चिंतन
" जिथं नतमस्तक व्हावे असा जगातील एकमेव उंबरठा..! "
________________________________________
महाराष्ट्रातील माझे आवडते तिर्थस्थळ किल्ले रायगड...!
छत्रपती शिवरायांचे समाधी स्थान मूख्य द्वार किल्ले रायगड..! वास्तूविशारद हिरोजी इंदोलकर लिखित शिलालेख..अन् त्यावरील मजकूर...
" सेवेचे ठायी तत्पर हिराेजी इंदाेलकर..!"
या शिलालेखावर व थोरल्या महाराजांसमोर त्या वेळी मी माझे संपूर्ण कूटूंब नतमस्तक झालो होतो. मला तरी वाटतं आजरोजी महाराष्ट्रात नतमस्तक व्हाव असा हाच एकमेव उंबरठा शिल्लक राहिला आहे...!
थोरल्या महाराजांनी एवढी मनसबदारी मिळविली,एवढे त्रिकालाबाधित ऐश्वर्य, भौतिक व सामाजिक श्रेष्ठत्व मिळविवे परंतू कधीही त्यांनी स्वत :चा बडेजावपणा,स्वत:चे नाव या अतूलनिय कार्यकर्तृत्वापूढे लावले नाही.नाव लावले ते दुसऱ्याचे, एका निष्ठावान सर्व सामान्य पण असामान्य कार्य करणाऱ्या हिराेजी इंदाेलकरांचे..!
शिवरायांनी राज्यकारभार सर्व सामान्य रयतेसाठी केला. हिंदवी स्वराज्यातील कोणत्याही किल्ल्यांवर स्वत:चे अथवा स्वत:च्या कूटूंबातील कूणाचेही नाव दिले नाही...आणि हेच थोरल्या महाराजांचे थोरपण भूतलावावरील इतर सर्वच राजांपेक्षा सदैव उजवे ठरते..! छत्रपती शिवाजी महाराज नैतिक मूल्यांचे जिवंत विद्यापीठ होते.आजही त्याच नैतिक मूल्यांची प्रासंगिकता पदोपदी जाणवते..!
आपले थोरले महाराज छत्रपती शिवाजी महाराज..हे भूतलावरील असे एकमेव मानवी अंश होते,ज्यांच्या प्रत्येक कृतीचे ,प्रत्येक माणसाने..डोळे झाकून जरी अनुकरण केले तरी..आपल्या या निरर्थक आयुष्याचे ,सार्थक झाल्या सारखे होईल यात तिळमात्र शंका नाही..!
जगाच्या त्या नियंत्याने ,आपल्या सारख्या सर्व सामान्य माणसांनी सदा सर्वदा अनुकरण करावे असे महामानव तोच नियंता नेहमी या भूतलावर पाठवत असतो..!पण आपल्यातील हीच सर्व सामान्य माणसं,या अद्वितीय भारतीयांच्या नावाचा फक्त स्वतः ची पोळी भाजून घेण्यासाठी वापर करून पाप करतात अन् अशा अनेक महामानवांच्या अनुकरणीय मूल्यांना खऱ्या आयुष्यात अनुकरण करण्यात मुकतात..हे माणसांचे दुर्दैव आहे..!
असा राजा कदापी होणे नाहीच...!
त्रिवार वंदन किल्ले रायगडाला व थोर विभूतींना...!
वंदे मातरम्..!
फोटो क्लिक व लेखन : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
नतमस्तक होण्याचा दिनांक: ३ जून २०१३

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा