चिंतन
" नवरात्रोत्सव गरबा नृत्य, खरा स्री शक्तीचा उत्सव..! "
==================================
माझ्यामते नवरात्रोत्सव मधील गरबा नृत्य दांडिया हा खरा फक्त स्त्रीयांचा, स्री शक्तीला आणि आदिशक्तीला समर्पित केलेला अतिशय पवित्र उत्सव..!
मात्र कालपरत्वे महिलांच्या याच नवरात्रोत्सव मध्ये पुरुषांनी नेहमीप्रमाणे आपल्या अहंकारी पुरूषी मानसिकतेनुसार त्यात घुसखोरी केली अन् पुरूषी संस्कृतीचे त्यावर ग्लॅमर चढवायला सुरुवात केली..!
वास्तविक नवरात्रोत्सव मध्ये महिलांनी महिलांच्या सोबत एकत्रीत येऊन आपला आनंदोत्सव, नवरात्रोत्सव साजरा करायला हवा, जेणेकरून महिलांना त्याचा निसंकोचपणे खरा अत्यानंद घेता येईल..!
जरी यदा कदाचित पुरुष त्या नवरात्रोत्सव मध्ये सहभागी झालेच तर त्यांनी त्यांचा रास गरबा नृत्य दांडिया स्वतंत्रपणे वेगळा आयोजित करून त्यात मनसोक्त आनंद घ्यावा..! किंवा फक्त पती पत्नी यांच्याच एकत्रीत रास गरबा नृत्य दांडिया स्वतंत्रपणे आयोजित करून त्यात मनसोक्त आनंद घ्यावा असे मला वैयक्तिक वाटते..! माझ्या या वैयक्तिक मताचे पुरूषी मानसिकतेच्या लोकांनी जास्त मनावर घेऊ नये ही नम्र अपेक्षा..! 🙏
मी लासूर स्टेशन येथे राहत असताना लासूर स्टेशन येथील माझे स्नेही आदरणीय संजयजी शर्मा यांनी त्यांच्याच घराच्या समोर असलेल्या मैदानात अतिशय उत्कृष्ट प्रकारे रास गरबा नृत्य दांडिया नवरात्रोत्सव आयोजित केला होता. त्यात फक्त आणि फक्त महिलाच सहभी होत्या..!आदरणीय संजयजी शर्मा यांनी स्त्रीयांचा, स्री शक्तीला आणि आदिशक्तीला समर्पित केलेला अतिशय पवित्र नवरात्रोत्सव आयोजित केला होता. त्याबद्दल आदरणीय संजयजी शर्मा यांना त्रिवार वंदन..!🙏🙏🙏
असो,
खालील व्हिडिओ मध्ये जो गरबा नृत्य सादर करताना फक्त आणि फक्त महिला दिसत आहेत. तिथं एकच पुरुष आहे जो की ढोल वाजवत आहे.त्या पुरुषानेही स्त्रीयांच्या गरबा नृत्याच्या विरूद्ध दिशेला तोंड केलेले आहे..!जेणेकरून तेथील महिलांना निसंकोचपणे आपला आनंदोत्सव साजरा करता यावा.
सदरील दृश्य गुजरातमधील, कच्छ वाळवंटातील भूज अंजार भचाउ येथील...! सदरील स्थळ राजस्थान, पाकिस्तान सीमेलगत बाखासर चौकीजवळील आहे.
सदरील सुमधुर गरबा नृत्य गीत गायन केले आहे गुजरातमधील सुप्रसिद्ध गायिका गीता रेबारी यांनी..!
आज नवरात्रोत्सव मधील सातवी माळ..! त्यानिमित्त सर्व महिला भगिनींना आणि पुरुषांना देखील श्रद्धेय शुभेच्छा..!🌹
व्हिडिओ स्रोत - व्हॉट्स ऍप
अंबाबाईचा उदो उदो..!
वंदे मातरम्..!
आईचा एक उपासक - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक - २३/१०/२०२०, शुक्रवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा