आमचे गाव आमची माणसं..!
"दिलखुलास माणसांची, दिलखुलास भेट..!'
😊
=================================
स्थळ : बाबा चौक,औरंगाबाद,
वेळ: सकाळी ७:४५
दिनांक: १० फेब्रुवारी २०२०,सोमवार.
" गुरुजी..... ओ...गुरुजी....!
असा घरगुती आवाज ऐकू आला..!
मी आपलं एखादं लहान लेकरू खांद्यावर घेऊन पळावं तसं..माझ्या खांद्यावरील पिशवीला घेऊन रिक्षाला पकडण्यासाठी तिच्याकडे धावत सुटलो होतो.
मी मागं वळून पाहिलं तर....
ज्यांच्यावर माझं वैयक्तिक खूप प्रेम आहे अशी दोन आमच्या पालखेड गावातील माझे दोन ज्येष्ठ मित्र आदरणीय अशोकराव पाटील शेळके व आदरणीय रामदास पाटील धनाड सर मला आळीपाळीने आवाज देत होते..! मी थांबून त्यांचं दर्शन घेऊ लागलो,पण त्यांनी थांबवलं...! बहुदा माझी ही कृती अख्खा बाबा चौक कावराबावरा होऊन पाहत होता..! कारण एवढ्या मोठ्या शहरात अन् एवढ्या मोठ्या चौकात ही दर्शन घेण्याची कृती तो पहिल्यांदाच पाहत असावा..!
लगेच अशोकरावांनी माझ्या दंडाला धरून मला बाजूच्या एका चहाच्या टपरीवर न्यायला लागले. धनाड गुरुजींनी माझा दुसरा हात धरला..! मी त्यांना म्हणालो..
"अहो,माझी अंधारी बस जर हुकली ना...लई...तारांबळ होईल..! राहू... द्या...!नाहीतरी मी चहा पीत नाही...! नंतर पाहू आपण..!"
पण ते दोघेही मला सोडायला तयार नव्हते. त्यांनी दुधाची ऑर्डर दिली.मात्र दूध उकळून तयार होई पर्यंत अजून वेळ जाईल म्हणून मी केवळ गावातल्या प्रेमळ माणसांच्या निव्वळ प्रेमाखातर तब्बल ३१ वर्षानंतर चहाचा एक घोट घेतला अन् सुपरफास्ट गप्पा करून रिक्षा पकडून बस स्थानकाकडे निघालो..!
( वरील ओळीत " घोट " हा शब्दप्रयोग वापरला आहे.त्याचा संबंध फक्त चहाशी आहे.हल्ली काही शब्दप्रयोग विशिष्ट पेय पदार्थांशीच वापरण्याचा उद्योग सुरू आहे,म्हणून खुलासा केला आहे..!😊)
माझ्या सोबत पांढरा सदरा घातलेले प्रिय ज्येष्ठ मित्र अशोकराव पाटील शेळके..!
अशोकराव,म्हणजे एकदम दिलखुलास माणूस..!
त्यांची अन् माझी भेट झाली अन् एकमेकांना शाब्दिक कोट्या, शालजोडी झाली नाही असे कधीच झाले नाही..!😂 आम्ही एकमेकाची जी काही शाब्दिक कोट्यांची खेचाखेची करतो..त्याने आम्हाला मनमुराद आनंद मिळतो हे मात्र नक्की..!😂 आमच्या पालखेड गावातील "शेळके पाटील " घराण्यावर माझे आजोबा, माझे तीर्थरूप वडील आणि मी ,आम्ही सर्वजण एका सन्मानाने नेहमी पाहत आलेलो आहे..! समंजस अन् निगर्वी " शेळके पाटील " घराणे पूर्वी,आता अन् माझ्या मुलांच्या पुढील पिढीत देखील राहील यात तिळमात्र शंका नाही..!
दुसरे ज्येष्ठ मित्र आदरणीय डी.रामदास सर..!
आदरणीय रामदास धनाड सर,काय नाहीत...!
तर धनाड सर सर्वकाही करू शकतात..असे अवलिया व्यक्तिमत्त्व..! त्यांनी त्यांची पोषाखाची अशी एकच अशी प्रतिमा कधीच निर्माण होऊ दिली नाही..! त्यांच्या पोशाखात अधून मधून भारत देश झळकत असतो..!कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेला हा माणूस..! हजरजबाबीपणा यात यांचा कमालीचा हातखंडा..! शब्दाच्या अशा काही कोट्या करतील...की विचारूच नका..!😂 यांचा अंदाजे २३ वर्षापूर्वी एकदाच मी आणि विजू गायकवाड च्या समक्ष आमचा बालमित्र आण्णासाहेब म्हस्के यानेच शाब्दिक कोट्या मध्ये पराभव केला होता.. विजूच्या पालखेड येथील घराच्या ओट्यावर..😂 बाकी धनाड सरांचा याबाबतीत पराभव करणे अशक्यच आहे..!
आमच्या पालखेड गावात काही माणसांकडे पाहून पुन्हा पुन्हा जगावे वाटते,त्यातील हे सगळे हसरे व्यक्तिमत्व..! बरं,यांच्या शाब्दिक कोट्या अशा असतात, की ज्याने समोरच्याचे मन दुखावणार नाही अशा..! आमच्या पालखेड गावात फार मोजके असे मित्र,माणसं आहेत,ज्यांच्याशी शाब्दिक कोट्या,विनोद करायला मला खूप आनंदीत करून जाते..! त्यात मला ज्यांचा प्रत्यक्ष अनुभव आला त्यात ,भैय्या भाऊ( विजय) काळे गुरु, भावराव कोल्हे,अजय काळे गुरु, आण्णासाहेब म्हस्के, दिलीप जैन,विलास निकम,भगवान पगार,डॉ.दिलीप शेळके,आदरणीय भावराव पाटील शेळके, आदरणीय सुंदर शेठ गायकवाड,रावसाहेब ( गोटया) म्हस्के, आदरणीय डी.रामदास सर उपाख्य रामदास धनाड सर, शेख नासेर शेठ बागवान आणि अशोकराव पाटील शेळके....! यातील प्रत्येकाचा स्वभाव , व्यक्तिमत्त्व भिन्न भिन्न आहे.यांच्यात एकच समान धागा आहे अन् तो म्हणजे यांच्याकडे असलेली समयसूचकता अन् त्यावर आधारलेली विनोदबुद्धी..!😊
मला अनुभव आलेली पालखेड येथील शाब्दिक कोट्या करणारी माणसं मी उल्लेखित केलेली आहेत.अजुन या व्यतिरिक्त असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा..!😂 हल्ली आमच्या पालखेड गावात आमच्या पिढीने अनुभवलेली मराठी भाषेच्या शाब्दिक कोट्या करणारी आजच्या पिढीत माणसं आढळत नाहीत असं ऐकण्यात आलेलं आहे..! खरं...काय...अन्...खोटं ..काय... हे आजच्या पिढीतील नवतरुणानांच माहीत..!🙏
वंदे मातरम्...!
शाब्दिक कोट्या विनोदबुद्धी यावर निस्सीम प्रेम करणारा लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: १० फेब्रुवारी २०२०, सोमवार


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा