शनिवार, २३ मे, २०२०

प्राचीन भारत भाग क्र.१६ 🔵आग्नेय आशियाशी संबंध - भाग :१🔵



🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक १६ 🛑

🔵आग्नेय आशियाशी संबंध - भाग :१🔵

=================================

🧿 कंबोडिया ( फूनान )🧿

🔘 आजच्या कंबोडिया व कोचीन चायना प्रदेशास पूर्वी फुनान असे म्हणत.
🔘 इसवी सनाच्या पहिल्या शतकात कौंडीण्य नावाच्या द्रविड ब्राम्हणाने फूनान मध्ये ( कंबोडिया )  मध्ये पहिली भारतीय वसाहत स्थापन केली.
🔘 कौंडीण्य यांनी कंबोडिया मध्ये हिंदू राज्याची स्थापना केली.याचे रूपांतर हळूहळू साम्राज्यात झाले.
🔘 कौंडीण्याच्या वंशजांनी संपूर्ण कंबोडिया,कोचीन चायना, सयाम, लाओसचा काही भाग व मलाया द्वीपकल्पावर आपले अधिपत्य स्थापन केले.
🔘 कौंडीण्याच्या वंशजांनी या संपूर्ण प्रदेशावर जवळपास १००वर्षे राज्य केले.
🔘 कंबोडिया मध्ये आजमितीलाही विवाहविधीच्या वेळी धर्माचार म्हणून कौंडीण्य ब्राम्हण यांचा नामोच्चार करावा लागतो.
🔘 चिनी इतिहासानुसार इसवी सनाच्या चौथ्या शतकात कौंडीण्य नावाचा अजुन एक ब्राम्हण फूनान ( कंबोडिया ) मध्ये आला.

♦️ गुणवर्मा राजा ( कौंडीण्य घराणे ) ♦️

गुणवर्मा या राजाने फूनानमध्ये ( कंबोडिया ) विष्णु मंदिर बांधले.

♦️ राजा जयवर्मन ♦️

🔘 इ. स.४८४ मध्ये राजा जयवर्मन याने चिनी सम्राटाच्या दरबारात आपले वकील पाठवले.
🔘 राजा जयवर्मनची राणी कुलप्रभादेवी हीचा संस्कृत शिलालेख उपलब्ध आहे.
🔘 राजा जयवर्मन हा शिवभक्त होता.
 राजा जयवर्मन यांचे चीन शी स्नेहपूर्ण संबंध होते.

♦️ राजा रुद्रवर्मा ♦️

🔘 राजा रुद्रवर्मा हा कौंडीण्य घराण्याचा शेवटचा  होय.
याचाही संस्कृत शिलालेख उपलब्ध आहे.
🔘 राजा रुद्रवर्मा यांचे चीन शी स्नेहपूर्ण संबंध होते.

🔘 इ. स. च्या पाहिल्या शतकापासून ते सातव्या शतकापर्यंत
फूनान ( कंबोडिया ) हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक होता.
🔘फूनान मध्ये हिंदू देवदेवतांची मंदिरे उभारण्यात आली.
 🔘 फूनान मध्ये शैव व वैष्णव पंथाचा आणि बौद्ध धर्माचा प्रसार झाला.
________________________________________

🧿 कंबुज ( कंबोडिया )🧿

याच काळात फूनानच्या ईशान्य भागात ' कंबु स्वायंभुव ' या आर्य राजाने आपले राज्य स्थापन केले.
याच राज्याच्या नावावरून या प्रदेशास ' कंबुज- कंबोडिया ' असे म्हणतात.

♦️ राजा श्रुतवर्मन  ♦️

राजा श्रुतवर्मन याने लिंग पर्वताच्या पायथ्याशी श्रेष्ठपूर राजधानी वसवून आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले.

♦️राजा भववर्मन ♦️

🔘 इ.स.५९० मध्ये राजा भववर्मन  याने चंपा राज्याचा शेवट करून तो प्रदेश आपल्या राज्याला जोडला .
🔘  राजधानी श्रेष्ठपूर हून हलवून भवपुर ही नवीन राजधानी वसविली.
🔘 राजा भववर्मन  हा लिंगोपासक होता.

♦️राजा ईशानवर्मन ♦️

🔘 ईशानवर्मन हा इ. स.६१६ मध्ये गादीवर आला.
🔘  संपूर्ण फूनान ( कंबोडिया ) ,कोचीन चायना,लाओस चा काही भाग जोडला.
🔘 राजा ईशानवर्मन याने वैदिक धर्माचा पुरस्कार केला.
🔘 आठव्या शतकात या राज्याची स्थिती,अस्थिर झाली.
🔘 कंबुज ( कंबोडिया ) वर जावा मधील शैलेंद्र घरण्याची सत्ता स्थापन झाली.

==================================

वंदे मातरम्..!

संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

संकलन व अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

दिनांक:  २३ एप्रिल २०२०, गुरुवार.

आग्नेय आशियाशी संबंध-

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा