शुक्रवार, २७ जानेवारी, २०२३

गांधी गोडसे एक युद्ध , विचारांचे द्वंद्व..!

 




चिंतन ©️


गांधी गोडसे एक युद्ध , विचारांचे द्वंद्व..!


==================================


राजकुमार संतोषी सर दिग्दर्शित ' गांधी गोडसे एक युद्ध ' हा चित्रपट काल्पनिक पद्धतीने चित्रित केलेला आहे. मात्र याच कल्पनिकतेला चित्रपटात बऱ्याच प्रसंगात इतिहासातील सत्याची देखील जोड दिलेली आहे.


महात्मा गांधी यांच्या मनाच्या व्यथा समजून घ्यायच्या असेल अन् त्यांच्या मनाच्या व्यथा आता पर्यंत जर कुणी योग्य प्रकारे प्रभावीपणे मांडल्या असेल तर ' गांधी गोडसे एक युद्ध ' हा चित्रपट नक्कीच बघायला हवा.


नथुराम गोडसे यांची उद्विग्नता समजून घ्यायची असेल तर ' गांधी गोडसे एक युद्ध ' हा चित्रपट नक्कीच बघायला हवा.


एका पत्नीची आपल्या पतीकडून असणारी अपेक्षा , त्यात झालेली होरपळ जर समजून घ्यायची असेल तर ' गांधी गोडसे एक युद्ध ' हा चित्रपट नक्कीच बघायला हवा. हा प्रसंग या चित्रपटातील विचारांच्या द्वंद्वात सर्वोत्तम ठरला आहे असे मला वाटते.


महात्मा गांधी यांच्या विविध प्रयोगाचे फलित काय होऊ शकते हे जर बघायचे असेल तर ' गांधी गोडसे एक युद्ध ' हा चित्रपट नक्कीच बघायला हवा.


एखाद्याच्या प्रतिमेचा अन् चेहऱ्याचा वापर करून हळूच त्या प्रतिमेला अन् चेहऱ्याला कसे बाजूला सारल्या जाते ,हा भाव व्यक्त करताना महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे समोर व्यक्त केलेली उद्विग्नता जर  बघायची असेल तर ' गांधी गोडसे एक युद्ध ' हा चित्रपट नक्कीच बघायला हवा.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांची कणखर भूमिका अन् देशाला पहिले प्राधान्य देणारी वैचारिकता जर समजून घ्यायची असेल  तर ' गांधी गोडसे एक युद्ध ' हा चित्रपट नक्कीच बघायला हवा.


पंडित जवाहरलाल नेहरू, कृपलानी यांची महात्मा गांधीजींच्या समोर बैठकीतील भूमिका समजून घ्यायची असेल तर ' गांधी गोडसे एक युद्ध ' हा चित्रपट नक्कीच बघायला हवा.


भारत - पाकिस्तान फाळणीमुळे ज्यांची शारीरिक, भावनिक अन् भौतिक संपदा लुटल्या गेली त्यांची चीड समजून घ्यायची असेल तर ' गांधी गोडसे एक युद्ध : हा चित्रपट नक्कीच बघायला हवा.


आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीत जे काही फार मोजके दिग्दर्शक आहेत,की ज्याचं दिग्दर्शन बघावं वाटतं, त्या ग्रेट राजकुमार संतोषी सरांसाठी ' गांधी गोडसे एक युद्ध ' हा चित्रपट नक्कीच बघायला हवा.


आपल्या देशातील दोन विचारधारांच्या द्वंद्वात एक हळुवार प्रेमकथा जर अनुभवायची असेल तर ' गांधी गोडसे एक युद्ध ' हा चित्रपट नक्कीच बघायला हवा.


' गांधी गोडसे एक युद्ध ' या चित्रपटात एक गीत आहे, जे की मुळात भजन आहे.ते सादर करताना तथागत गौतम बुद्धांच्या शांत निरामय मूर्तीला बघून वैष्णव जन तो तेने कहिये जो यातील प्रत्येक शब्दाची अनुभूती येते.


महात्मा गांधी अन् नथुराम गोडसे ज्यावेळी तुरुंगातील कोठडीत सोबत असतात, त्यावेळी भागवत गीतेचा, या दोघांनी आपापल्या पद्धतीने घेतलेला मतितार्थ दोघांची वैचारिकता दर्शवतो.


राजकुमार संतोषी सर यांनी आपले गुरू ग्रेट दिग्दर्शक गोविंद निहलानी सर यांना समर्पित केलेली कलाकृती अशा आशयाची ओळ चित्रपटाच्या सुरुवातीलाच येते अन् ही माणसं कशी एकमेकांच्या कलेच्या क्षेत्रात श्रद्धेने तयार झालेली आहेत हे पटतं.


इतिहासाच्या पानाला फक्त एकच बाजू नसते, तर अनेक बाजू असतात हे समजून घ्यायचे असेल तर ' गांधी गोडसे एक युद्ध ' हा चित्रपट नक्कीच बघायला हवा.


वंदे मातरम्..!


एक रसिक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव. ©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक: २७/१/२०२३, शुक्रवार