चिंतन
" दीप अमावस्या..! गटारी अमावस्या नव्हे..!!"
===================================
दीप (दिवे धुन्याच्या) अमावस्येला काही विकृत लोक गटारी अमावस्या असे संबोधून हिंदू धर्म बदनाम करत आहे...! मुळात गटारी फिटारी असा काही सण,उत्सव आपल्या हिंदू धर्मात नाहीये...!
गटारी अमावस्या हे नामकरण दारुड्या टवाळांनी केले आहे...!
दीप अमावस्या या दिवशी घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते, दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात. प्रकाश,हा सर्व जाती धर्मातील लोकांच्या आयुष्यातील अंधार दूर करत असतो.त्याच प्रकाशाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उत्सव, दिप अमावस्या..! त्यामुळे ह्या दिवसाला दीप अमावस्याच (दिवे धुन्याची) म्हणावे अगदी चेष्टेने सूद्धा गटारी म्हणू नका..!🙏
कोणीही ह्या दिवशी दारू प्यायला सांगत नाही, उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात...!वेळी च सावध व्हा.. उद्या हे विकृत दारुडे म्हणतील की हिंदू धर्मच आम्हाला गटारी अमावस्या साजरी करायला लावतो, अन् सांगतो की या दिवशी भरपूर दारू प्यावे...!
तेव्हा हिंदू बांधवांनी ह्या दीप अमावस्या विषयी लोकांमध्ये जागृती करून ह्या प्रकाशाच्या उत्सवाला जे विकृत वळण लागले आहे ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, ही विनंती...!🙏
तसेच आपल्या हिंदू धर्माच्या कृतज्ञता व्यक्त करण्याच्या परंपरेचा मान राखून दीप अमावास्येला गटारी अमावस्या न म्हणता दीप अमावस्या असेच म्हणावे व आपल्या भारतीय कृतज्ञता व्यक्त करण्याच्या परंपरेचा, सणांचा व संस्कृतीचा मान राखावा..!
वंदे मातरम्...!!
नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: १७ जूलै २०१७

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा