चिंतन
" शाब्दिक कोट्यांचे महामेरू पू.ल.देशपांडे..! "
===================================
आज दिनांक १२ जून २०१७ रोजी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पू.ल.देशपांडे यांचा स्मृतिदिन..!
( निधन दिनांक: १२/६/२०००) त्या निमित्त या अवलियास माझ्याकडून विनम्रपुर्वक अभिवादन..!
संपूर्ण भारतात आपण महाराष्ट्रीयन काही बाबतीत खरंच नशीबवान आहोत..! त्यात प्रामुख्याने उल्लेख करता येईल असे " नशीबवान " क्षेत्रे म्हणजे...नाटक व साहित्य..! नाटक संस्कृती येथे बहरली अन् तिला साज चढवला अभिजात मराठी साहित्याने..! या दोन्ही नशीबवान क्षेत्रात अधिराज्य अनेक साहित्यिकांनी गाजवले पण दोन साहित्यीक महाराष्ट्राचे जरा जास्तच लाडके झाले..त्यापैकी एक प्र.के.अत्रे व दुसरे पू.ल.देशपांडे..!! दोघंही मराठी साहित्याला पडलेले सुखद स्वप्नच होते..!या द्वयींनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं..!😂😂
पू.ल.नी नाटक ,अभिनय,संगीत,कथा,कविता,कथाकथन,उत्कृष्ट संवादिनी (हार्मोनियम ) वादक,गायक इ.अनेक प्रांतात मुशाफिरी केली..!
माझ्यामते महाराष्ट्रातील माणसात विविध विषयांवर विनोदी अंगाने मिश्किलपणा तोही समोरच्याचे मन न दुखावता करण्याचं जे कसब आहे,ते पू.ल.चीच देणं आहे..!आज पू.ल.ची खूप आठवण येते..! कारण तो विनोदी मिश्कीलपणा हरवत चाललाय का असे वाटते.!
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख साहेब व गोपीनाथराव मुंडे साहेब विनोदी,मिश्किलपणे भाषणे करण्यात तरबेज होते..! विलासरावांनी केलेल्या शाब्दिक कोट्या ,पू.ल.ची आठवण करून देत असे..!असे विनोदी अंगाने,खोचक,मिश्किल कोट्या करणारे सार्वजनिक जीवनातील माणसं कमी होत चालली आहेत..! आपल्या पिढीत नितीन गडकरी साहेब हा वारसा नक्कीच सक्षमपणे चालवत आहेत.
आमच्या पालखेड गावात प्रत्येक गल्लीत सरासरी एकजण तरी कुणालाही न दुखवता मिश्किलपणे शाब्दिक कोट्या करणारा नक्की सापडतो..! यातील काहीजण हयात आहेत तर काहीजण हयात नाहीत. ती शाब्दिक कोट्या करण्याची कला या पालखेडकरांना निसर्गदत्त लाभलेली आहे..! माझ्या माहितीप्रमाणे ते पुढीलप्रमाणे होते आणि आहेत..
स्व.गजानन निकम भाऊ, नासेर भाऊ बागवान, भगवान पगार,डॉ.दिलीप शेळके,स्व.तिर्थस्वरुप कचरू मामा पा.कान्हे, स्व.बाबुराव नागोराव जाधव, विजय ( भैय्या ) काळे व अजय काळे,दिलीप सुराशे,अशोक नामदेव पा.शेळके, आदरणीय भानुदास भाऊ शिंदे, संजय गणपत पा. शेळके, आदरणीय बी.के.म्हस्के सर व आण्णासाहेब कारभारी म्हस्के,भावराव कोल्हे , तिर्थस्वरूप भावराव पा.शेळके, सादेक चाचा, गिताराम बनसोड, रामदास धनाड गुरुजी इत्यादी..!
वरील सर्वजण पू.ल.देशपांडे यांच्या साहित्य कलाकृती मधील शाब्दिक कोट्यांचे सभ्य भाषेत आमच्या पालखेड गावात प्रतिनिधी करणारे व्यक्ती आणि वल्ली आहेत..! यातील प्रत्येकाचा स्वभाव भिन्न भिन्न आहे पण..यांच्यात एकच समानता आहे अन् ती म्हणजे..शाब्दिक कोट्या करून विनोद निर्मिती करणे..! कधी कुणा एखाद्या वाचकाचा आमच्या गावात चक्कर झालाच तर जे हयात आहेत त्यांच्याशी चर्चा करा मग तुम्हाला याचा जिवंत अनुभव येईल..!😂
विनोद ही एक कला आहे,मात्र ती विनोदाची कला फार जपून वापरली तर तिचा ,ज्याच्यावर विनोद केला त्याला अन् इतरांना आनंद घेता येतो..! नसता उगीचच गैरसमज निर्माण होऊ शकतो..! मुळात विनोदबुद्धी ही नैसर्गिक देणगी असते,ती अशी कुणालाही मिळत नाही,त्यातल्या त्यात ज्यांच्या कपाळावर नेहमी बारा वाजलेले असतात,त्यांना तर अजिबात नाही..!😊 आणखी एक विशेष म्हणजे विनोद समजून घ्यायला देखील विनोदी मन असावे लागते..!
आजकाल उठसुठ कुणीही,कोणालाही शारीरिक व्यंगावर, त्यांच्या नातेवाईकावर ,टीका करतांना आपण पाहतोय..! असे विकृत व्यंग करणारे एका अर्थाने मानसिक रोगी असतात..! महाराष्ट्रातील ज्या ज्या लोकांनी कुणाच्याही भावना न दुखवता समोरच्यावर मिश्किल टिप्पणी केली आहेत, असे वक्ते पुन्हा होणे नाही..!
पू.ल.देशपांडे खरोखर शाब्दिक कोट्यांचे महामेरू होते..!
पू.ल.नेहमी म्हणायचे.." क्रियापदाचं मोठेपण त्याच्या कर्त्याने केलेलं कर्म किती मोठं आहे,ह्याच्यावर अवलंबून असत "
असो,पू.ल.(पुरुषोत्तम लक्ष्मण ) देशपांडे उपाख्य " भाईजी " यांना , स्मृतिदिनानिमित्त विनम्र श्रद्धांजली...!!
वंदे मातरम्..! 🙏🇮🇳🙏
शाब्दिक कोट्यांची आवड असणारा लेखक : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: १२ जून २०१७

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा