चिंतन
" सारस्वताचं देणं, प्राचार्य शिवाजीराव भोसले साहेब..! "
====================================
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच व्याख्याते वंदनीय प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा आज स्मृतिदिन ! (२९ जून २०१०)
त्यानिमित्त त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन..!
काही माणसं अन् त्यांची वाचा ही अदभुत असते..!त्यातील एक प्राचार्य शिवाजीराव भोसले साहेब..! आपल्या मराठवाडयात या महान व्याख्यात्याने त्यांच्या आयुष्यातील इ.स.१९८८ ते १९९१ या कालखंडात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद चे कुलगुरू पद भूषविले.आपल्या अमोख आणि सरल वाणीने गहन विषय अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले..!
सारस्वतांच्या मांदियाळीत आपले स्थान मिळविणाऱ्या अनेक महान सारस्वतांच्या पैकी प्राचार्य शिवाजीराव भोसले साहेब..! त्यांच्या निधनानंतर आपल्या महाराष्ट्रात जी वैचारिक व्याख्यात्याची पोकळी निर्माण झाली ती अद्याप भरलेली नाही असे मला वाटते..! आजकाल बरेच व्याख्याते पार बेंबीच्या देठापासून ओरडून आपले विचार व्यक्त करत असतात..! त्यांचे विचार ऐकताना असे वाटते की, एकतर अशा आजकालच्या बहुतांशी तथाकथित व्याख्यात्यांचा एकतर स्वतचा उच्च रक्तदाब वाढलेला असतो किंवा समोर बसलेल्या श्रोत्यांचा उच्च रक्तदाब वाढवित असतात..!😊
मी ज्यावेळी लासुर स्टेशन येथे राहत होतो त्यावेळी बऱ्याचदा दूर कोपऱ्यात उभा राहून अशा तथाकथित आरडाओरडा करून आपले विचार व्यक्त करणाऱ्या व्याख्यात्यांना मनमुरादपणे ऐकुन आनंद लुटला आहे..!😊 तेंव्हा असे वाटायचे की ,हे व्याख्यान देणारे महाशय भांडत आहेत की व्याख्यान देत आहेत..?
याचा उलगडा अद्याप झालेला नाही..!😊
आजही व्याख्यान कसं आणि कशा भाषेत असावं याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले साहेब..!
वंदे मातरम्..!
प्राचार्य शिवाजीराव भोसले साहेब यांच्या वाचास्पदीवर नितांत प्रेम करणारा: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: २९ जून २०१९, शनिवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा