चिंतन ©️
' पांघरून ' - पुन्हा एक विलक्षण प्रेम कहाणी..!
==================================
उत्कट प्रेमाची अव्यक्त कहाणी आपण यापूर्वी काकस्पर्श या अती सुंदर कलाकृतीत बघितली आहे.प्रेम अन् प्रेमात असणारी माणसं कशी आपल्या भावनेच्या द्वारे ईश्वरिय अनुभुतीत जगत असतात याच खूप सुंदर चित्रण काकस्पर्श चित्रपटात आहे. प्रेम काय फक्त व्यक्त केल्यानेच होते का..? प्रेम फक्त व्यक्त केल्यानेच होते असे ज्यांना वाटते त्यांची प्रेमाबद्दलची समजच कमी असते असे वाटते.
उत्कट प्रेमाची अव्यक्त कहाणी आपण यापूर्वी काकस्पर्श मध्ये बघितली अन् एखादी व्यक्ती त्यात स्री अन् पुरुष दोघेही आलेत, ते प्रेमात कसे कुंठित आयुष्य व्यतीत करत असतात हे बघितले आहे. कुंठित आयुष्य यासाठी म्हणतोय की, बऱ्याच प्रेमकथा ह्या तहहयात अव्यक्तच राहतात अन् त्यांचा शेवटही प्रेमाची सर्वोच्च पातळी गाठून पूर्णत्वाला जातात.अशावेळी जी व्यक्ती प्रेमात असते ती कधीकधी आपले देहभान विसरून त्यात तल्लीन होऊन जाते. तर अशाही काही व्यक्ती असतात, ज्या तल्लीन तर होऊन गेलेल्या असतात,पण स्वतः वर संयम ठेवून एखाद्या देवतेला पुजावे तसे ते आपल्या प्रेमाला पुजत असतात, अख्खी हयात..!
माझ्या मते, आदरणीय महेश मांजरेकर सरांनी त्यांच्या दिग्दर्शनाच्या आयुष्यात जर कोणती सर्वोत्तम कलाकृती निर्माण केली असेल तर ती फक्त आणि फक्त ' काकस्पर्श - विलक्षण प्रेम कहाणी ' हीच आहे..! ही सर्वांग सुंदर कलाकृती निर्माण करताना आदरणीय महेश मांजरेकर सरांनी त्यात आपल्यातील सर्वोत्तम भावना ओतली आहे. जी जी माणसं आपल्या आयुष्यात जगत असताना भावनेच्या देवतेला सदैव पूजत असतात, त्यांच्यासाठी काकस्पर्श ही सर्वोत्तम कलाकृती नक्कीच आहे..!
माझ्या मते महेश मांजरेकर दिग्दर्शित मराठी चित्रपट सृष्टीतील काकस्पर्श ही उत्कट प्रेमाची अव्यक्त असणारी एकमेव सर्वोत्तम कलाकृती आहे..! आता तेच आदरणीय महेश मांजरेकर सर, पुन्हा तोच प्रेमाचा भावनिक हिंदोळा घेऊन येत आहेत, ज्याचं नाव आहे ' पांघरून ' - एक विलक्षण प्रेम कहाणी मध्ये..! बऱ्याचदा काहींचे लग्नापूर्वी प्रेम करून मग लग्न होतात तर बऱ्याच जणांचे लग्न झाल्यावर दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुटून त्याचा वटवृक्ष होतो.मात्र अशीही काही मने असतात ज्यांच्या नशिबी अव्यक्त प्रेमात कुंठित आयुष्य व्यतीत केल्याशिवाय पर्यायच नसतो.अशा प्रेमात भावनेची देवता स्री किंवा पुरुष या दोघांवर किंवा दोघांपैकी एकावर पूर्णपणे आरूढ झालेली असते.अख्खं आयुष्य अव्यक्त राहून निरागस प्रेमाची महती ही दोन मने तहहयात अव्यक्तपणे व्यक्त करत असतात,आपल्या नजरेने, मनाने..!
असो, आशा करूया, महेश मांजरेकर सर दिग्दर्शित पांघरून या चित्रपटात तोच निरागस प्रेमाचा अंकुर पाहायला मिळेल, जो काकस्पर्श मध्ये रसिक प्रेक्षकांना बघायला मिळाला होता..!🙏🏻🌹
ता.क. खालील लिंक मध्ये पांघरून चित्रपटाच्या ट्रेलरची व्हिडिओ लिंक आहे.
https://youtu.be/4boog5x8r2A
वंदे मातरम्..!
शब्दांकन - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक -२४/१/२०२२, सोमवार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा