🔵 प्राचीन भारत, भाग क्रमांक: १३ 🔵
⚫ हूणांचे आक्रमण ⚫
==================================
⬛ हूणांचे आक्रमण ⬛
◼️इ. स.पूर्व दुसऱ्या शतकात चीनच्या पश्चिम सरहद्दीवर टोळ्या टोळ्यांनी राहणारी हूण ही एक लुटारू जमात होती.
◼️इ. स.४४० च्या सुमारास हूणांच्या विध्वंसक टोळ्या भारताच्या वायव्य खिंडीतून पंजाब मध्ये घुसल्या.
◼️त्यांनी गुप्त साम्राज्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली.
♦️हूण तोरमाण राजा♦️
◼️इ.स.४८४ च्या सुमारास हूणांच्या विध्वंसक टोळ्या पुन्हा भारतात घुसल्या.
◼️हूणांचा राजा तोरमाण यांच्या नेतृत्वाखाली गुप्त साम्राज्यावर हल्ले करण्यास सुरुवात.
◼️राजा तोरमाण चे एरण ( सागर जिल्हा, गुजरात )व कुरा येथील दोन शिलालेख उपलब्ध आहेत.
◼️जैन ' कुवलयमाला ' या ग्रंथात तोरमाणाला उत्तरपथाचा राजा असे म्हंटले आहे.
◼️जैन साहित्यातील माहितीनुसार तोरमाणाने जैन धर्माचा स्वीकार केला आणि तो चीनाबच्या काठी पव्वैया येथे राहू लागला.
♦️ हूण मिहीरकुल राजा♦️
◼️तोरमाणाच्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा मिहीरकुल ( मिहीरगुल ) इ. स.५१५ मध्ये राजा झाला.
◼️शाकल ( सियालकोट ) ही त्याची राजधानी होती.
◼️मिहीरकुल अत्यंत क्रूर होता.
◼️माळव्याचा राजा यशोधर्मन या पराक्रमी राजाने
इ. स.५३३ मध्ये मिहीरकुलचा पराभव केला.
◼️हूणांच्या विनाशकारी आक्रमणांनी वायव्य भारतातील बौद्ध धर्माला जबरदस्त तडाखा बसला.
◼️हूणांनी असंख्य बौद्ध स्तूपांचा, विहारांचा विध्वंस केला.
त्यामुळं वायव्य भारतातून बौद्ध धर्माचे जवळपास उच्चाटन झाले.
◼️हूणांच्या जुलुमामूळे हूणसत्ता कधीच स्थिर झाली नाही.
==================================
🔵वंदे मातरम्..!
🔵संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🔵संकलन व अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵दिनांक: १८ एप्रिल २०२०, शनिवार
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा