंधू दिवाकरसेन यांच्या मृत्यू नंतर त्याचा लहान भाऊ दामोदरसेन हा वाकाटक ज्येष्ठ शाखेच्या गादीवर आला.
🔘दिवाकरसेन याने ' दुसरा प्रवरसेन ' हे नाव धारण केले.
हा शांतताप्रिय होता.हा शिवभक्त होता.

६) ♦️नरेंद्रसेन ( इ.स.४५० ते ४७० )♦️

🔘दामोदरसेन उर्फ दुसरा प्रवरसेन यांच्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा नरेंद्रसेन हा वाकाटक ज्येष्ठ शाखेच्या गादीवर आला.

७) ♦️दुसरा पृथ्वीसेन ( इ.स.४७० ते ४९०)♦️

🔘नरेंद्रसेन यांच्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा दुसरा पृथ्वीसेन हा वाकाटक ज्येष्ठ शाखेच्या गादीवर आला.
🔘हा वाकाटक ज्येष्ठ शाखेचा शेवटचा राजा होता.
🔘याने आपली राजधानी प्रवरपूरहून हलवून पद्मपूर ( भंडारा जिल्ह्यातील आमगावजवळ )येथे नेली.
🔘इ. स.४९० मध्ये दुसरा पृथ्वीसेन यांच्या मृत्यू नंतर वाकटकांच्या ज्येष्ठ शाखेचा प्रदेश वाकाटकांची दुसरी शाखा ' वाकाटक वत्सगुल्म ' मध्ये समाविष्ट झाला.

🔘एकंदरीत वाकाटक ज्येष्ठ शाखेने इ. स.३३० ते ४९० असे  एकूण १६० वर्षे राज्य केले.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

🛑वाकाटकांची दुसरी शाखा ' वाकाटक वत्सगुल्म '🛑

♦️१) सर्वसेन (इ.स.३३० ते ३५५)♦️

 🔘पहिला प्रवरसेन चा धाकटा मुलगा सर्वसेन याने वत्सगुल्म ( वाशिम ) येथे वत्सगुल्म शाखेची स्थापना केली.
🔘याचे राज्य उत्तरेस विंध्याद्री पर्वत ते दक्षिणेस गोदावरी पर्यंत होते.
🔘वत्सगुल्म ( वाशिम ) ही यांची राजधानी होती.

२) ♦️दुसरा विंध्यशक्ती ( इ. स.३५५ ते ४००)♦️

🔘दुसरा विंध्यशक्ती हा वाकाटक ज्येष्ठ शाखेतील पाहिल्या पृथ्वीसेनचा समकालीन होता.

३) ♦️देवसेन ♦️

🔘वत्सगुल्म शाखेत देवसेन हा इ. स.४५० मध्ये गादीवर आला.
🔘याचा सचिव हस्तिभोज हा मुत्सदी होता.
🔘यानेच अतिशय दक्षतेने राज्यकारभार पाहिला.

४) ♦️हरिसेन ( इ. स.४७५ ते ५००)♦️

🔘वत्सगुल्म शाखेचा हा शेवटचा राजा होता.
🔘अरबी समुद्र पासून ते बंगालच्या उपसागर पर्यंत विशाल प्रदेश हरिसेन यांच्या ताब्यात होता.
🔘हरिसेन याचा सचिव हस्तिभोजाचा पुत्र वराहदेव बौद्ध धर्मीय होता.
🔘वराहदेव याने अजिंठा येथील लेणी क्रमांक १६ खोदविले.
तसेच अजिंठ्या पासून दहा मैलावर घटोत्कच लेणी देखील वराहदेव यानेच खोदविले.

==================================

🔵वंदे मातरम्..!

🔵संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵संकलन व अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵दिनांक:  १९ एप्रिल २०२०, रविवार.
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा