** चिंतन **
" जात ...! "
======================================
जातीच्या हिडीस मानसिक द्वंद्वात आपल्या भारतीयांचे कधीही न भरून येणारे नुकसान आजतागायत झालेले आहे;ते द्वंद्व आपल्याला एक माणूस म्हणून जगण्यास अडचणीचे ठरते..!आपण फक्त आणि फक्त भारतीयच आहोत..!इतिहास तपासा ,जातपात मानल्यामुळे कित्येक गुणवान मानवी घटकांना निसर्ग विधात्याने निर्माण केलेल्या अतिशय सुंदर विश्वातील अनेक सुंदर बाबींना मुकावे लागलेले आहे...!ज्यावेळी जाती निर्माण झाल्या,त्यावेळी त्या कला,कौशल्यावर आधारित होत्या.कालांतराने त्यातही आर्थिक स्तरानुसार भेद करण्यात आला..!हा भेद प्रत्येक जातीतील वरच्या गटाने केला..व त्यात भरडला गेला त्याच जातीतील खालचा गट...!
जातीयवादाच्या बाबती फक्त एकाच जातीला आरोपीत करून कसे चालेल..? प्रत्येक जातीत श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव केला जात होता व आहे..!प्रथमत: आपापल्या जातीतील असलेला प्रकार,उपप्रकार, श्रेष्ठ-कनिष्ठ इ. अनिष्ट प्रथेविरुध्द दंड का थोपटल्या जात नाही..? अनेकातील एकाला शोधून त्याला आरोपी करावे..! पण होत काय...आपण त्या एक जनाच्या गैरकृत्याची शिक्षा त्या एकाला देण्याऐवजी त्या एका सोबत त्याच्या भोवतीच्या अनेकांनाही आरोपीत करतो..! इथेच वस्तुनिष्ठ पुरोगामित्व हरवून बसतो..! असे अनेकातील एकजण प्रत्येक अनेकात आहेत..! आपण वस्तुनिष्ठ मुल्यमापन करत नाही अन् सामाजिक वातावरण गढूळ करून टाकतो.अर्थात असे करणारे जे आहेत त्यांनाच हा निकष लागू पडतो..!
जातपात माननारे प्रत्येक जातीत होते..व आहेत..!प्रत्येक जातीत उपप्रकार ,त्यांच्यात असणारे द्वंद्व यामुळे मानवी समुदायाची अपरिमित न भरून येणारे हाणी झालेली आहे..!त्यामुळे कोणालाच ,कोणाला नावे ठेवण्याचा काहीच अधिकार नाही.!(काही अपवाद..!)अगदी हे जाती जातीतील प्रकार व त्या प्रकारातील उपप्रकार पूर्वीपासून आहेत..!याचा अनुभव घ्यायचा असेल तर कोणत्याही जातीतील लग्न विधी जुळवतांना याचे उत्तम प्रात्यक्षिक मोफत पाहायला मिळते..!अशावेळी अगदी बारीक सारीक चौकशी करतात..!कधी..कधी तर गुप्तहेरांमार्फत (आपापल्या नात्यातील किंवा परके....!) खुलासा काढल्या जातो की संबंधित आपल्याच जातीतील,आपल्याच श्रेणीचा आहे का...? मग तेव्हां कुठे पुढील कार्य सुरू होते...!
जो ,ज्या जातीत जन्माला आला,कदाचित सुरुवातीला तो आर्थिक बाबतीत कमकुवत असू शकतो..! कालांतराने ,तो व्यक्ती,स्वतच्या कौशल्याच्या बळावर, स्वतच्या पायावर उभा राहतो..! मग तोच व्यक्ती,त्याच्या भूतकाळातील आर्थिक परिस्थितीला चक्क विसरून,सुखवस्तू कुटुंबातील मुलगी वधू म्हणून शोधू लागतो व मिळवितो सुध्दा..! ते ही स्वतच्याच जातीतील..!अशावेळी स्वार्थ व सोयीचा विसरभोळेपणा ही तथ्यहीन मूल्ये प्रकर्षाने जागृत होतात..!हा सुध्दा " सोवळे " पाळण्याचाच प्रकार आहे,फक्त निकष वेगळे आहेत..!
अशा वेळी " अमकी जात अशी... तमकी जात तशी..!" असे बोलण्याचा व भाष्य करण्याचा या मंडळींना नैतिक अधिकार आहे का..? अर्थात जातपात मानायचीच असेल तर ("असेल तर" हे शब्द फार महत्त्वाचे आहे) ती फक्त " आपापल्या मुलांबाळांच्या लग्नविधीपुरती " ....! कारण तिथपर्यंत जातीपातीची मर्यादा योग्य वाटतात..!आजकाल काहीजणांना तेही मान्य नाही तो त्यांचा वैयक्तिक निर्णय..!कदाचित भविष्यातील मानवाच्या सार्वत्रिकीकरणाची ती नांदी ठरू पाहत असेल...!! अन्यत्र जातपात भेदभाव कालबाह्य वाटते..!वैयक्तिकरित्या माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात सर्वच जातीपातीच्या मानवी घटकांचे योगदान अमूल्य आहे..! ते सर्वजण नसते तर माझे अस्तित्व शून्य असते...!
आपल्या भारतीयातील जातीपातीच्या भेदभाव आचरणांमुळे
" आपण एक भारतीय " म्हणून खूप सोसलेले आहे..! आपल्यातील या वाईट चालिरितीमुळे परकियांनी सतत आपल्या भारतमातेचे हल्ले करून तिचे लचके तोडलेले आहे..!आपल्या काही भारतीयात असणा-या या दुर्गुणांमुळे काही परकियांनी अथवा काही स्वकियांनी सुध्दा आपले मानवीय मूल्यांचे शोषण केले,तर कुणी आर्थिक शोषण केले,कुणी , बौध्दिक शोषण केले ,कुणी आपले सांस्कृतिकदृष्ट्या शोषण केले..तर कुणी शारिरीक शोषण केले...! एकंदरीत जातपात मानल्यामुळे आपण एक भारतीय म्हणून खूप गमावलेले आहे...!
जातपात मानल्यामुळे एका समुदायाच्या मनात न्यूनगंड तर एका समुदायाच्या मनात अहंगंड निर्माण होतो...! आणि ते मानवी संस्कृती वृध्दींगत करायला बाधक ठरते..! आज आपण खूप प्रगत विश्वात वावरतोय.कधी नव्हे ती माणसाला एकमेकांच्या सहकार्याची गरज पडत आहे.तेंव्हा जातीपातीचे पाश तोडा व एक भारतीय म्हणून आपण एकच आहोत ही उदात्त भावना मनात असू द्यावी...! बघा किती निर्भेळ मानसिक आनंद मिळतो तो...!
माझ्या वैयक्तिक आयुष्यात माझी जन्मभूमी पालखेड,वास्तव्य भूमी लासूर स्टेशन,औरंगाबाद, विविध नोकरीची गावे, माझी सासुरवाडी पोहेगाव,ता.कोपरगाव इ.ठिकाणी अजिबात जातपात न मानणारे अन् निव्वळ माणुसकीच्या नात्यांवर निस्सीम प्रेम करणारे अनेक महान माणसं भेटली..! या अशा महान लोकांमुळेच माणसाची माणुसकीची भिंत भक्कमपणे आजही उभी आहे..!
काही ठिकाणी,काही उघड जातीयवादी अन् काही सुप्त जातीयवादी पण भेटले..! ही तीच कफल्लक प्रवृत्तीची माणसं होती ज्यांच्यामुळे त्या विधात्याने निर्माण केलेल्या सर्वांगसुंदर माणसाच्या आयुष्याच्या घरांच्या भिंती कधीच्याच ढासळून गेल्या अन् शिल्लक राहिले फक्त संवेदनशील भग्नावशेष पडक्या घरांचे..!
आपण भारतातील अनेक थोर राष्ट्रपुरुषांचे कार्यकर्तृत्व बघा,त्यांनी कधीच जातीपातीच्या बेगडी दुर्गुणांनाचा स्वीकार केला नाही आणि आजही कित्येक भारतीय असे दुर्गुण स्वीकारत नाही..!अशांची इतिहासाने दखल घेतलेली आहे..!आणि अशा अनेक थोर राष्ट्रपुरुषांना आपण नेहमी वंदनीय मानत आलेलो आहोत...! ते महापुरुष ,आपण जिवंत असे पर्यंत त्यांचे अस्तित्त्व आपल्यात असायला हवे....! आपण भारतीय या बाबतीत खूप नशीबवान आहोत की ,आपल्या भारतात अनेक थोर राष्ट्रपुरुषांनी आपल्याला मानवी मूल्याधिष्ठित आचरणाचा पाठ प्रस्तुत करून ठेवलेला आहे...!
आपण अशा अनेक महामानवांना विनम्र वंदन करून आपले आयुष्य सुंदर बनवूया...!
|| वंदे मातरम् ||
ता.क.: या लेखाचे हक्क माझ्याकडे राखून आहेत.कुणीही लेखाच्या शेवटी स्वतः चे नाव लिहून कॉपी पेस्ट करू नये.असे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल..!
जातीय भेदभाव अजिबात न मानणारा लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दि.२७ मे २०१७

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा