🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक १६ 🛑
🔵आग्नेय आशियाशी संबंध - भाग :१🔵
=================================
🧿 कंबोडिया ( फूनान )🧿
🔘 आजच्या कंबोडिया व कोचीन चायना प्रदेशास पूर्वी फुनान असे म्हणत.
🔘 इसवी सनाच्या पहिल्या शतकात कौंडीण्य नावाच्या द्रविड ब्राम्हणाने फूनान मध्ये ( कंबोडिया ) मध्ये पहिली भारतीय वसाहत स्थापन केली.
🔘 कौंडीण्य यांनी कंबोडिया मध्ये हिंदू राज्याची स्थापना केली.याचे रूपांतर हळूहळू साम्राज्यात झाले.
🔘 कौंडीण्याच्या वंशजांनी संपूर्ण कंबोडिया,कोचीन चायना, सयाम, लाओसचा काही भाग व मलाया द्वीपकल्पावर आपले अधिपत्य स्थापन केले.
🔘 कौंडीण्याच्या वंशजांनी या संपूर्ण प्रदेशावर जवळपास १००वर्षे राज्य केले.
🔘 कंबोडिया मध्ये आजमितीलाही विवाहविधीच्या वेळी धर्माचार म्हणून कौंडीण्य ब्राम्हण यांचा नामोच्चार करावा लागतो.
🔘 चिनी इतिहासानुसार इसवी सनाच्या चौथ्या शतकात कौंडीण्य नावाचा अजुन एक ब्राम्हण फूनान ( कंबोडिया ) मध्ये आला.
♦️ गुणवर्मा राजा ( कौंडीण्य घराणे ) ♦️
गुणवर्मा या राजाने फूनानमध्ये ( कंबोडिया ) विष्णु मंदिर बांधले.
♦️ राजा जयवर्मन ♦️
🔘 इ. स.४८४ मध्ये राजा जयवर्मन याने चिनी सम्राटाच्या दरबारात आपले वकील पाठवले.
🔘 राजा जयवर्मनची राणी कुलप्रभादेवी हीचा संस्कृत शिलालेख उपलब्ध आहे.
🔘 राजा जयवर्मन हा शिवभक्त होता.
राजा जयवर्मन यांचे चीन शी स्नेहपूर्ण संबंध होते.
♦️ राजा रुद्रवर्मा ♦️
🔘 राजा रुद्रवर्मा हा कौंडीण्य घराण्याचा शेवटचा होय.
याचाही संस्कृत शिलालेख उपलब्ध आहे.
🔘 राजा रुद्रवर्मा यांचे चीन शी स्नेहपूर्ण संबंध होते.
🔘 इ. स. च्या पाहिल्या शतकापासून ते सातव्या शतकापर्यंत
फूनान ( कंबोडिया ) हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक होता.
🔘फूनान मध्ये हिंदू देवदेवतांची मंदिरे उभारण्यात आली.
🔘 फूनान मध्ये शैव व वैष्णव पंथाचा आणि बौद्ध धर्माचा प्रसार झाला.
________________________________________
🧿 कंबुज ( कंबोडिया )🧿
याच काळात फूनानच्या ईशान्य भागात ' कंबु स्वायंभुव ' या आर्य राजाने आपले राज्य स्थापन केले.
याच राज्याच्या नावावरून या प्रदेशास ' कंबुज- कंबोडिया ' असे म्हणतात.
♦️ राजा श्रुतवर्मन ♦️
राजा श्रुतवर्मन याने लिंग पर्वताच्या पायथ्याशी श्रेष्ठपूर राजधानी वसवून आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले.
♦️राजा भववर्मन ♦️
🔘 इ.स.५९० मध्ये राजा भववर्मन याने चंपा राज्याचा शेवट करून तो प्रदेश आपल्या राज्याला जोडला .
🔘 राजधानी श्रेष्ठपूर हून हलवून भवपुर ही नवीन राजधानी वसविली.
🔘 राजा भववर्मन हा लिंगोपासक होता.
♦️राजा ईशानवर्मन ♦️
🔘 ईशानवर्मन हा इ. स.६१६ मध्ये गादीवर आला.
🔘 संपूर्ण फूनान ( कंबोडिया ) ,कोचीन चायना,लाओस चा काही भाग जोडला.
🔘 राजा ईशानवर्मन याने वैदिक धर्माचा पुरस्कार केला.
🔘 आठव्या शतकात या राज्याची स्थिती,अस्थिर झाली.
🔘 कंबुज ( कंबोडिया ) वर जावा मधील शैलेंद्र घरण्याची सत्ता स्थापन झाली.
==================================
वंदे मातरम्..!
संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
संकलन व अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
दिनांक: २३ एप्रिल २०२०, गुरुवार.
आग्नेय आशियाशी संबंध-
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा