"""""""""" आमचे गाव, आमची माणसं..! """"""""""
" आम्हीच आमचे मापं घेतो..!"
____________________________________________
आज दिनांक २९/११/२०१६ रोजी माझी जन्मभूमी पालखेड, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद येथे श्री. पारेश्वर महादेव यात्रेनिमित्त आम्ही बालमित्र एकत्र भेटलो...! बालमित्रांसमवेत....!
आम्ही सर्व शाळा, नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक आहोत मात्र गावच्या यात्रेनिमित्त एकत्र आल्यावर आपआपल्या पदांचे मूखवटे बाजूला ठेवून जमिनीवरील जीवनाचा अनौपचारिक नात्यातील गोडव्याचा आनंद हमखास घेतोच...!एकमेकांचे मापे घेत.. घेत जगतो..!
हीच एक सुवर्णसंधी असते,आपण नेमके कुठे चुकत आहोत,हे समजून घेण्याची..कारण,आम्ही एकमेकांची प्रत्येक विषयांवर प्रत्येकाची उचलपटक करतो..!😂 एकमेकांचे गुणदोष दाखवतो. बाहेरच्या औपचारिक आयुष्यात जगतांना,आम्हाला विशिष्ट पदांमुळे खूप औपचारिक जगावे लागते..!मात्र गावात...कसं सगळं मोकळचाकळ असतं..!आम्हीच आमचे मानसोपचारतज्ज्ञ असतो..!आम्हाला झालेल्या विविध बाधांवर उपचार करणारे..! असे आम्ही..आमचेच मापं घेतो..!😂
जेंव्हा पासून आम्हाला या औपचारिक जीवनाचा स्पर्श झाला,तेंव्हा पासून ज्या..ज्या वेळी आम्हाला मानसिक अस्वस्थपणा जाणवतो तेंव्हा..तेंव्हा आम्हाला याच आठवणी औपचारिक आनंद घ्यायला शिकवितात..!कधी..कधी खूप कंटाळा येतो या औपचारिक जीवनाचा..! मग त्यावर एकच औषध...अन् ते म्हणजे आम्ही एकत्र घालवलेले आमच्या आयुष्यातील अमूल्य क्षण..! मग त्यात मी ,विजू,आण्णा म्हस्के, बाळू माळी, संजय राऊत..सोमनाथ गायकवाड आम्ही जरा जास्तच आतुरलेले असतो...ते क्षण जगायला... कारण आम्ही गावात सरासरी गावाच्या यात्रेलाच जातो..! बाकीचे फोटोतील आमचे बालमित्र...गावातच राहतात किंवा अधून मधून बऱ्याचदा त्यांचा एकमेकांशी संपर्क असतो..!
वंदे मातरम्
त्यातील एक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
फेसबुक वर लेखन दिनांक:२९ नोव्हेंबर २०१६ व
माझ्या ब्लॉगवर प्रकाशित दिनांक: २९/११/२०१९

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा