मला प्रवासात भेटलेली माणसं
" खळखळून हसणारे व्यक्तिमत्त्व बाळू पाटील निघोटे...! "
__________________________________________
मृत्यू...! एक चिरंतन व शाश्वत सत्य..!! परंतु तो जर अकल्पनीय व अचानक आला तर...ज्या प्रिय व्यक्तीचा असा स्वर्गवास होतो,तेंव्हा मात्र माझ्यासारख्याच मन एकदम शून्य अवस्थेत जाते..! काहीच सुचत नाही..!
आज दिनांक १६ जून २०१७ रोजी,,माझे परमस्नेही बाळकृष्ण साहेबराव पाटील (बाळू काका पाटील) रा.हडस पिंपळगाव,ता.वैजापूर यांच्या निधनाची दुःखद वार्ता माझ्या कानी पडली अन् मी स्तब्धच झालो..! माझा प्रिय विद्यार्थी व बाळू पाटील यांचा पुतण्या किशोर नारायण निघोटे याने मला ही दुःखद वार्ता सांगितल्यावर मी पुन्हा,पुन्हा खात्री करून विचारात गेलो...!कारण मन विश्वास ठेवायला तयारच नव्हते..! मनातील आठवणींच्या ढगांनी आदरणीय स्व.बाळू पाटील यांच्या विषयी गत आठवणींनी गर्दी करायला सुरुवात केली..!
बाळू पाटील, अतिशय दिलदार माणूस..! माझा आणि त्यांचा परिचय १९९९ पासूनचा..! मी प्रा.शिक्षक म्हणून जळगावहून हडस पिंपळगाव येथे हजर झालो..! हड्स पिंपळगाव व माझे वैचारिक व वैयक्तिक श्रद्धेच्या बाबतील तंतोतंत सुर जुळले..! कारण मी सद्गूरू जनार्दन स्वामी (बाबाजी)यांच्या धार्मिक विचारांचा अनुष्ठानार्थी व पिंपळगाव देखील याच विचाराने श्रध्देय असलेले गाव..! याच गावातील जी लोकं नेतृत्व करणारी मंडळी होती,त्यात बाळू पाटील नेहमी अग्रेसर ..! ते स्वतः बाबाजींच्या विचारांचे निष्ठावंत सेवेकरी...! बाळू पाटील ,जेवढे धार्मिक होते ,तितकेच ते खेळकर स्वभावाचे देखील होते..!
आमच्या गावी(पालखेड,ता.वैजापूर)श्री.पारेश्र्वर महाराज यात्रे निमित्त क्रिकेट स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात.इ.स.२००० साली स्व.बाळू पाटील व स्व.ज्ञानेश्वर पाटील निघोटे( ज्यांना आम्ही सर्व पंच म्हणायचो ) यांनी ,त्यांचा क्रिकेटचा संघ ,साखळी सामन्यात उतरविला होता..! मी ,त्यावेळी त्यांच्या विरोधात " रामजाने क्रिकेट संघ-पालखेड कडून खेळलो होतो..! शाळेला सहकार्य करण्यात हडस पिंपळगाव येथील सर्वच माणसं अतिशय अतिशय खिलाडवृत्तीची अन् सर्व शिक्षकांशी प्रेमाने वागणारी माणसं..! माझ्या आज पर्यंतच्या शिक्षकी आयुष्यात , शाळेसाठी कोणतेही सहकार्य करण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या नागरिकांच्या श्रेणीत हडस पिंपळगाव येथील सर्व माणसं नक्कीच सर्वोच्च स्थानी आहेत..!
इ.स.२००० साली, माझे लग्न ठरले..! मला आजही ते प्रसंग आठवले की, मन भरून येतं...! तत्कालीन हडस पिंपळगावच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक आदरणीय एस.एम.गंडे सर व बाळू पाटील माझ्या सोबत गावातील खूप स्नेहजणांच्या घरी अल्पोहार व नारळ घेण्यासाठी आले होते...! बाळू पाटील ,यांना,कुठलाच गर्व कधी शिवला नाही..! माझ्या लग्नासाठी त्यांनी चि.रविला (त्यांचा मधला मुलगा,जो,त्यावेळी इ.२री ला होता बहुधा)मुद्दामहून आणले होते..! त्यावेळी ते म्हणाले होते..
" जाधव सर,गुरूच्या लग्नाला लहान विद्यार्थ्याने हजर राहणे ही खुप आनंदाची गोष्ट..! " असे मनमोकळ्या स्वभावाचे बाळू पाटील होते..!
शाळेत आम्ही,विद्यार्थ्यांसोबत नाटिका केली होती..! कलासक्त हडस पिंपळगावच्या रसिकांची दाद बाळू पाटील यांनी वैक्तिकरित्या माझ्याजवळ त्या नाटिकेतील कलाकार योगेश माधवराव निघोट(इ.७वीे ) चर्या अभिनयाला भरभरून दाद दिली होती..!कालांतराने माझी तिथून बदली झाली.परंतु कधी जरी ,बाळू पाटील भेटले तर त्यांच्या खास खळखळून हसण्याच्या शैलीने भेटीला प्रारंभ करायचे..! बाळू पाटील यांना,हसण्यात " कंजुषपणा " अजिबात माहीत नव्हता..! अगदी खळखळून हसायचे..! अश्या अनेक आठवणी आदरणीय,स्व.बाळू पाटील यांच्याशी निगडित आहे..!
आज सारखी हुरहूर लागली की,बाळू पाटील यांच्या सारखा सह्रदयी माणूस आज आपल्यात नाही याची..! आपल्या समविचारी व्यक्तीसोबत आठवणी नेहमी मनात पिंगा घालत असतात...!
स्व.आदरणीय बाळू काका पाटील,तुमच्या सोबतच्या व्यतित केलेल्या सर्व आठवणी ,मी जिवंत असे पर्यंत " जिवंतच " राहतील..! ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना..!
विनम्र अभिवादन खळखळून हसणा-या व्यक्तिमत्त्वाला..!
वंदे मातरम्..!
श्रद्धांजली अभिवादक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले व परिवार
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: १६ जून २०१७


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा