आमचे गाव, आमची माणसं..!©️
" आमच्या एकाच गावातील दोन नेते..!" 👬
================================
प्रिय मित्र नंदू व प्रिय मित्र बाळु..!
उपाख्य श्री. नंदकिशोर भाऊसाहेब जाधव पाटील व श्री. रामचंद्र मुरलीधर शेळके पाटील..!
माझी जन्मभूमी पालखेड ता. वैजापूर जिल्हा औरंगाबाद येथील दोन समकालीन समवयस्क तरणाबांड नेत्यांना त्यांच्या एकाच दिवशी साजरा होणाऱ्या दुर्मिळ जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..! 🌹
या दोघांपैकी प्रिय बालमित्र नंदू,हा आमच्या जवळच्या आळीतला..!एकाच वयाचे असल्याने आमच्या पहिली पासूनच्या औपचारिक शिक्षणाचा प्रारंभ देखील सोबतच झाला..! हा पहिल्यापासून आक्रमक भूमिका घेऊन आपल्या बालवयात अधून मधून चुणूक दाखवत असायचा..! विशेषकरून आमच्या माध्यमिक वर्गातील जीवनात..!
असं करता..करता..मजल...दर..मजल करत..करत..राजकीय आयुष्यात चालत राहिला..अन् आज हा एका राजकीय पक्षाचा राजकीय नेता आहे..! या आमच्या प्रिय बालमित्राचा एक गुण बहुतांशी राजकारण्यांनी घ्यायला हवा, अन् तो गुण म्हणजे नंदू निर्व्यसनी आहे अन् याची सकाळ, लवकर सुरू होते..! हे दोन्ही गुण बऱ्याच गोष्टी मिळवून देतात..!बाकी आता हा नंदू,माझा वर्गमित्रच असल्याने ,याच्या सोबतच्या काही आठवणी अन् प्रसंग असे घडून गेलेले आहेत,की ते प्रसंग निदान आमच्या वर्गातील कोणत्याच ,त्यातल्या त्यात आम्ही अभ्यासाची खोली करून राहणाऱ्या मोजक्या मित्रांच्या स्मरणातून जाऊच शकत नाही..! कधीतरी त्या..त्या प्रसंगावर मी लिहिणारच आहे..! 😊
असो,
दुसरा प्रिय मित्र बाळु..! उपाख्य बाळु पाटील शेळके..!!
हा आमच्या माध्यमिक वर्गाच्या मागील बँच मधील..! प्रिय बाळूचा स्वभाव बराचसा आपल्या वडिलांवर गेलेला..! शांत,संयमी स्वभाव..! प्रिय बाळूच्या वडिलांवर म्हणजेच स्वर्गीय तिर्थस्वरुप मुरलीधर भाऊ शेळके पा. यांच्यावर माझ्या तीर्थरूप वडिलांचं विशेष प्रेम..! त्याचं कारण... तिर्थस्वरुप मुरली भाऊंचा अतिशय समजूतदार अन् विनयशील स्वभाव..! थोडक्यात आज बरेच जण स्वतच्या खऱ्या आडनावाच्या शेवटी जी पदाची बिरुदावली लावतात त्या " पाटील " या पदाच्या बिरुदावलीचे खरे वारसदार म्हणून नेहमी जाणवणारे आमचे वंदनीय स्वर्गीय मुरली भाऊंच्या शेळके पाटील घराण्याचा वारसा ,प्रिय बाळुला जन्मजात मिळाला आहे..! वंदनीय स्वर्गीय मुरली भाऊ,तहहयात आपल्यातील प्रेमळ,मायाळू ,समजूतदार पाटील पदाच्या स्वभावावर कायम राहिले..!
माझ्या जन्मगावाची दिशा व दशा या दोघांच्या हाती आहे..! आमच्या गावाला नेमकी दिशा द्यायची की दशा करायची हे ,या दोघांच्या राजकीय विचारधारा ठरवतील..! अजून एखादी तिसरी आघाडी जरी माझ्या जन्मगावात पालखेडला उदयाला आलीच तर तिच्याही हाती गावाची दिशा अन् दशा ठरविण्याचे हक्क राखून ठेवण्यात आलेले आहेत..!🙏😊
वरील उल्लेखित दोघेही माझे मित्र,आमच्या गावात राजकीय प्रतिस्पर्धी आहे...! माफ करा " होते " असं वाटतं..!
" होते " यासाठी लिहिले आहे की, माझे दोघेही मित्र राज्यातील सध्याच्या महाविकास आघाडी सरकार मधील दोन निव्वळ भिन्न विचारधारेच्या पण सध्या मित्र झालेल्या दोन राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करतात...! 🙏🏻
आज आम्ही काहीजण पालखेड गाव सोडून बाहेरगावी स्थायिक झालेलो आहोत. आमच्यातील काहीजण आता पुन्हा पालखेड येथे पुन्हा राहायला येतील की नाही हे सांगता येणार नाही..! मात्र आमचं ,आपल्या जन्मभूमीवर व तेथील सर्व माणसांवर निस्सीम प्रेम आहे..! ❤️ आम्ही जे कुणी पालखेडकर बाहेरगावी स्थायिक झालेले आहोत,आमची तुम्हा दोघांकडून नम्र अपेक्षा एकच आहे की, आपल्या जन्मभूमीची कीर्ती सर्वदूर पसरवा..! 🙏🏻
वंदे मातरम्..!
वरील दोन्ही मित्रांना त्यांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा एक स्थलांतरित बिगर राजकीय पालखेडकर : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव, पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक: ९ जानेवारी २०२०, गुरुवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा