" खर्डण असलेलं बेसन...व्वा...!"
=================================
खवय्ये अन् त्यांचे आवडते खाद्य पदार्थांचे मेनू व्यक्तिपरत्वे भिन्न भिन्न असतात..! असायलाच हवे..कारण आपण समृद्ध अशा लोकशाहीतील खवय्ये नागरिक आहोत म्हंटल्यावर..! महाराष्ट्रात भिन्न भिन्न प्रदेशानुसार भिन्न भिन्न खाद्य पदार्थ तेथील माणसं आवडीने खातात..! मात्र अख्ख्या महाराष्ट्राला जर कोणता एक खाद्य पदार्थ एकसंघ ठेवत असेल तर तो आहे.......
खर्डण असलेलं बेसन....!☺
महाराष्ट्रातील बहुतांश भागातील सर्व सामान्य माणसाच्या खाद्य संस्कृती मधील सर्व सामान्य खाद्य पदार्थातील असामान्य खाद्य पदार्थ कुठला असेल तर तो हाच...खर्डण असलेलं बेसन...!कमीत कमी वेळेत अन् जिभेवर चव रेंगाळून टाकणाऱ्या सर्व सामान्य खाद्य पदार्थातील असामान्य खाद्य पदार्थ देखील हाच खर्डण असलेलं बेसन..!
आमच्या सर्व सामान्य कुटुंबातील सर्व सामान्य खवय्ये असणाऱ्या सर्वच माणसांना या खर्डण असलेलं बेसनावर जीव ओवाळून टाकावासा वाटतो..!☺ या खर्डण असलेलं बेसनाच्या चवीत एक वेगळ्याच प्रकारची लज्जत असते..! त्या खाद्य पदार्थातील सार त्यात जमा झालेला असतो..!
खर्डण कोणतेही असू द्या...त्या खर्डण मुळेच त्याच्या वरील सर्वच घटकांना महत्त्व आलेले असते..! हे तेच खर्डण असते जे स्वतःला पार दमण करून घेऊन वरच्या स्तरावरील अनेकांना चवदार दिवस आणत असते..! म्हणून सर्वांनी त्या सर्वच क्षेत्रातील स्वतः ला भाजून पोळून अन् चटके सोसून घेणाऱ्या अनेकानेक खर्डण असणाऱ्यांची काळजी घ्यायला हवी..!
कोणत्याही खाद्य पदार्थातील तळाच्या शेवटी असणाऱ्या खर्डणला खाताना माणूस आतुरलेला असतो..! अशा खवय्येंच्या जिभेवर अन् त्यातल्या त्यात त्यांच्या चेहऱ्यावर अमृत प्राशन करत असल्याचे भाव नक्कीच जाणवतात...हा माझा स्वानुभव आहे..! खाद्य पदार्थातील संस्कृतीच्या देवतेने स्थायुरूप पदार्थांचे अमृत असेच बनवले असेल याचा चवदार चवीने विश्वास वाटतो..!
ज्यांना कुणाला मला जाणवलेल्या सर्व सामान्य खाद्य पदार्थातील असामान्य खाद्य पदार्थ खर्डण असलेलं बेसन खाण्याची जर यदा कदाचित तीव्र इच्छा झाली असेल तरच त्याचा नक्कीच आस्वाद घ्यावा..! कारण या खर्डण असलेलं बेसनाच्या चवीत बराच महाराष्ट्र सहज सापडतो..! हा देखील माझा स्वानुभव आहे बरं का..!
ता.क . खाद्य पदार्थ माणसाला एक माणूस म्हणून पटकन एकत्र आणतात..!☺
वंदे मातरम्..!
खर्डण असलेल्या चवदार बेसणावर चवदार प्रेम करणारा लेखक
: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक:२०ऑक्टोंबर २०१९


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा