** चिंतन **
" मालिका..! "
=======================================
विविध वाहिन्यांवरील मालिकांच्या करिता सेन्सॉर बोर्ड असते का..?
बहुदा असले तरी, तो छोटा पडदा असल्याने त्यांचे तिकडे जाणूनबुजून दुर्लक्ष असेल कदाचित..!☺😎
आजकालच्या हिंदी मालिका किंवा मराठी मालिका ( ऐतिहासिक व राष्ट्रपुरुषांच्या सोडून) यांचे जे विषय,दृश्य व त्यांची संहिता याला कुठेच अर्थ,भाव, ताळमेळ अजिबात नाही..! सगळं कसं
"टंगळमंगळ " सुरू आहे..!☺
मी पालखेड येथे राहत असताना अंदाजे १९९७ ते ९८ च्या कालखंडात दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी ८:३० ला " थोरला हो..!" ही अतिशय सुंदर विषय असलेली मालिका मी आवर्जून पहायचो..! यात प्रदीप पटवर्धन, अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांच्या अप्रतिम भूमिका होत्या..!
भाव अन् भावना यांचा अतिशय सुंदर आविष्कार असलेली
" थोरला हो..!" ही मालिका होती..! माझ्या आज पर्यंतच्या आयुष्यात हीच एकमेव मराठी किंवा हिंदी मालिका अशी आहे,की जीचं स्थान अद्याप तरी कोणत्याही मराठी असो अथवा हिंदी मालिकेने घेतलेले नाही..!
महाभारताच्या कथेचा,पण आजच्या काळातील माणसांच्या नात्यांचा कथेचा पदर त्या " थोरला हो..!" या मालिकेच्या कथेला होता..! खूपच सुंदर कलाकृती होती..! भीम, अर्जुन आणि द्रौपदी यांच्या मूळ कथेच्या अवतीभोवती या मालिकेचे कथानक गुंफलेले होते..! त्यातील प्रदीप पटवर्धन अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळाली होती..! अर्थात त्यात उजवा अभिनय ठरला होता.. ऐश्वर्या नारकर यांचा..! त्या मालिकेचा शेवट त्यावेळी मी पाहिला होता अन् तेंव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले होते..! आजही त्या
" थोरला हो..!" मालिकेच्या आठवणीत रमून जातो कधी कधी..!☺
वंदे मातरम्..!
लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: २७ ऑगस्ट २०१९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा