चिंतन
" जिवंत उग्र अभिनय कला..! "
===================================
फक्त भांडणाची ही उग्र कला लुप्त होत चालली आहे..! आजकाल डायरेक्ट ढीश्यूम..ढीश्यूम ही उग्र जिवंत अभिनय कला पाहण्यास मिळते..!😊 बऱ्याच ठिकाणी कोणे एकेकाळी ह्या कला विशेषकरून एकाच समलिंगी किंवा भिन्नलिंगी समूहात बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत असे..!😊 या लुप्त होत चाललेल्या किंवा झालेल्या किंवा होणाऱ्या कलेत " मराठी गावरान शिवी वाड्मयीन " क्षेत्रातील अनेक परिचित,अपरिचित अनेक अर्थाकारिता एकच समर्पक शब्दांचा वापर केला जात असे..! अशावेळी अभिनयातील विविध हावभाव जिवंत स्वरूपात पाहायला मिळत असे..! या कलेत सहभागी खरोखरचे कलाकार,जीव तोडून अभिनय करून,माझ्यासारख्या दुरून नयनरम्य आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकाचे खूप मनोरंजन करत असे..! म्हणतात ना..." तीन पैशात फुकटात तमाशा..!" अगदी असाच आनंद , शांतप्रेमी प्रेक्षक मोफत लुटत असे..!😂
अशा प्रकारचे भांडण करणाऱ्यांच्या अंगात चिंगारी किंवा वीरश्री संचारलेली असल्याने अशी माणसं भांडणाच्या वेळी जगातील सर्वात बलवान व्यक्तीच्या आविर्भावात असतात. भले अशी माणसं काडीमोडीचे समलिंगी किंवा भिन्नलिंगी प्राणी का असेनात..!😊 आजही काही ठिकाणी भांडणाची ही दुर्मिळ कला पहावयास मिळते..!
विशेष करून सार्वजनिक पाणवठ्यावर..!
बऱ्याचदा काही समंजस गृहस्थ ह्या कलेत, म्हणजेच या भांडण कलेत विघ्न निर्माण करण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करत असतात..! अर्थात हे विघ्न म्हणजे संबंधितांचे भांडण सोडविण्यासाठी जात असतात. त्यावेळी बऱ्याचदा अशा समंजस माणसांना यश मिळेलच याची हमी देता येत नाही..! कधी कधी तर अशाच समंजस माणसांना फुकटचा प्रसाद यथेच्छ धुलाई करून मिळाल्याची भूतकाळात अनेक उदाहरणे होऊन गेलेली आहेत..!😊 अशा भांडण सोडविणाऱ्या समंजस लोकांना अशा प्रत्यक्ष घडलेल्या काही प्रसंगांना लेखकाने ,प्रत्यक्ष दुरून पाहिलेले असल्याने तेंव्हापासून सदरील लेखक अशा भांडण कलेला न थांबवता दुरून नयनरम्य आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकाच्या भूमिकेत असतो..!
या लुप्त होत चाललेल्या कलेतील कलाकार,अभिनय करतांना , करपल्लवी, नेत्रपल्लवी, शिरपल्लवी, इ.अनेक पल्लवींद्वारे माझ्या सारख्या दुरून नयनरम्य आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांचे मस्तपैकी मनोरंजन करत असतो..! या कलेत मौन अभिनयाला बंदी असते..! 😊 कधी..कधी या लुप्त होत चाललेल्या कलेतील कलाकारांमध्ये कृतीयुक्त अभिनय होऊन त्याचे रूपांतर ढीश्यूम..ढीश्यूम या प्रत्यक्ष स्पर्शेच्या अभिनयातून अफलातून अदाकारीने दिसून येत असतो..!😂
आजच्या अगदी अलीकडच्या नवीन पिढीला हे " मराठी गावरान शिवी वाड्मयीन साहित्य " तसे अपरिचित ..! इतिहासात बऱ्याच चांगल्या-वाईट गोष्टी दडलेल्या आहेत..!कधी..कधी त्या दिसतात,तर कधी..कधी अशा प्रकारे आंतरजालावर उपलब्ध असतात..! त्याचा आनंद तर नाही पण भूतकाळात पाहिलेल्या या अती दुर्मिळ " मराठी गावरान शिवी वाड्मयीन साहित्याच्या " स्मृती जाग्या होऊन होतात..!
ता.क. : कुणीही,कुणालाही,कोणत्याही असभ्य शिव्या देऊ नये अन् असभ्य भांडणेही करू नये..! सगळं कसं सभ्यपणे आटोपून घ्यावे..! 😊🙏
वरील लेख प्रपंच फक्त जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या अहिंसावादी भूमिकेतून लिहिला आहे..!😄🙏
वंदे मातरम्..!
भांडण सोडविणाऱ्या समंजस लोकांना झालेल्या नाहक त्रासामुळे वरील भांडण कलेचे दुरून नयनरम्य आस्वाद घेणारा लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक : २४ जुलै २०२०, शुक्रवार,

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा